Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 : रोज मातीत (roj matit)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2 Solutions रोज मातीत (roj matit Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 2 रोज मातीत Textbook Questions and Answers

Table of Contents

Telegram group मध्ये जॉईन व्हा

उत्तर:

‘अ’ गट ‘ब ‘ गट
(१)नाही कांद ग,जीव लावते.(अ)स्वतः चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.
(२)काळया आईला, हिरव गोंदते.(आ)गोंदणाच्या हिरव्या नक्षिप्रमाने शेत पिकाने सजवते.
(३) हिरवी होऊन, मागं उरते.(इ)अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.

★ कृती – २. खालील ओळींचा अर्थ लिहा.

सरी – वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं गं, जीव लावते
बाई लावते (मार्च, २०२२)

उत्तरः शेतकरी स्त्रीच्या कष्टाचं वर्णन या कवितेत कल्पना दुधाळ यांनी चित्रित केलं आहे. त्या स्वतः शेतकरी आहेत. एक स्त्री जसं एखादं घर जिव्हाळ्यानं सांभाळते, तसंच शेतही जिव्हाळ्यानं सांभाळते. भाज्या, शेत पिकवताना तिच्या कष्टाची दखल घेतली जातेच असं नाही. शेतकरी स्त्री मातीच्या वाफ्यातून, सरीतून कांदे लावते, पण ती केवळ कांदा लावत नाही तर त्या कांदयातही ती जीव लावते. कांदा पेरल्यानंतर तो तयार होईपर्यंत त्याची ‘निगराणी करणं, तो नीट काढणं, तो बाजारात पोहोचेपर्यंत त्याची नीट देखरेख करणं या सर्वच गोष्टी ती मनापासून करते. त्याच्यावर तिचा संसार उभा राहणार असतो याची तिला कल्पना आहे. ते तिच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे त्याच्यावरही ती जीव लावते. बाई मुळातच सर्व गोष्टी मनापासून करते. माया, ओढ, वात्सल्य तिच्या हृदयात असतं. माणसं असो वा पीक या सर्वांवरच ती माया करते.

★ कृती ३. काव्यसौंदर्य:

(अ) ‘काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते’, या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. (मार्च, २०२२)

उत्तर: शेतात काम करणारी स्त्री आपल्या संसारात जशी | समरसून काम करते तशीच ती आपल्या शेतातही मनापासन राबते. काळी माती ही तिची आईच असते.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

या आईची सेवा ती इमाने इतबारे करीत असते. काळ्या आईच्या शरीरावर फुलणारं शेत बाईच्या कष्टामुळे फुललेलं असतं. गोंदण हा एक प्रकारे स्त्रीच्या सौंदर्याचा भाग समजला जातो. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या कपाळावर, मानेवर, हातावर गोंदून घ्यायच्यात. कवयित्री आपल्या काळ्या मातीत जे काही पिकवते त्यामुळे त्या काळ्या आईला शोभा येते. लेक जणू काही आपल्या आईला सुंदर नटवते. असा प्रत्यय या ‘काळ्या आईला हिरवं गोंदते’ या ओळीत येतो. काळी आई आणि तिला गोंदवणारी तिची लेक दोन्ही पण बायकाच, थोडंसं गोंदवून घेणारी तीच, गोंदवणारी पण तीच, गोंदण खूप वेदनादायी असतं.

(आ) ‘नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते’

या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः कल्पना दुधाळ यांनी लिहिलेल्या रोज मातीत या कवितेत शेतकरी महिलेच्या कष्टाचे वर्णन येते. शेतात ऊस लावल्यावर ऊस लावताना उसाचे छोटे छोटे तुकडे मातीत पेरावे लागतात त्याला बेणं दाबणं म्हणतात. बेणं मातीत रुजलं की त्याला कोंब फुटतात आणि ऊसाचं पीक तयार होतं. बेणं जसं मातीत दाबलं जातं तसं बाईसुद्धा आपलं मन दाबते. मन मारते. आयुष्यातील सुंदर कोंब, पीक जपायचे असेल तर तिलापण तिचं मन दाबावं लागतं. मनातल्या अनेक गोष्टी माराव्या लागतात. उसाच्या काड्या, बेणं दाबून ऊसाची लागवड केली जाते. संसारासाठीसुद्धा बाई काड्या जमवते आणि संसार सांधत राहते. संसाराची जुळवाजुळव करत राहते. हे सर्व करताना तिच्या मनातील इच्छा अपुऱ्याच राहतात. त्याचा गाजावाजा न करता, मन मारून आपल्या कुटुंबाकरिता ती विनातक्रार कष्ट करत राहते.

कृती-४. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

उन्हातान्हात,रोज मरते

हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदतेबाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उत्तरः कवयित्री कल्पना दुधाळ लिखित ‘रोज मातीत’ या कवितेत मातीमध्ये कष्ट करणाऱ्या स्त्रीचे मनोगत व्यक्त केले आहे. आपला संसार फुलवण्यासाठी शेतीची लागवड, राखण इत्यादी सर्व कष्टाची कामे ती करत असते.
घरातील कामे आणि शेतीतली कामे दोन्ही ठिकाणी ती कष्ट करत असते.शेतकऱ्याच्या कष्टाबरोबर शेतकरी स्त्रीचे कष्टही असतात त्याची जाणीव या कवितेत कवयित्री करून देते. त्या कष्टाचे वर्णन कवयित्री या पुढील ओळींत करून देते.
उन्हातान्हात कामं करताना तिचा जीव थकून जातो. तळपता सूर्य, त्यात विहिरीतील पाणी शेंदणं याने तिचाही जीव मेटाकुटीला येतो. नको ते कष्ट, संसार असं तिलाही वाटत राहतं. पण तरीही तिनं जीव लावलेला असतो आपल्या शेतावर, घरात, पीकावर, घरातली माणसं यांच्यासाठी ती काम करते. आपल्या मागेसुद्धा हे हिरवेपण कायम रहावं याकरता पै पैका जोडून ठेवते. आपल्या मृत्यूनंतरही हे हिरवंपण राहिलं पाहिजे याकरता ती आपल्या मुलांना शेतीची कामं शिकवून जाते. ती म्हणते की शेतीची कामं करताना उन्हातान्हात बाई रोज मरत असते. आपल्या संसाराचा ताजेपणा, हिरवेपणा टिकून रहावा म्हणून ती पण तिच्या मनाचा हिरवेपणा टिकवून ठेवते. दोन्ही ठिकाणच्या कष्टांनी तिचा जीव थकून जातो. इतर प्रापंचिक जबाबदाऱ्या, घरातलं घरपण टिकवून ठेवता ठेवता मनालाही ताजंतवानं ठेवावं लागतं. आपल्या शेताला हिरवंगार ठेवण्यासाठी बाई खोल विहिरीचं पाणी शेंदत राहते. विहितीतून पाणी काढून ते शेताला सोडणं हे जिकिरीचं काम, विहिरीत पाणी अगदी खोलवर गेलेलं आहे ते काढताना हात, पाय, कंबर, पाठ या सर्वच अवयवांवर ताण येतो. त्याने शरीर थकून जातं. पण तरीही कोठेही तो ताण आपल्या चेहऱ्यावर दाखवत नाही. या शेतात राबता राबता या शेतातही ती नांदत असते. शेतातला हिरवेपणा कायम रहावा म्हणून कष्ट करत ती जगते, नांदते.

★ कृती – ५. अभिव्यक्ती.

