Talathi bharti 2023:तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर!!

Talathi bharti 2023:तलाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर!!

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो या लेखामध्ये तलाठी भरती
च्या वेळापत्रकाविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तरी तुम्ही ती काळजीपूर्वक वाचावी.

जसे की मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी द्वारे एप्रिल महिन्यात लिपिक टंकलेखक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. व तसेच रिक्त असलेली पदे आणि येत्या काळात रिक्त होणाऱ्या पदांचे मागणी पत्र प्रशासकीय विभागांनी आयोगाकडे पाठवावे असे आदेश आपल्या राज्याचे सहसचिव प्रशांत साजणीकर यांनी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिले आहेत. आणि लिपिक व टंकलेखक या पदांची मोठी भरती या एप्रिलमध्ये होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मित्र आणि मैत्रिणींनो एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आणि त्यामध्ये लिपिक टंकलेखक संवर्गातील पदे महाराष्ट्र राजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून प्रस्तावित असून त्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळेच पंधरा डिसेंबर पर्यंत सर्व विभागांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे परिपूर्ण मागणी पत्र सादर करावे असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

तसेच लिपिक टंकलेखक पदासाठी खाजगी एजन्सी मार्फत भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती. त्यामुळे त्यात अनेक गैरप्रकार झालेले आढळले. व त्यानंतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत घेण्यात यावी. अशी मागणी केली होती मग आता ही भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत घेण्यात येणार असल्यामुळे ती पारदर्शी होईल असा विश्वास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment