Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3: आयुष्य…आनंदाचा उत्सव (aayushy aanandacha utsav )

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3. Solutions आयुष्य आनंदाचा उत्सव (aayushy aandacha utsav Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Textbook Questions and Answers

(आ) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.
(१) यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

उत्तर : योग्य

(२) पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
उत्तर : अयोग्य

(३) शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
उत्तर: अयोग्य

(४) यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
उत्तर : योग्य

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(इ) हे केव्हा घडेल ते लिहा.

(१) माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा …

उत्तर: आनंद माणसाच्या मनात मावेनासा झाल्यावर माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासां वाटतो.

(२) माणूस दुःखातून बाहेर पडत नाही, जेव्हा…

उत्तर: माणूस दुःखातून बाहेर पडत नाही, जेव्हा माणूस आनंदासाठी मनाची कवाडे कायमची बंद करून टाकतो. दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटून घेतो त्यामुळे आतलं दु:ख बाहेर जात नाही व बाहेरचा आनंद आत येऊ शकत नाही.

(३) आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा…..

उत्तर : आनंद हा तुमचा स्वभाव होईल जेव्हा आनंद हा घ्यायचा असतो. कुणी देईल याची वाट पाहायची नसते. हे समजेल व आनंद घ्यायचे तंत्र जमेल तेव्हा.

(४) एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा…

उत्तर : कलेच्या मस्तीत जगता आलं एखादया कलेशी दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्या विश्वात वावरता येतं.

* कृती- २. (अ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

(१) मनाची कवाडं (२) आनंदाचा पाऊस

उत्तर : (१) मनाची कवाडं – मनाचे दरवाजे (२) आनंदाचा पाऊस -खूप आनंद

(आ) योग्य पर्याय निवडा व लिहा.

(१) माणसं स्वतः चा छंद कसा विसरू शकतात ? या वाक्याचे विधानार्थी वाक्य – (मार्च, २०२२)

(अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.

(आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.

(इ) माणसं स्वतः चा छंद विसरू शकत नाहीत.

(ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.

उत्तर:(इ) माणसं स्वत: चा छंद विसरू शकत नाहीत.

(२) हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य –

(अ) हा आनंद कुठे नसतो ?
(आ) हा आनंद कुठे असतो ?
(इ) हा आनंद सर्वत्र नसतो का ?
(ई) हा आनंद सर्वत्र असतो का ?

उत्तर : (अ) हा आनंद कुठे नसतो ?

(३) किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य – –

(अ) ती आतून हसतात.
(आ) ती फार हसतात आतून.
(इ) ती आतून हसत राहतात.
(ई) ती खूप आतून हसतात.
उत्तर : (ई) ती खूप आतून हसतात.

(ई) खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.
(१) स्वत:च्या आवडीचे काम निवडा.-
(२) लोकांना पेढे वाटणं वेगळं.-
(३) कष्टाची भाकर गोड लागते.-

उत्तर (१) स्वत:च्या आवडीचे काम निवडा.-कर्मणी प्रयोग.
(२) लोकांना पेढे वाटणं वेगळं.-भावे प्रयोग.
(३) कष्टाची भाकर गोड लागते.-कर्तरी प्रयोग.

(उ) ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

…….. …….. ……. …….
उत्तर : निखळ, आत्मिक, खरा, टिकाऊ, विकाऊ

★ कृती ४. स्वमत :

(अ) ‘जे काम करायचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.

उत्तर : प्रत्येकजण आनंद मिळावा म्हणून धडपडत असतो. पण कित्येकांना तर आनंद म्हणजे काय ? हेच माहीत नसते असे आपल्याला त्यांना बघितल्यावर वाटते. सर्व असूनही एखादी व्यक्ती आनंदी नसते. कारण आनंद मिळवण्यासाठी आनंद मनात असावा लागतो. तो छोट्या छोट्या गोष्टीतून घेता आला पाहिजे.

एखादया ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे, पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. ज्याला आनंदी आयुष्य जगायचं असेल त्याने तेच क्षेत्र निवडावं ज्यात स्वत:च्या आवडीचं काम करायला मिळेल. पण काही वेळा हे शक्य नसतं. हवं तेच काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी ‘जे काम करायचं आहे त्यात आनंद घेण्यास शिकणं हेही शक्य असतं.’ आपण आसपास कित्येक माणसं आनंद घेत काम करताना बघतो. त्यांच्याकडून हे आपण शिकले पाहिजे. भले आवडीचे काम मिळाले नसेल पण तिथे आवडीचे सहयोगी असू शकतात. मुळात आपण छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याकडे आहेत त्यात आनंद शोधला तर आपण आनंद घ्यायला शिकतोच.

(आ) ‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.

उत्तर : कोणाला कोणती गोष्ट आवडेल, सुंदर वाटेल ते सांगता येत नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. एखादयाला एखादी जुनी गोष्ट टाकाऊ, खराब वाटेल तर एखादयाला तीच गोष्ट जतन करण्यायोग्य सुंदर वाटेल,
उपयोगी वाटेलम्हणजेच सौंदर्याची एक अशी व्याख्या करणं शक्य नाही. एखादयाला एखादी व्यक्ती का सुंदर वाटते याची प्रत्येकाची विविध कारणे असू शकतात. काही बाह्यसौंदर्यावर भर देतात तर काही आत्मिक, म्हणूनच सौंदर्य पाहणाऱ्यायाच्या दृष्टीत असतं. तसाच आनंद हा घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. एखादयाकडे पैसा, मूलबाळ, सर्व काही असतं तरी नेहमी ती व्यक्ती त्रागा करताना, दुःख करताना दिसते. तर एखादा माणूस सामान्य जीवन जगत असतो पण नेहमी हसरा, आनंदी असतो. कारण तो आपल्याकडे काय नाही याचे दुःख करत न बसता असलेल्या गोष्टींमधून आनंद शोधत असतो. प्रत्येक छोट्या छोट्या क्षणाचा आनंद उपभोगत असतो. म्हणूनच आनंद हा देखील घेणाऱ्याच्या वृत्तीवर अवलंबून असतो.

(इ)’आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’,
या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर: काही व्यक्ती सतत त्रासलेले चेहरे घेऊन फिरताना दिसतात. अनेकवेळा आपल्याला प्रश्न पडतो की यांना हसता येते की नाही? अशा अनेक व्यक्तींनी आपल्या जीवनातील काही घटनांनी आनंदाचे दरवाजेच बंद केलेले असतात. ते आनंदाला आपल्या जीवनात शिरकावच करू देत नाहीत. नाही माझे जीवन असेच आहे आणि मी ते असेच मन मारून जगणार असे जणू त्यांनी ठरवूनच टाकलेले असते. आयुष्यात चढउतार, सुखदुःख येत असतातच पण म्हणून त्याच गोष्टी धरून बसून आयुष्य थांबवून ठेवायचे नसते. दुःखातही काही क्षण सुखाचे वाट्याला येत असतात, त्याचे खुल्या दिलानं स्वागत करता आलं पाहिजे. मनात कोणतेही भ्रम निर्माण करून जगत राहण्यापेक्षा छोट्या गोष्टींमधून आनंद शोधला पाहिजे. लहान मुले क्षणात रडतात. क्षणात हसतात कारण त्यांचे मन निरागस असते. त्यात कोणतीही पूर्वकटूता नसते. तसेच आपणही प्रत्येक क्षण त्याप्रमाणे जगायला शिकलं पाहिजे. मनाची कवाडं उघडून आनंदाला मनात शिरू दिले पाहिजे. माणूस आनंद मिळवायला शिकेल तेव्हा तो खरा आनंदी होईल म्हणूनच, ‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. ‘

(ई) ‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे.’, तुमचे मत लिहा.