(अ) शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. (सप्टें., २०२१)
उत्तरः कवियित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी महिलेच्या कष्टाचे वर्णन ‘रोज मातीत’ या कवितेत केले आहे. कल्पना दुधाळ या स्वतः शेतकरी महिला आहेत. बालपणापासून शेतीच्या कामात आईवडिलांना मदत करत असल्यामुळे शेतीशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती.
शेतकरी स्त्रीला घरातल्या कामांसोबत शेतीतल्या कामाचीही जबाबदारी स्वीकारावी लागते. घरातील आणि शेतीची कामं कष्टाचीच. दोन्ही ठिकाणी राबताना तिच्या इच्छा, आकांक्षा बाजूला राहतात. पण शेत, घर या दोन्हींवर तिचा जीव असल्याने ती हसत हसत या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते. शेतातली विविध कामं असतात जसे भाजणी, पेरणी, लावणी, पाणी शेंदणे, कापणी, मळणी. या व्यतिरिक्त तिला अनेक कामं असतात. शेतकऱ्याच्या बरोबरीनं शेतकरी स्त्री ही कामं करत असते. कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, कांदा असो वा ऊस त्यांची लागवड करताना शेतकरी स्त्री केवळ कांदा, ऊस लावत नाही. तर त्यांच्यावर जीवही लावते. काळ्या मातीला हिरवाईने फुलून येण्यासाठी ती कष्ट करते.
काळ्या मातीत पीक तरारून आल्यावर काळ्या मातीवर हिरवं गोंदण केल्यासारखं वाटतं. हे करताना रोज मातीमध्ये बाई नांदत असते. शेतकऱ्यासोबत विवाह केल्यानंतर त्याच्या घरात तर ती नांदतेच आणि त्याच्या शेतातही ती नांदते. आपल्या शेतात लावलेली विविध फुलंही शेतकरी स्त्रीची आवडती असतात. झेंडूची शेती केलेल्या शेतात झेंडूची फुलं तोडताना तिच्याही जीवाला यातना होतात. या फुलांवर तिचं मनस्वी प्रेम असतं. त्यांना तोडताना कवयित्रीला वाटतं जणू काही झाडांचा देहच आपण तोडत आहोत. एकीकडे या तोडलेल्या फुलांचे ती घरादाराला तोरण लावते. घर सुशोभित करते. बाईदेखील या झेंडूसारखाच आपला देह कुटुंबाकरता समर्पित करते. घरातला उत्साह कायम राहण्यासाठी तिचे सर्वत्र प्रयत्न चालू असतात. सर्व सुखं लाभावीत म्हणून ती मातीत राबराब राबून कामे करते.
आपल्या शेतात उसाची लागवड करताना उसाचा डोळा (बेणं) मातीत ती दाबते. बेणं दाबते तसंच आपलं मनही ती दाबते. अनेक आशा, स्वप्नं दाबून स्वसुखापेक्षा कौटुंबिक सुखाकडे ती लक्ष पुरवते. चिमणी जसं काड्या, काड्या जमवून घरटं बांधते तसेच बाईपण पै पैसा जमवून, घरात लागणाऱ्या छोट्या गोष्टी जमवून संसार उभा करते. यासाठी ती घरात, शेतात कष्ट करून नांदते.
उन्हातान्हात ही बाई कामे करून रोज मरत असते. पण शेतातला, आयुष्यातला, घरातला हिरवेपणा टिकवायचं काम करते. आपल्या कष्टाबाबात तक्रार न करता ते सोसून आपल्या संसारासाठी झिजत राहते. शेत पिकवता पिकवता ती स्वत:ला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करते. शेतीकरता खोल विहिरीतलं पाणी काढून शेताला पाणी पाजण्याचे काम करते. सुखसमाधानानं जगण्याचा प्रयत्न ती करत राहते. शेतकऱ्याचे कष्ट आपण लक्षात घेतो. पण घरात-दारात – शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीचे कष्ट मात्र विसरले जातात. या कवितेतून ती शेतकरी स्त्री आपल्या आयुष्याच्या कष्टाचा पटच आपल्यासमोर मांडतेय.

(आ) तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर: माझ्या अवतीभवतीचा परिसर हा शहरी भागातला आहे. चाळवजा निवासी संकुलात मी राहते. माझ्या शेजारच्या मावशी सकाळी घरातील सर्व कामं उरकून घरकामासाठी विविध गृहसंकुलात जातात. सकाळी ७.०० वाजता घराबाहेरील सार्वजनिक नळावर पाणी भरून, धुणीस्वयंपाक-भांडी ही सर्व घरातील कामं करून त्या ८.३० ला आपल्या कामांकरता बाहेर पडतात. कुणी स्वयंपाकाची कामं करतं, कुणी धुणी-भांडी तर कुणी पाळणाघराची कामं करतात. यातील काही कामं १०१२ जणांच्या घरी जाऊन करावी लागतात. एकाच गृहसंकुलात ती कामं मिळतील असं नियोजन त्यांनी केलेलं असते. या कामाचे जे पैसे मिळतात त्यातून घरच्या आर्थिक तरतुदीसाठी या बायका मदत करत असतात.
नवऱ्याच्या पगारात आपल्या कुटुंबाच्या सर्व गरजा भागत नाहीत हे लक्षात आल्यावर स्वतःहून त्या अशा कामांकरता घराबाहेर पडतात. परिणामतः त्यांच्यास्वतःच्या मुलांकडे त्यांचे काही वेळेस दुर्लक्ष होते. मुलांच्या खाण्यापिण्याकडे, आरोग्य, शिक्षण यांकडे त्या पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. आपल्या घराला सुख, ऐश्वर्य मिळावं म्हणून या बायका सदैव कष्ट करत राहतात. यातल्या बऱ्याचशा बायका सुशिक्षितही आहेत. नवऱ्याला नोकरी नाही. नवरा नाही, सासरच्या छळातून जरा मुक्तता मिळावी, पैसे कमावल्यावर सासरच्यांचा छळ कमी अशी प्रत्येकीच्या दुःखाची किनार वेगवेगळी असते. आपल्या दुःखावर त्या आपणच उत्तर शोधतात.

प्र. २. खालील ओळींचे रसग्रहण करा.

सरी – वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
काळ्या आईला, हिरवं गोंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते

उत्तर : कल्पना दुधाळ लिखित ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहातील ‘रोज मातीत’ या कवितेत शेतकरी स्त्रीचं आयुष्य, कष्ट, जगणं याचं वर्णन आलेलं आहे. कवयित्री शेतकरी महिलेच्या कष्टाचं वर्णन करता करता तिच्या स्त्रीसुलभ भावनांचेही दर्शन घडवते. कोणतीही स्त्री कोणतंही काम करताना ते मनापासून करते. सरीमध्ये वाफ्यामध्ये कांदे लावताना ती तिचं मनही, जीवही त्यात लावते. आपल्यातील जिव्हाळा त्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न करते. ज्या शेतात ती पिकांची लागवड करते तिला ती आई मानते. काळ्या मातीला हिरवं करण्याचा, तिला तजेला देण्याचा बाईचा प्रयत्न कायम असतो. गोंदण हे भारतीय परंपरेत स्त्रीचा एक दागिना म्हणून समजला जातो. गोंदण हिरव्या रंगाचं असतं. इथं आपल्या आईला सजवण्याचा प्रयत्न मातीची लेक करते. मानवी संस्कृतीत जन्म देणारी आई, पालनपोषण करणारी आई अशा दोन मातांचा उल्लेख आढळतो. इथे पालनपोषण करणाऱ्या आईला सुंदर करण्याचा प्रयत्न लेकीचा दिसतो. संसारात ती नांदते. तसंच या मातीतही ती नांदते. नांदणं म्हणजे सर्वांना सामावून घेऊन, सांभाळून घेऊन जगणं. प्रत्येक स्त्रीला सासरी नांदावे लागते. आपली भारतीय परंपरा स्त्रीवर हा इतका भार टाकते. ते या नांदते या शब्दामागील अर्थ जाणल्यावरच समजते.

प्र. ३. रसग्रहण करा.

फुलं सोन्याची, झेंडू तोडते
बाई तोडते
नाही फुलं ग, देह तोडते
बाई तोडते
घरादाराला, तोरण बांधते
बाई बांधते
रोज मातीत, मी-ग-नांदते,
बाई नांदते.

उत्तर : कल्पना दुधाळ लिखित ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहातील रोज मातीत या कवितेत शेतकरी स्त्रीचं आयुष्य, कष्ट, जगणं याचं वर्णन आलेलं आहे. शेतात झेंडूच्या फुलांचे अमाप पीक आलेलं आहे. त्या केशरी रंगाच्या फुलांना कवयित्री सोन्याची फुलं म्हणतआहे. त्या फुलांच्या रंगावरही तिचा जीव बसलेला आहे. या फुलांना तोडू नये असं तिलाही वाटतं पण पोटापाण्याचा प्रश्न महत्त्वाचा भावनेपेक्षा व्यवहार महत्त्वाचा त्यामुळे ती फुलं तोडते. पण फुलं तोडताना तिला वाटतं की आपण फुलझाडांचा देहच तोडतोय. खरंतर शेतकरी स्त्रीदेखील स्वतःचा देह तोडूनच संसारवेलीची फुलं फुलवत असते. स्वतःच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न सर्वच कधी ओठांवर येऊ न देता ती आपल्या सुखी संसारासाठी मन मारत राहते. आपल्या घराला शोभिवंत, सुंदर करण्याकरता शेतातील झेंडूची फुले तोडून घर सजवते. त्याप्रमाणे आपला राग, वेदना, स्वप्नं, इच्छा या गोष्टी तोडून ती घरातील सुख, समाधान कायम ठेवण्याचा प्रयत्न करते.

उपक्रम

(अ) शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

उत्तर: प्रश्नावली:

(१) उषाताई, आपण शेतीच्या कामाला कधीपासून सुरुवात केली ? (लग्नाआधीही करत होता की लग्न झाल्यानंतर सुरुवात केली ? )

(२) शेतीची कामे, घरची कामे दोन्ही कसे सांभाळता ?

(३) शेतीची कामे करायला आवडतात का ? की गरज म्हणून करता ?

(४) शेतातील कामे करताना कोणत्या अडचणींना तोंड दयावे लागते ?

(५) शेतीतून किती उत्पादन मिळते?

(६) शेतात कोणती पिके घेता ?

(७) शेतीच्या कामात कुटुंबातील इतर सदस्यांची मदत मिळते का ?

(८) तरुण पिढीला शेतीक्षेत्रात येण्यासाठी, प्रोत्साहन

देण्यासाठी काय सांगाल ?

(९) शेतीच्या मदतीच्या दृष्टीने शासनाकडून काय अपेक्षा आहेत ?

(आ) यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका.
उत्तरः विदयार्थ्यांनी स्वतः हा उपक्रम करावा.

तोंडी परीक्षा
प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : दररोज मातीत (शेतात) कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत ‘रोज मातीत’ या कवितेत व्यक्त केले आहे. या कवितेत शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीची वेदना, कष्ट यांचे प्रकटीकरण कवयित्री करतात.सरीमध्ये, वाफ्यामध्ये कांदयांची लागवड केली जाते. शेतकऱ्याबरोबर शेतकरीणसुद्धा ही लागवड करते. शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते. कांदयाची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते. पिकांचं हिरवं गोंदण काळ्या आईवर तिनं चढवलं. आपल्या घरात जशी बाई नांदते. घराचं घरपण कायम ठेवते.

शेतात झेंडूचं पीक खूप आलं आहे. त्यावरील सोनेरी फुलांनी अवघं शेत सोनेरी झालंय. ती फुलं तोडू नये असं तिला सतत वाटत राहतं. फुलं तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय. बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो. तिचं मनही तोडलं जातं. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते. दाराला तोरणं बांधते. फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते.

शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते. शेतात ऊसाचंही पिक लावलं जातं. ऊस लावताना ऊसाच्या डोळ्याच्या बाजूचा थोडा भाग असतो. ऊसाच्या डोळ्यासकट तो मातीत पुरावा लागतो. त्याला बेणं दाबणं असं म्हटलं जातं. शेतकरी स्त्री हे बेणं पायाने मातीत दाबते. संसाराचे खाचखळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्नं विसरावी लागतात. आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते तसं शेतकरी स्त्रीदेखील आपला संसार काड्या काड्या जमवून सांधते.

शेतातलं काम कष्टाचं काम असतं. घरातलीही सर्व कष्टाची कामं, शेतातलीही कष्टाची कामं शेतकरी स्त्री करते. या कष्टांमुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करते. तिला कायम हिरवं रहावं लागतं. संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही. शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शेंदून शेताला पाणी पाजावं लागतं. ते पाणी खोल विहिरीतून शेंदताना प्रचंड जोर लावावा लागतो. हे पाणी शेंदणं, इतर सर्व कामं या सर्वात ती नांदत राहते. आपल्या घरासाठी, शेतासाठी ती राब राब राबते. आपल्या ओढग्रस्त संसाराला मदत करण्यासाठी उन्हातान्हाचा विचार न करता शेतकरी महिला कांदयाच्या लावणीसारखी वा उसाच्या लागवडीसारखी अत्यंत मेहनतीची कामे करत राहते. हिरवीगार शेती पिकण्यासाठी शेतकरी स्त्री रोज श्रम करून, मर मर मरून, सर्वस्व अर्पण करते, तेव्हा शेतात हिरवेगार पीक येते.

वाकप्रचार:
हिरवं गोंदणे – गोंदणाच्या नक्षीसारखी लावलेली हिरवी रोपे.
बेण दाबणे – ऊसाचे तुकडे (कांड्या) शेतातील सरीमध्ये पायाने दाबून लावणे.

शब्दार्थ :
वाफा -अळे, लहान खाचर (bed of garden), झेंडू – फुलाचे नाव (marigold ), देह – शरीर ( body), सांधणे – जोडणे ( to join to unite), तोरण- दारावर बांधण्याची माळ इ. ( मंगल चिन्ह)( lintel, a wreath of leaves hung at entrance)

कवयित्री परिचय: कल्पना दुधाळ या सध्याच्या काळातील दर्जेदार, वेगळेपणा राखून काव्यलेखन करणाऱ्या कवयित्री आहेत. वाचनलेखनाची कोणतीही परंपरा नसलेल्या शेतकरी कुटुंबातील त्यांचा जन्म आहे. बालपण शेतीत कष्ट करता करता गेलं. विवाह झाला तो ही शेतकरी कुटुंबात, त्यामुळे मातीशी एक अनामिक नातं त्यांचं तयार झालं. घर आणि शेती यांतील कष्टप्रद अनुभवातून त्यांची कविता स्त्रीवेदना प्रकट करत राहते, तशी प्रतिमा, प्रतीके त्यांच्या कवितेतून येत राहतात. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी हे कवयित्रीचे मूळ गाव. शेतातच घर असल्यामुळे गावात शाळेसाठी जाणं येणं असायचं. दहावीला टेंभुर्णीच्या शाळेतून त्या पहिल्या आल्या त्यामुळे घरच्यांनी पुढचं शिक्षण घेऊ दिलं. बारावीतही उत्तम गुण मिळाले हे पाहून चुलत्यांनी पुण्यातल्या एस. एन. डी. टी. महाविद्यालयात त्यांच्या शिक्षणाची सोय केली. पण पदवीपरीक्षेच्या आधीच त्यांचा विवाह झाला. पण पदवीची परीक्षा दिली त्यात वरिष्ठ श्रेणीत त्या उत्तीर्ण झाल्या. कवितेसोबत मैत्री होताना स्वतः विषयीचं आत्मभान जागृत होत गेलं. गेल्या दहा वर्षांत त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. ‘सिझर कर म्हणतेय माती’, ‘धग असतेच आसपास’ या दोन्ही कवितासंग्रहातील कविता अस्सल जीवनभान व्यक्त करणाऱ्या आहेत. त्यांच्या कवितांत भोवतालची माणसं, निसर्ग, गुरं – ढोरं, पशु-पक्षी, शेतीभाती, आजूबाजूचं वातावरण या सर्व घटकांना समावून घेणारी कविता कल्पना दुधाळ यांची आहे. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहाला ‘कवी कुसुमाग्रज’ पुरस्कारासह एकूण अठ्ठावीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘धग असतेच आसपास’ साठी ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ चा ललित ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे.

कवितेचा भावार्थ:

सरी-वाफ्यात,…………………..

…………….मी ग नांदते बाई नांदते

कवयित्री कल्पना दुधाळ यांचं जीवन माती, शेतीशी बांधलं गेलंय. बालपणापासून शेतकरी जीवन अनुभवलेल्या या कवयित्री. ‘रोज मातीत’ या कवितेत शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीची वेदना, कष्ट यांचे प्रकटीकरण कवयित्री करतात. | कवयित्री म्हणतात सरीमध्ये वाफ्यामध्ये कांदयांची लागवड केली जाते. शेतकऱ्याबरोबर शेतकरीणसुद्धा ही लागवड करते. | शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते. कांदयाची लागवड करून काळ्या मातीवर ती हिरवेपणा गोंदते. पूर्वीच्या स्त्रीच्या अंगावर, कपाळावर गोंदण केलं जायचं. सध्याच्या काळात त्याला टॅटू म्हणून संबोधलं जातं. हे गोंदण हिरवं असतं. कवयित्रीने इथे काळ्या आईला आपल्या कष्टानं सजवलं आहे. पिकांचं हिरवं गोंदण काळ्या आईवर तिनं चढवलं. आपल्या घरात जशी बाई नांदते. घराचं घरपण कायम ठेवते.

