शैक्षणिक धोरणामध्ये मोठे बदल:
Major changes in the education system2023:
मित्रानो/ मैत्रिणींनो शिक्षण मंत्रिमडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यात नवीन शिक्षण पद्धती लगेचच होणार लागू,आणि तसेच बारावीच्या व दहावीच्या परीक्षेतही मोठे बदल करण्यात आले. या सर्व बदलांची माहिती आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे. परिक्षा घेण्याची पद्धत बदलली आहे.हे नवीन सुधारित शैक्षणिक धोरण येत्या वर्षातच लागू होणार असे सांगितले जात आहे.आणि तसेच इंजिनिअरिंग देखील व मेडिकलही मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे.हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आहे.तसेच शैक्षणिक धोरण आणि पुढील काळात महत्त्वाचे ठराव यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे.
जाणून घ्या दीपक केसरकर यांनी दिलेली माहिती:महिती पुढलप्रमाणे आहे. या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या काळात या वर्षीपासून करण्यात येणार ,अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.
1.🤔 प्रश्णपत्रिकाचे स्वरूप कसे असणार आहे ?
उत्तर:मित्रानो दहावी मधील विद्यार्थ्यासाठी एकूण प्रश्र्नांपैकी
पन्नास टक्के प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. म्हणजे चार पैकी एक पर्याय निवडण्याची मुभा तुम्हाला असणार आहे.
हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी फार चांगला ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
तुम्हाला दिले जाणारे बहुपर्यायी प्रश्न पुढील प्रमाणे असतील हे बहुपर्यायी प्रश्न एखाद्या घटनेवर किंवा समस्येवर आधारित असलेले प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. व त्यानुसार तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांचा भाग वेगळा असणार आहे. वर्षातून होणार दोन वेळा पेपर. शंभर टक्के पेपर पैकी 20 टक्के भाग वस्तुनिष्ठ प्रश्नांनी भरलेला असेल. आणि तसेच लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न सुद्धा 30% पर्यंत कमी केले जाणार आहे. म्हणजेच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील ताण कमी होणार आहे.
बारावीच्या परीक्षेतही मोठा बदल:
तसेच जाणून घेऊया बारावीच्या परीक्षेबाबत: आता बारावीच्या पेपरला 100% पेपर पैकी 40% पेपर हा एम सी क्यू प्रश्नांनी भरलेला दिसेल. तसेच लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्नांचा भाग हा 50 टक्क्यावरून 40% करण्यात आलेला आहे म्हणजे दहा टक्क्यांची सूट.
अकरावीच्या परीक्षेबाबतही मोठा निर्णय:
आणि आता जाणून घेऊया अकरावीच्या परीक्षेबाबत: मित्रांनो, व तसेच मैत्रिणींनो नवीन शिक्षण धोरणानुसार अकरावीच्या परीक्षांमध्येही मोठाले बदल करण्यात आलेले आहे. ते बदल पुढील प्रमाणे आहे एखादा विद्यार्थी जो विषय निवडेल त्यामध्ये त्याला 50 टक्के अभ्यासक्रम हा मुख्य विषय म्हणून शिकवला जाणार .व उर्वरित पन्नास टक्के अभ्यासक्रम म्हणून शिकवला जाणार. त्याचबरोबर सर्वांत आनंदाची आहे बाब अशी आहे की विद्यार्थ्यांना ग्रेड पद्धतीने मेजर मायनर इलेक्टिव्ह स्किल कोर्सेस इत्यादी विषय स्वतः निवडण्याची मुभा असणार आहे.
या नवीन शैक्षणिक धोरणाला मोदी सरकारने ही मंजुरी दिली आहे. फार काळापासून म्हणजेच गेल्या 34 वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काहीही बदल केला गेला नव्हता. परंतु तब्बल 34 वर्षानंतर या शिक्षण पद्धतीमध्ये म्हणजेच शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात आले आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये हे शैक्षणिक धोरण येत्या काही काळातच राबवले जाणार आहे.या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षण पद्धतीमध्ये फार मोठे बदल केले आहे.
