नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी याची सर्वांनी दक्षता घ्यावी ही विनंती आहे. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आणि या भरती मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी नक्कीच अर्ज करावा.
या लेखामध्ये अर्ज कसा करावा कुठे करावा व एकूण रिक्त पदे किती व निवड कशी करण्यात येणार आहे .इत्यादी विषयीची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे.
आणि मैत्रिणींनो या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. आणि तसेच पदांनुसार इच्छुक असणाऱ्या आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे .व या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आणि निवड मुलाखतीद्वारे होणार आहे मुलाखती 27 एप्रिल 2023 रोजी दुपारी एक वाजता होणार आहे व तसेच दिलेल्या वेळेवर मुलाखतीसाठी हजर असणे गरजेचे आहे.
AIIMS अंतर्गत नागपूर येथे राबविण्यात येणाऱ्या भरतीमध्ये एकूण 40 रिक्त जागा पदे उपलब्ध आहेत.
वरिष्ठ निवासी या रिक्त पदासाठी ही पदभरती होणार आहे. ज्या उमेदवारांना हे पद पाहिजे असेल त्यांनी लगेचच अर्ज करावा.
⭐या पदांनुसार शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे
🔴मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल संबंधित पदवी किंवा पदविका असणे गरजेचे आहे.
डीएमसी / डीडीसी / एमसीआय / राज्य नोंदणी असणे अनिवार्य आहे.
⭐या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा पुढील प्रमाणे आहे.
🔴27 एप्रिल 2023 रोजी 45 वर्षापर्यंत आणि तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी पाच वर्षांची वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षांची वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे. व तसेच अनारक्षित रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या एससी /एसटी व ओबीसी या उमेदवारांना वयात कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. तसेच तसेच अपंग उमेदवारांच्या बाबतीत सामान्य श्रेणीसाठी कमाल पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे तर ओबीसी प्रवर्गासाठी आठ वर्षांची आणि एस सी/ एस टी प्रवर्गातील श्रेणीतील उमेदवारांसाठी दहा वर्षांची वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे.
अर्ज फी किती द्यावी लागणार?
उत्तर : जनरल/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये फी द्यावी लागणार तर एससी एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्धी 250फी द्यावी लागनार आहे.
निवड झाल्यास पगार किती रुपये मिळेल?
उत्तर:निवड झाल्यास पगार 67 हजार 700 रुपये मिळणार.
निवड झाल्यास नोकरी कोणत्या ठिकाणी करावी लागणार?
उत्तर: निवड झाल्यास नोकरी महाराष्ट्रातील नागपूर येथे करावी लागणार
अर्ज कोणत्या पद्धतीने करावा लागणार?
उत्तर: अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे
AIIMS अंतर्गत नागपूर भरतीसाठी निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे?
उत्तर:मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे.
मुलाखतीसाठी पत्ता/ठिकाण कोणते?
उत्तर:Administrative Block, AIIMS Campus, MIHAN, Nagpur-441108..
👉अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsnagpur.edu.in
👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
👉ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा