Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 1 2024 : वेगवशता

                                 लेखक. प्राचार्य शिवाजीराव भोसले
कृती   

★ कृती – १. (अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.

(१) जीवन विभागणारे घटक
उत्तर : जीवन विभागणारे घटक= {स्थिती} {गती}
(२) विचारांची गती म्हणजे
उत्तर : विचारांची गती म्हणजे={प्रगती}
(३)अधोगती म्हणजे
उत्तर : अधोगती म्हणजे ={दिशाविहीन गती}
(४) अक्षम्य आवेग म्हणजे
उत्तर : अक्षम्य आवेग म्हणजे={अधिक वेग}

(आ) कृती करा.

(१)गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे.
उत्तर:*अप्रमाण
* अवास्तव
*अनावश्यक गती

(२)लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण तेव्हा होते, जेव्हा.
उत्तर:*कामापुरते आणि कामासाठी वाहन
*आटोक्यात राहील एवढाच वेग हे तंत्र वापरले तर
(३)लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे.
उत्तर:*इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी
*आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी
(४)वाहनाचा वेग अनिवार झाला तर.
उत्तर:*चित्ताची व्यग्रता वाढते.
*डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो.
*शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात.
* हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात.

(इ) कारणे शोधा व लिहा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा
(१) अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण……
उत्तर :घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते, रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे नसते. त्यामुळे अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते म्हणून अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते.

(२)लेखकाच्या मते गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा, कारण………
उत्तर : लेखकाच्या मते गरजेसाठीच वाहनांचा वापर करायला हवा कारण विनाकारण वाहनांवरून येरझाऱ्या मारण्याने आपण उगाच गर्दी वाढवतो. वेळ, श्रम वाचवण्यासाठी व फक्त कामापुरती वाहने वापरल्याने अधिक प्रमाणात व अर्थपूर्ण जीवन आपल्या वाट्याला येईल.

(अ) योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.

(१) जीवन अर्थपूर्ण होईल जर……
(अ) वाहन कामापुरतेच वापरले तर.
(आ) वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर.
(इ) वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
(ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.
उत्तर : (ई) वरील तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर.

(२) निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे ……
(अ) स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे.
(आ) वाहनाचा अतिवेग अंगीकारणे.
(इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.
(ई) गरज नसताना वाहन वापरणे.
उत्तर : (इ) तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे.

(आ) वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :


           भारत                                          अमेरिका                                                                                                                           

(१) घरोघर आणि दरडोई (१) दरडोई वाहने उपलब्ध नाहीत.
वाहन उपलब्ध असते.
___________________________________________________________________________________________________

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(२) रस्ते रुंद, सरळ निर्विघ्न. (२) सतत रस्त्यांवरून प्रवास करण्याची गरज नाही.
आणि एकमार्गी असतात. रूळांवरून गाड्या चालतात.यातून प्रवास करणे सोपे जाते.


(३) घरे, कार्यालये, बाजारपेठा (३)घरे, कार्यालये, बाजारपेठा जवळच असतात.
यांत निदान शंभर मैलांचे अंतर कमी असते.
अंतर असते.


(४) अंतरावरच्या गोष्टींशी (४) अंतर कमी असल्याने दूरवर जान्याची गरज नाही.
जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते.



कृती- ३. खालील वाक्यांचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.

(अ) यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे.
उत्तर:माणसाचे जीवन हे गतीशील आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. पण त्यापेक्षा जास्त अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक वेग हा आत्मघातकी ठरू शकतो. आहे. आपण अनेकवेळा रस्त्यावरून भरधाव वेगाने म्हणून कारण नसताना दुचाकी चालवणारे वाहनवीर बघतो. ती एक विकृती त्यांना अशा प्रकारे वाहन चालवणे यात आपण काहीतरी वेगळे करतो आहोत असे वाटत असते. पण अशाच दुचाकी स्वारांचा एखादया वाहनाला मागे टाकून पुढे जाताना किंवा वेगावरचे वेगावरचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात दिसतो. म्हणून वाहनांचा वेग हा यथाप्रमाणच असावा. आज आपल्या महाराष्ट्रात आपल्याला भाड्याने चालणाऱ्या वाहनांना वेगावर नियंत्रण ठेवणारे मशीन लावणे (Speed governor)
सरकारने आवश्यक केले आहे. कदाचित ते यामुळेच असेल.

(आ) आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
उत्तर : वाहनांचा उपयोग खरेतर वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी असतो. पण अनेकदा असे घडते, की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते व पुन्हा माणसे वाहनांवर स्वार होतात. माणसांची ही प्रवृत्ती बनत जाते. कंटाळा आला, चला बाहेरून वाहनाने एक फेरफटका मारून येऊ. अगदी छोट्या अंतरावर जाण्यासाठीही लोक वाहने वापरतात. मग ही सवयच माणसाला वाहनांच्या अधीन करते व मग सतत वाहनांशिवाय बाहेर न पडणे हा जणू माणसाचा स्वभाव बनतो. म्हणूनच लेखक म्हणतात आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.

(इ) उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
उत्तर: आज माणूस वाहनांच्या पर्यायी वेगाच्या आहारी गेलेला दिसतो. वाढता वेग म्हणजे ताण व अशा ताणाचा परिणाम मनावर, शरीरावर होत असतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव अधिक आहेत. अशावेळी वेगवश होऊन आणखी ताण वाढवून आपण काय साध्य करणार आहोत. एखादया वेळी एखादया ठिकाणी आपल्याला लवकर पोहोचायचे असते. पण त्यासाठी वेगावर स्वार होणे चुकीचे आहे. अशावेळी ५ मिनिटे उशिरा पोहोचल्याने मोठे संकट येणार नसते. पण अनाठायी वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते. म्हणून उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.

कृती – ४. व्याकरण

(अ) समानार्थी शब्द :
उत्तर:(१) निकड-गरज. (२) उचित-योग्य
(३) उसंत -विश्रांती, सवड. (४) व्यग्र – व्यस्त

(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
उत्तर: ____________________________________________________________________________________________________
शब्द
= विग्रह. = समास

______________________________________________________________________________________________________

(१) ताणतणाव ताण आणि तणाव. इतरेतर द्वंद्व
______________________________________________________________________________________________________

(२) दरडोई प्रत्येक माणशी. अव्ययीभाव समास
______________________________________________________________________________________________________

(३) यथाप्रमाण प्रमाणाप्रमाणे अव्ययीभाव समास
______________________________________________________________________________________________________

(४) जीवनशैली जीवनाची शैली तत्पुरुष समास


(इ) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.

(१) आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते.
(उद्गारार्थी करा.)
उत्तर : खरंच! आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते.

(२) आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे कमी आहेत. (नकारार्थी करा. )
उत्तर : आपल्याकडे कामाच्या ठिकाणाची अंतरे जास्त नाहीत.

(३) निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत ?
(विधानार्थी करा.)
उत्तर : निसर्गरम्य स्थान, मंदिर पाहण्यासाठी माणसांनी जायला पाहिजे.

*कृती -५. स्वमत.

(अ)’वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ
घालवण्यासाठी नसते. वाहनाचा वापर हा गरजेपुरताच असायला हवा तसेच कमी अंतरासाठी वाहन वापरणे चुकीचे आहे. आपण बघतो की रेल्वे, बससेवा अशा सेवा उपलब्ध असतानाही माणसे स्वतःचे वाहन घेऊन फिरण्यात आनंद मानतात. पण रोज वाहनांवर बसून प्रवास केल्याने डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो, शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी सुरू होतात व या सर्व गोष्टींनी शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात. आजअनेक लोक बसेस व रेल्वेची गर्दी वाचवण्यासाठी दुचाकीवरून कामावर जातात, लांब पल्ल्याच्या अंतराचा प्रवास करताना दिसतात व काहीच दिवसात पाठीच्या दुखण्याने हैराण होतात. सतत वेग व इतर वाहनांमधून रस्ता काढताना मनावर ताण येतो व पर्यायी रोजचा हा ताण शरीर स्वास्थ्यावर परिणाम करतो. म्हणून वाहनांचा अतिवापर टाळणेच योग्य.

(आ) ‘वाढता वेग म्हणजे ताण’ याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर : प्रत्येकजण वाहने बाळगताना दिसतो. यातील अनेक लोक वाहने वेगाने चालवण्याचे समर्थन करतात. बेताने वाहन चालवणारे हे वेगाने वाहन चालवणाऱ्यांपेक्षा तुरळकच. आज वाहनाचा वेग वाढला आहे. त्याचसोबत पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यासही आहे. लोक म्हणतात ‘पुढचा रस्ता देईल तेव्हा वाहन पुढे नेऊ अशी वाट बघत बसल्यास आपण इच्छित स्थळी वेळेवर पोहोचूच शकणार नाही.’ हे म्हणणे जरी रास्त असले तरी सतत वाहन चालवणारा वेग व पुढे जाण्याच्या शर्यतीत वाहन चालवताना दिसतो. दरवेळीच अती महत्त्वाची कामे असतात असे नाही तर वाहनवीर वेग व शर्यत दोन्ही गोष्टी सांभाळतानाच दिसतात. वेगाने पोहोचून ५ ते १० मिनिटे लवकर पोहोचून आपण काय साध्य करणार आहोत? असा विचार करताना कोणी दिसतच नाही. सतत पुढे जाण्याचा ध्यास, वेग याचा मनावर किती परिणाम होत असतो याचा कोणी विचार करतात का ? सततच्या या ताणाने माणूस आपले आयुष्य गमावून बसू शकतो. सततचा हा ताण वयाआधीच मनाला थकवतो व माणूस वेळेआधीच आपली मानसिक शक्ती गमवू
लागतो.

(इ) ‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते.’ हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर : घरोघरी वाहने आली. गरज म्हणून किंवा स्पर्धा म्हणून, वाहनांची संख्या वाढत गेली. वाहन ही आज गरजेची वस्तू बनून गेली. वाहन नाही ती माणसे जगत नाहीत का? असे नाही. तीही प्रवास करतातच ना! रेल्वे, बसेस, रिक्षा, टॅक्सी प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत.
का? आहेत पण तरीही आज तुमच्याकडे गाडी नाही ? म्हणजे तुम्ही काहीतरी कमी आहात. अशी भावना समाजात दिसते. खरे पाहता कितीतरी लोकांना रोज वाहनांची गरज नसते. पण वाहन हवे म्हणून ते घेतलेले असते. आता गाडी आहे तर तिने प्रवास करायला हवा. अशा परिस्थितीत प्रश्न पडतो. वाहन हे वेळ घालवण्याचे साधन झाले आहे का ? आता आहे ना गाडी मग रिक्षा कशाला? गाडीच काढू या विचारांनी आज वाहनांची गर्दी होत आहे. वाहन हे ज्यांना रोज प्रवास करावाच लागतो व ज्यांना आपल्या वाहनाने प्रवास सोपा होतो त्यांच्यासाठीच योग्य आहे. कारण वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. कंटाळा आला चला गाडी घेऊन एक फेरफटका मारून येऊ. या विचारांनी वेळ घालवण्यासाठीच वाहन जास्त वापरात येते की काय असा प्रश्न पडू लागला आहे. म्हणून वाहनांचा उपयोग वेळ वाचवण्यासाठीच होणे गरजेचे आहे.

(ई) ‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
उत्तर : वाहन म्हणजे गती, गती म्हणजे प्रगती
पण अतिगती ही विकृती आहे
माणसाचे जीवन गतीशील आहे. घड्याळासोबत जीवन जगणारा माणूस गतीसोबतच जगत असतो. आजच्या गतिशील जीवनात प्रत्येकालाच गतिमान राहणे आवश्यक आहे. नाही तर त्यांची प्रगती थांबेल. पण काळ जसा एका ठरावीक गतीनेच वाहत असतो. तो पटापट पुढे गेला तरी चालणार नाही. त्याप्रमाणे माणसानेही गती मर्यादितच ठेवली पाहिजे. वाहने गतीचे माध्यम म्हणून जरी आपण वापरत असलो तरी अनेकवेळा गतीचे उल्लंघन होताना आपल्याला दिसते. अनेक तरुण वाहनवीर, दुचाकीस्वार वाहने अशी चालवतात जसे ते वाऱ्यावर स्वार आहेत. त्यांना वेग म्हणजे एक मजा वाटते. वेगावर स्वार होताना त्यांना पुढच्या परिणामांचा विचार नसतो. स्वतःच्या व दुसऱ्याच्या जीवाची पर्वा न करता अतिवेगाने वाहने चालवणाऱ्या या लोकांना पाहिले की लेखकाप्रमाणे आपल्यालाही वाटते की ही एक विकृती आहे की काय ? अतिवेगाने वाहने चालवण्याने त्याच्या वाईट परिणामांना त्या वाहन चालकांनाच सामोरे जावे लागते म्हणूनच ‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’.

*कृती -६. अभिव्यक्ती:

(अ) रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
उत्तर: वाढणारी वाहनसंख्या ही माणसांच्या संख्येपरत्वे वाढत आहे. पण रस्ते मात्र तेवढेच आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यात जड वाहने व दुचाकी, चारचाकी यांसाठी वेगवेगळ्या लेन उपलब्ध नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी ही अनेक ठिकाणची मोठी समस्या आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडीत आपण जर कधी सापडलो तर माझ्या मते आपण पुढच्या गाड्यांना मागे टाकून पुढे जाण्यासाठी समोरून येणाऱ्या वाहनांच्या मध्ये अडथळे निर्माण करू नयेत. यामुळेच अधिक प्रमाणात वाहतूक कोंडी वाढते. काही काळ संयमाने आपल्या लेनमध्येच थांबून रहावे. जमल्यास वाहतूक कोंडी सोडवण्यास प्रयत्न करावा पण वाहतूक कोंडीत हॉर्न वाजवत प्रदूषण करू नये.

(आ) वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर : वाहन हे माणसाने माणसाच्या सोयीसाठी निर्माण केलेले आधुनिक यंत्र आहे. वाहनामुळे आपल्याला हवा तेव्हा हवा तसा प्रवास करता येतो. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की वाहन आपल्या गरजेसाठी आहे. त्यामुळे गरजेच्या वेळीच ते चालवले पाहिजे. वाहन चालकाच्या वाहन चालवण्यावर वाहनातील इतर लोकांचे आयुष्य अवलंबून आहे. हा विचार त्याने सतत मनात ठेवून वाहनावर ताबा ठेवला पाहिजे. त्यासाठी अतिवेग, अतिघाई टाळली पाहिजे. वाहनवीर एकटा असेल तरी आपल्या जीवनापेक्षा दिलेली वेळ महत्त्वाची नाही. हे लक्षात ठेवून वेगावर नियंत्रण असलेच पाहिजे. दुचाकीस्वारांनी याची विशेष काळजी घेतली पाहिजे की वयाचे बंधन लक्षात ठेवूनच १८ वर्षे वयानंतरच वाहन चालवावे तसेच वाहनाचे लायसन्स वगैरे कागदपत्र मिळाल्यानंतरच वाहन चालवण्यास सुरुवात करावी व वाहनाचा वेग लक्षपूर्वक ताब्यात ठेवावा.

| व्याकरण|

*पाठातील व्याकरण*

प्र.१.वाक्यांचे प्रकार ओळखा.
उत्तर:


(१) शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. = विधानार्थी वाक्य
____________________________________________________________________________________________________
(२) जीवनातले ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कोठे?= प्रश्नार्थी वाक्य.


(३) बापरे! केवढा हा वाहनाचा वेग.=उद्गारार्थी वाक्य.


प्र. २. वाक्यांचे रुपांतर करा.

(१) वेग हे गतीचे एक रूप आहे. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर : वेग हे गतीचे रूप आहे का ?

(२) आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसतात का ? (विधानार्थी करा.)

उत्तर : आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नाहीत.

(३) वाहने भरधाव वेगाने उगाच चालवली जातात. (नकारार्थी करा.)

उत्तर : वाहने भरधाव वेगाने चालवू नयेत.

प्र.३.(अ) समास ओळखा.

उत्तर:


        शब्द          -            विग्रह             -         समास                                                                                                                           ____________________________________________________________________

(१) अहोरात्र. रात्रभर. अव्ययीभाव समास

(२) जगप्रवास जगाचा प्रवास तत्पुरुष समास

(३) दशदिशा दहा दिशा द्विगू समास


(आ) खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
उत्तर:


शब्द विग्रह समास


(१) चारचाके चार चाकांचा समूह द्विगू समास


(२)दुचाकी दोन चाकी वाहन अव्ययीभाव समास


(३)वाहनवीर वाहन चालवणारा अव्ययीभाव समास


{कृतीपत्रिका १}

कृती / प्र. १. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.

आकलन कृती.

(१) गतीचे रूप

उत्तर :वेग

(२) प्रगतीसाठी गतीबरोबर गरजेची गोष्ट

उत्तर : दिशा

(३) माणूस घरातून दारात आला की आरुढ होतो

उत्तर :वाहनावर

(४) अधिक वेग म्हणजे –

उत्तर :अक्षम्य आवेग

कृती / प्र. २. कारणे शोधा व लिहा.

(१) माणूस वेगाचा आश्रय घेताना दिसतो.

उत्तर : अमेरिकेसारख्या देशात अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसामाणसांत दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो.

(२)भारतीयांना जीवनाची टोके सहज साधता येतात.

उत्तर : भारतात घरे, कार्यालये, बाजारपेठा यांत अंतरे कमी आहेत. म्हणून भारतीयांना जीवनाची टोके सहज साधता येतात.

उतारा: वेग हे गतीचे एक……………मग वाहने माणसांवर स्वार होतात.(पाठ्यपुस्तक. पृ. क्र. ३, ४)

कृती / प्र. ३. स्वमत

(१) ‘आज माणूस वाहनांच्या आहारी गेला आहे’ याविषयी तुमचे मत ८ ते १० ओळीत लिहा.
उत्तर : घरात वाहन हवे तरच आपण आज चारचौघांमध्ये
आपल्या कुटुंबाचा स्तर चांगला ठेवू शकतो. अशी काहीतरी समजूत आजच्या समाजात दिसते. त्याचबरोबर छोट्या अंतरावर सुद्धा चालत जाणे टाळताना आपल्याला माणूस दिसतो आहे ना वाहन मग चला पटकन दुचाकी सुरू करा आणि जे हवे ते घेऊन या. त्यानिमित्ताने आपले चालणे होईल हा विचारच नाही. पटकन वाहनावरून जाऊन येणे शक्य आहे तर पटकन वाहनावरूनच जाऊ हाच विचार प्रामुख्याने सगळ्यांच्या मनात येतो. परिणामी रस्त्यावरसुद्धा वाहनांची गर्दी दिसते आहे. म्हणून आज माणूस वाहनांच्या आहारी गेला आहे.

(२) ‘दिशाविहीन गती ही अधोगती ठरते’ याविषयी तुमचे विचार ८ ते १० ओळीत लिहा.
उत्तर: गती ही जीवनास आवश्यक आहे. माणसाने गतिमान रहाणे आवश्यक आहे. नाहीतर तो मागे पडेल. पण गती ही दिशाविहीन नसावी. कारण गती ही माणसाच्या प्रगतीचे लक्षण आहे. जो गतिशील नाही त्याची प्रगती थांबते. पण प्रगतीसाठी जीवनात नुसतीच गती असून उपयोग नाही. गतीला योग्य दिशाही असायला हवी. कारण माणूस जेव्हा योग्य दिशेने प्रयत्न करतो तेव्हाच यशस्वी होतो. अन्यथा उगाच धावत राहणारा माणूस कधीच यशाचे शिखर गाठू शकत नाही. प्रयत्नाबरोबर, गतीबरोबर, योग्य दिशेची गरज आहे. दिशाविहीन गती ही मांजा तुटलेल्या पतंगाप्रमाणे असते ज्याला वेग तर असतो पण योग्य दिशा नसल्याने तो कुठे जाऊन पडेल हे कोणालाच माहीत नसते.

{कृतिपत्रिका – २ }

कृती / प्र. १. खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती
सोडवा.

(१) आत्मघातकी असतो .
उत्तर :अक्षम्य आवेग

(२)वाहनांचा वापर या गोष्टींसाठी करायला हवा.
उत्तर :
→आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाट्याला यावे.

→ जीवन कृतार्थतेत जगता यावे.

→अनुभवता यावे.

→त्यासाठी उसंत लाभावी म्हणून.

(३) रात्री विलक्षण वेगाने धावणारी गाडी
उत्तर : रातराणी

(४) वाहनधारकांची व्यथा
उत्तर : कमरेची आणि पाठीची दुखणी

कृती / प्र. २. कारणे शोधा व लिहा.
(१) चित्ताची व्यग्रता वाढते.
उत्तर : वाहनाचा वेग अनिवार झाला म्हणजे चित्ताची व्यग्रता वाढते.

(२) वाहनावरचा ताबा सुटतो.

उत्तर : वाहनाचा वेग वाढला म्हणजे वाहनावरचा ताबा सुटतो.

| उताराः कामापुरते आणि कामासाठी वाहन .अंत होण्याची शक्यता वाढते. (पाठ्यपुस्तक. पृ. क्र. ४,५)

कृती / प्र. ३. स्वमत

(१) ‘जीवनात उसंत मिळावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा.’यावर तुमचे विचार लिहा.

उत्तर : माणसाचे जीवन इतके धकाधकीचे झाले आहे की काही वेळा असे वाटते आपण फक्त थकून जेवायला व झोपायला घरी येतो की काय ? दिवसभर कामाच्या मागे माणूस धावत आहे आणि ही आजच्या काळाची गरजही आहे. आज उसंताचे काही क्षण मिळावे माणूस धडपडताना दिसतो. कधी एकदा आठवडा संपतो म्हणून व एक दिवस तरी उसंत मिळते म्हणून माणूस वाट पाहत असतो. यातच रोजच्या धकाधकीचा प्रवास टाळण्यासाठी माणूस वाहनांचा आधार घेताना दिसतो. आपल्या हातातआपले वाहन असले तर आपल्याला लवकर पोहोचता येईल किंवा थोडे उशिरा घरातून निघता येईल. हा विचार असतो व म्हणूनच आपले वाहन घेतल्याने रोजच्या दगदगीतून थोडातरी वेळ उसंत मिळेल असे त्याला वाटते. म्हणून लेखकांनाही वाटते वाहनाचा वापर, उसंत मिळावी म्हणून करावा. वाहनामुळे वेळ मिळाला तर तो आता कसा घालवायचा म्हणून वाहनावर परत आरुढ होणे चुकीचे आहे.

(२) ‘वाहनाच्या आहारी जाऊन माणसे स्वत्व व स्वास्थ्य गमावून बसतात. ‘ तुमचे विचार लिहा.

उत्तर : आजच्या धावपळीच्या जीवनात वाहन ही अनकांची गरज झाली आहे. दोन दोन रेल्वेगाड्या बदलून प्रवास करणे त्यापेक्षा आपल्या हातात आपले वाहन असेल तर प्रवास सोपा होतो. अनेक लोक लांबच्या अंतरावर नोकरीला जातात. तसेच रिक्षा, बसची वाट पाहत वेळ घालवण्यापेक्षा दुचाकी सुरू करून पटकन जाणे काहींना सोयीस्कर वाटते. पण आज माणसे वाहनाच्या आहारी गेली आहेत. गरज म्हणून कामापुरता वाहनाचा वापर न करता छोट्या छोट्या अंतरावर जाण्यासाठीसुद्धा माणसांना वाहन लागते. चालत जाण्याचा कंटाळा येतो. यामुळे माणूस स्वत्व विसरून वाहनांवर अवलंबून राहू लागला आहे व याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावरही होत आहे. चालण्याचा व्यायाम आज होत नाही. सामान उचलून आणण्याची ताकत कमी होऊ लागली आहे. तसेच सतत वाहनावर स्वार होण्याने पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी अशी दुखणी सतावू लागली आहेत.

‘वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी यांची अभिरूप मुलाखत तुमच्या वर्गमित्राच्या/ मैत्रिणीच्या वर्गात सादर करा.

मुलाखतः अभिरूप म्हणजे त्या सदृश्य वा त्यासारखे (resembling) प्रत्यक्षातील मुलाखतीप्रमाणे या मुलाखतीचे सादरीकरण तुम्हांला वर्गमित्राच्या वा वर्गमैत्रिणीच्या मदतीने करावयाचे आहे.
(स्थळ – पुण्यातील जंगली महाराज कॉर्नर
वेळ – सकाळी १०.१५ मिनिटे. –
इयत्ता १२ वी कला ‘क’ वर्गातील दोन मैत्रिणी कु. स्वाती मंडलिक व कु. वल्लरी नाईक)

स्वाती :(इयत्ता १२ वी कला ‘क’ वर्गातील विद्यार्थिनी) : नमस्ते मॅडम.

वल्लरी :(वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी- कॉन्स्टेबल सौ. सायली काळे):
नमस्ते, आज जरा लवकर कॉलेजला. काही विशेष..

स्वाती: विशेष वगैरे नाही. थोडंसं काम आहे कॉलेजच्या कार्यालयात.

वल्लरी : म्हणूनच घाई, गडबड आहे तर.

स्वाती : तसं म्हणा हवं तर. पण, खरं सांगू ही सकाळची वेळ आपल्या पुण्यात जरा धावपळीचीच नाही का ?

वल्लरी : पुण्यातच नाही तर सर्वच शहरात ही वेळ धावपळ, गडबड, वाहतूक कोंडी व अनवधानाने होणाऱ्या अपघाताची.

स्वाती :काय करणार मॅडम. प्रत्येकालाच कार्यालय, दुकाने, महाविदयालयात पोहोचायची घाई. सर्वजण आपआपली वाहने घेऊन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे ऑटोकॅबद्वारे इच्छित स्थळी पोहोचण्याची धावपळ करत असतात.

वल्लरी: आजच्या गतिमान आयुष्यात बहुधा ‘थांबला तो संपला’ याची भीती प्रत्येकाच्या मनात ठाम रुजली आहे. प्रत्येकाला लवकरात लवकर ‘त्या’ ठिकाणी जायचे आहे. वाहनांच्या गर्दीतून पादचारी व्यक्तीला रस्ता ओलांडतांनाही खूप दक्षता घ्यावी लागते.

स्वाती : रस्त्यांवरील गर्दीच्या यावेळी बऱ्याचदा अपघातही होतात. वाहतुकीची कोंडी नित्याचीच.

वल्लरी :वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे अनेक अपघात होतात. मोटार वाहन कायदयात खालील बाबी अधोरेखित करण्यात आल्या आहेत.

(१) चुकीच्या पद्धतीने अथवा चुकीच्या ठिकाणी ओव्हरटेक करणे. पुढच्या वाहनाला मागे टाकून पुढे जाण्याचा हव्यास अपघाताला कारणीभूत होतो.

(२) अतिवेगाने वाहन चालविणे अनेक वाहनचालकांना कमी वेगाने वाहन चालविताच येत नाही. वेगमर्यादेचे पालन प्रत्येकाने करणे कायदयाने बंधनकारक आहे.

(३) दोन वाहनांत सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे बरेचसे अपघात होतात. ब्रेक दाबल्याक्षणी जागेवर उभे राहणारे (Instant breaking) वाहन हे अदयाप अस्तित्वात आलेले नाही.

(४) मदय वा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे हे अपघातास कारणीभूत ठरते.

(५) बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. रस्त्यावरील गर्दी, वेग सार्वजनिक फलक यांचा मेळ घालून अनेक होणारे अपघात आपण नक्कीच टाळू शकतो.

स्वाती : खूप चांगली ब महत्त्वपूर्ण माहिती आपण दिली. धन्यवाद.

वल्लरी: धन्यवादाची आवश्यकता नाही. मी माझे कर्तव्य केले. तुमच्यासारख्या विद्यार्थिनीला समजावून सांगितले. तू ही इतरांना सांगावे हीच अपेक्षा. आपली सुरक्षितता आपल्यावरच अवलंबून आहे.

स्वाती :पुनश्च एकवार धन्यवाद मॅडम.

                   तोंडी परीक्षा

‘वाहतूक सुरक्षेची गरज’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण तयार करा.

उत्तर : वाहतूक सुरक्षेची गरज

सन्माननीय परीक्षक व माझ्या विदयार्थी मित्र-मैत्रिणींनो. आजच्या गतिमान जीवनप्रवासात दिवसेंदिवस रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण अनेक कारणांमुळे वाढत चालले आहे. अपघाताच्या घटना नित्याच्या बनत चालल्या आहेत. वाहतुकीचे नियम पाळणे, भरधाव वेगात वाहन चालविणे यांमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे. वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे. अपघाताच्या दुर्दैवी घटना रोखण्यासाठी सर्व वाहनधारकांनी, रस्त्यावरील पादचारी व्यक्तींनी आपआपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे.
वाहतूक सुरक्षेची जबाबदारी केवळ विशिष्ट विभागाची नसून ती गर्दीचा भाग असणाऱ्या आपणा सर्वांची आहे. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या आपल्या देशात सर्वाधिक आहे. नैसर्गिक मृत्यूनंतर सर्वाधिक मृत्यू हे आपल्याकडे रस्ते अपघातात होतात. म्हणूनच वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास वेळेचा अपव्यय तर होतोच पण शेकडो जीवही जातात हे सर्वांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बेशिस्त वाहतुकीचे चक्र कुठेतरी थांबलेच पाहिजे. हेल्मेट, सीटबेल्टचा वापर प्रत्येक वाहनधारकाने केला पाहिजे. वाहन चालविताना सिग्नल जम्पिंग, राँग साईड वाहन चालविणे अशा बाबी आपण टाळल्या नाही तर ‘अति घाई, संकटात नेई’ हे होणारच. वाहनांच्या वर्गाप्रमाणे (दुचाकी, कार – जीप सारखी हलकी वाहने, टॅक्सी-रिक्षा, प्रवासी वाहने, अवजड वाहने, ट्रक इ.) वेगाची मर्यादा मोटार वाहन कायदयात आहे. रस्त्यांवर वेगासाठी सांकेतिक फलक असतात. परंतु या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून वाहने भरधाव धावत असतात. अपघात टाळण्यासाठी काही वाहनांना वेग नियंत्रक (स्पीड लिमिट डिव्हाइडर्स वा स्पीड गव्हर्नर) बसविणे बंधनकारक आहे. कायदे पाळणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु आजहीआपल्या कर्तव्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. दोन वाहनांत सुरक्षित अंतर न राखल्यामुळे अनेकदा भीषण अपघात होतात. वाहन चालविण्याचा परवानाही (लायसन्स) अनेकांजवळ नसतो.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे टाळल्यास, ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूने केल्यास समोरील वाहनचालकाला आपण स्पष्ट दिसतो. कर्णकर्कश्श व विचित्र हॉर्न विनाकारण वाजवणे टाळता येते. हेडलाईट, ब्रेकलाईट, इंडिकेटर, आरसे, वायपर्स सुस्थितीत असल्याची खात्री करा. वेगावर नियंत्रण ठेवा, झिजून गुळगुळीत झालेले धोकादायक टायर्स बदला, रात्रीच्या वेळी डिमरचा वापर करा. घाटात इंजिन बंद वा न्युट्रल करणे टाळा. अवघड वळणावर ओव्हरटेक करू नका हे आपल्याच हातात आहे. रस्त्यांवरील पादचाऱ्यांनी झेब्रा क्रॉसिंगजवळ ‘थांबा- पहा-जा’ ची सतर्कता दाखविणे आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), पोलिस प्रशासन
यांच्या नियमांचे पालन प्रत्येकाने केल्यास आपण अपघात नक्कीच टाळू शकतो. १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्ताने विविध उपक्रम संपन्न होतात. अपघात होऊ नये म्हणून कोणती व कशा प्रकारची काळजी आपण घेतली पाहिजे हे समजावून सांगितले जाते. सप्ताहापूरतीच ही वाहतूक सुरक्षा नाही. अखंडपणे व जागरूक नागरिकाने सदैव स्मरणात ठेवावी अशी ही नियमावली आहे. वाहतुकीचे नियम पाळूया, सुरक्षित प्रवास करूया.

Leave a Comment