जसे की आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र राज्याचं जुनं शैक्षणिक धोरण हे 10+2 असं होतं. परंतु दहावी व बारावी मध्ये बोर्ड परीक्षा घेण्यात येणार असा कुठेही उल्लेख आलेला नाही. परंतु आता ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी ही नवीन शिक्षण पद्धत लागू करण्यात येईल.
या शिक्षण पद्धतीतील शैक्षणिक टप्पे कशे असणार त्याची माहिती पुढे दिलेली आहे:
🟡पहिला टप्पा म्हणजेच पहिली पाच वर्षे कशी असणार?
उत्तर: पूर्व प्राथमिक ची तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी.
🟡दुसरा टप्पा म्हणजेच त्या पुढील तीन वर्ष म्हणजेच इयत्ता तिसरी ते पाचवी.
🟡आणि तिसरा टप्पा म्हणजेच पाचवी नंतरची तीन वर्ष सहावी ते आठवी.
🟡 आणि तसेच चौथा टप्पा म्हणजेच चार वर्ष नववी ते बारावी.
जाणून घ्या परीक्षेचा पॅटर्न:
नव्या शैक्षणिक पद्धतीने नुसार सेमिस्टर पॅटर्न वर भर देण्यात आला आहे. व तसेच यामुळे बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होणार आहे सेमिस्टर पॅटर्न मध्येच परीक्षा घेतल्या जाणार आहे. आपल्याला माहित आहे की, बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते .परंतु या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे. म्हणजेच असं म्हणता येईल की नववी पासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण आठ सेमिस्टर मध्ये विभागण्यात आलेलं आहे. तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जाणार असाही विचार सरकारचा आहे.
आणखी फार मोठाले बदल पुढील प्रमाणे आहे:
आता पाचवी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतच दिल जाणार आहे प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच पाचवी पर्यंतचे शिक्षण देण्यात येणार आहे. व तसेच पूर्व प्राथमिक शिक्षण हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे करायचं असा निर्णय शासनाने घेतला आहे. सहावी पासूनच व्यावसायिक शिक्षण दिले जाणार असे सुचवण्यात आले आहे. आता, विद्यार्थीच स्वतःचं किंवा सह विद्यार्थी आणि शिक्षक मूल्यांकन करणार. शिक्षणानंतर सर्व विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य मिळवण्यावर भर दिला जाणार आहे पदवीसाठी कला किंवा विज्ञानात वेद न राखता विषय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच खाजगी किंवा सरकारी शाळांमधील शिक्षणात समानता करण्यात येणार आहे. आणि शिक्षकांचा अभ्यासक्रमही आता बदलणार आहे.
1🤔.नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात काय काय बदल केले आहेत किंवा काय काय माहिती समाविष्ट केली आहे?
उत्तर: नवीन शैक्षणिक धोरणामध्ये विविध विषयांची माहिती तसेच अद्यावत केलेल्या टॉपिक्स विषयी माहिती समाविष्ट केली गेली आहे.
2.🤔नवीन शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यामध्ये काय काय बदल करण्यात आले आहे?
उत्तर; नवीन शैक्षणिक धोरनानुसार अभ्यासक्रमामध्ये विविध विषयांची माहिती तसेच शैक्षणिक व्यवस्था आणि प्रोउद्योगी की इत्यादींच्या मध्ये बदल करण्यात आला आहे.
1.🤔 प्रश्णपत्रिकाचे स्वरूप कसे असणार आहे ?
उत्तर:मित्रानो दहावी मधील विद्यार्थ्यासाठी एकूण प्रश्र्नांपैकी पन्नास टक्के प्रश्न हे बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. म्हणजे चार पैकी एक पर्याय निवडण्याची मुभा तुम्हाला असणार आहे.हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी फार चांगला ठरणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होईल.
नोकरी विषयी आणि शैक्षणिक ,योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहचेल.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा