
जिल्हा परिषद भरती जाणून घ्या संपूर्ण माहिती:
जिल्हा परिषद भरती 2023: मित्रांनो मैत्रिणींनो आपणास कळविण्यात आनंद होत आहे की जिल्हा परिषद भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 हजार रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. आणि या सूचनेनुसार जिल्हा परिषदेचे १८९३९ पदे भरली जाणार आहेत. मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गेल्या चार वर्षांपासून पदभरती झालेली नाही व यामुळे विद्यार्थी तीव्र संतापलेले आहे. परंतु आता काळजी करू नका कारण ही पदे 15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरावयाची आहे त्यामुळे आपला अभ्यास व तयारी सुरू ठेवावी.
जिल्हा परिषद भरती माहिती
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवा नैमित्तिक वर्षामध्ये अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व तसेच इतर विभागातील सवर्गाच्या पद भरतीची प्रक्रिया कालबद्ध कार्यक्रम हा विभागाच्या अनुक्रमे दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 व दिनांक 15 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. सदर जाहिरातीमध्ये हे नमूद करण्यात आलेले आहे की जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कुणीही सरकारी नोकरी मिळवण्याची ही संधी सोडू नये.
अधिक वाचा
तसेच आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की विभागाने दिनांक 16 मार्च 2023 च्या शासन निर्णय असा आहे की, दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष इतकी सूट देण्यात आलेली आहेत म्हणजेच दोन वर्ष इतकी शिथिलता देण्यात आलेली आहे.
या भरती करिता लागणारी सर्व माहिती आय.बी.पी.एस कंपनीस देण्याबाबत सर्व नोडल अधिकारी तसेच तथा आयुक्त यांना कळविण्यात आले होते. भरतीसाठी च्या जाहिरातीचा नमुना तसेच रिक्त पद पदांची सूची आरक्षण प्रवर्गनिहाय माहिती व तसेच वयोमर्यादा किती असणार शैक्षणिक अहर्तिबाबतची माहिती आय.बी.पी.एस कंपनी लवकरात लवकर जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. जेणेकरून एप्लीकेशन पोर्टल विकसित करणे सोयीचे जाईल.
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सदर कंपन्यांची एकाच वेळा परीक्षा घेण्याची क्षमते वर्धनासाठी कंपन्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तसेच तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक प्रणाली भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची शिफारस सचिव समितीने केली असल्याचे सांगितले गेले आहे. आणि त्याचनुसार विभागाच्या दिनांक 17 फेब्रुवारी 2023 च्या शासन पत्राद्वारे उच्च व तसेच तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास व तसेच उद्योजकता विभागास कळविण्यात आलेले आहे.