फुलं सोन्याची,……………………
……………मी ग नांदते बाई नांदते

मी ग नांदते बाई नांदते शेतात अमाप झेंडूचं पीक आलं आहे. त्यावरील सोनेरी फुलांनी अवघं शेत सोनेरी झालंय. ती फुलं तोडू नये असं तिला सतत वाटत राहतं. पण फुलांची शेती पैसा मिळवण्यासाठीच तर केलेली असते. फुलं तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय. हा फुलांचा देह तो तोडण्याचा आपल्याला काय बरं अधिकार आहे. बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो. तिचं मनही तोडलं जातं. मनासारख्या सर्वच गोष्टी होत असतात असं नाही. तरी आपल्या घराच्या सुख, समाधानाकरता ती सर्व सहन करते. या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते. दाराला तोरणं बांधते. फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते. आपल्या देहाचंही फूल करून घराला सुगंधी, शोभिवंत बाई करत असते. आपल्या घरात शेतात, शेतकरी बाई नांदते, सर्वांना सामावून
घेत नांदते.

ऊस लावते,………………………
…………….मी ग नांदते बाई नांदते

शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते. शेतात ऊसाचंही पिक लावलं जातं. ऊस लावताना ऊसाच्या डोळ्याच्या अलिकडचा पलिकडचा (डाव्या-उजव्या) बाजूचा थोडा भाग असतो. ऊसाच्या डोळ्यासकट तो मातीत पुरावा लागतो. त्याला बेणं दाबणं असं म्हटलं जातं. पायाने हे बेणं मातीत दाबावं लागतं. शेतकरी स्त्री हे बेणं मातीत दाबते, त्याच्यासोबत ती तिचं मनही दाबते. संसाराचे खाचखळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न बाजूला ठेवाव्या लागतात. आपल्या संसारासाठी सुगरण जशी काड्या काड्या जमवते तसं शेतकरी स्त्रीदेखील आपला संसार काड्या काड्या जमवून सांधते. संसार जोडला तरच तो टिकतो. ते जोडण्याचं, सांधण्याचं काम बाईच करते. या मातीत ती आपला संसार फुलवते.

उन्हातान्हात, रोज …………………
…………….मी ग नांदते बाई नांदते

शेतातलं काम कष्टाचं काम असतं, पीकासाठी कोळपणी करणं. लावणी, पाणी शेंदणं, कापणी करणं, मळणी करणं या सर्वात बाईला शारीरिक कष्ट सहन करावे लागतात. घरातलीही सर्व कष्टाची कामं, शेतातलीही कष्टाची कामं, ही कामं करून आपण थकलोय हे म्हणण्याची तिला सोय नसते. शेतकरी घरातून निघताना वा घरी आल्यावर घरकामं करतोच असं नाही. पण शेतकरी स्त्रीला मात्र आपल्या पोराबाळांसाठी, सासरच्या माणसांसाठी कितीही थकली तरी चूल पेटवावी लागते. या कष्टांमुळे ती रोज मरणप्राय यातना सहन करते. रोज मरावं लागतं ते कष्टामुळे आणि सासरच्या त्रासामुळेही, पण तिला मरून कसं चालेल? तिला कायम हिरवं रहावं लागतं. संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही. ती आजारी पडली, थकली तर अवघा संसार ठप्प होईल. म्हणून सहन करत करत संसारमायेपोटी ती आपला उत्साह कमी करत नाही. शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शेंदून शेताला पाणी पाजावं लागतं. ते पाणी खोल विहिरीतून शेंदताना प्रचंड जोर लावावा लागतो. हे पाणी शेंदणं, इतर सर्व कामं या सर्वात ती नांदत राहते. आपल्या घरासाठी, शेतासाठी ती राब राब राबते.Leave a Comment