उत्तर : आनंदाला आपण सर्वत्र शोधत असतो. पण तो अंतरंगातच असतो. ज्याला याची जाणीव असते त्याला तो अंतरंगातच सापडतो. आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. आपण आपले अस्तित्व गृहीत धरून चालतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो श्वास आपल्याला त्याचंही भान नसतं. श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं. मनाशी नातं जोडता येतं. आयुष्यातला एकेक क्षण येतो आणि जातो. सूर्योदय, सूर्यास्त होतो. त्याकडेही आपण नीट लक्ष देत नाही. आपण प्रत्येक गोष्ट गृहीत धरतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला बदलणाच्या निसर्गाचं, घटकांचं आपल्याला भान नाही. औचित्य नाही. त्यामुळे त्यांचा आनंद घेत येत नाही. या सर्वांचे कौतुक बघण्यासाठी दृष्टीचं, श्वासाचं, अस्तित्वाचं, अस्तिवाच्या आनंदाचं भान असणे गरजेचे आहे. युगायुगांनंतर मनुष्य जन्म लाभतो असे म्हणतात. मग आपणाला हा जन्म लाभला आहे हे आनंदाचे कारण नाही का? आपल्या अस्तित्वाचा आनंद आपण उपभोगलाच पाहिजे.

★ कृती – ५. अभिव्यक्ती.

(अ) खरा, टिकाऊ आनंद मिळविण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : खरा टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद असतो. पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हांला आनंद देऊ शकत नाही. भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही. अशावेळी माणसाला वाटतं मला अजून काही मिळवायला हवं. एवढं असूनही मी आनंदात का नाही? अशावेळी माणसाला विरंगुळा हवा असू शकतो. आपल्याला काय हवं आहे ? प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगात असतंच. आनंद जर ‘मानता’ येत नसेल तर तो ‘मिळवायचा’ कशाला ? अधिक सुखाचे दिवस यावेत. यासाठी अधिक मिळवायला हवं; पण हवं असणं म्हणजे हाव असणं नसावं. पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचानसतो, तो आपण कमावलेला असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो, तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. यश, वैभव, कीर्ती मिळाल्याने नक्की काय होतं ? तर अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर ? शून्याला कितीही मोठ्या यशानं, पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत. आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. कारण खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. म्हणून खरा टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी माणसाने आनंद छोट्या छोट्या गोष्टींतून शोधला पाहिजे व प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला, अनुभवायला शिकलं पाहिजे.

(आ)तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
उत्तर : आनंद हा विकत घेता येत नाही. तो मागून मिळत नाही. तो माणसाच्या मनात असावा लागतो. एखादयाला बक्षीस मिळाल्यावर जर तो त्याला माझ्यापेक्षा जास्त बक्षीसे मिळाली म्हणून मनात विचार करत राहिला तर स्वत:ला मिळालेल्या बक्षीसाचाही तो आनंद घेऊ शकणार नाही. तसेच एखादया कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्याच्या ऐवजी आता कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल का? घरी जाऊन काय कामं आहेत? याचा विचार करत बसलो तर कार्यक्रमाचा आनंद मिळणार नाही. म्हणजेच आनंद घेता आला पाहिजे. मी माझ्या जीवनातील छोट्या छोट्या घटनांचा आनंद घेण्याचा प्रयत्न करेन. माझ्याकडे काय आहे. त्याचा आनंद घेईन. जे आहे ते माझं आहे. दुसऱ्याकडे काय आहे याचा विचार करत मी भका जगावं ? रोज दिवसात छोटे छोटे आनंदाचे खूप क्षण येत असतात. त्याचा आनंद घेईन. आवडीचे क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न करेन आणि ते ही शक्य झालं नाही तरी जे आहे त्यात आनंद मानत पुढे वाटचाल करेन. अजून मिळविण्याचा प्रयत्न जरूर करेन पण त्यासाठी आज आनंदात जगणे विसरणार नाही. मला वाटते ही गोष्ट प्रत्येकानेच आत्मसात केली पाहिजे.

प्र. २. कारणे दया.

(१) स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं, ते आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत, कारण…
उत्तर : आयुष्यात तुलना आली की आनंद संपतो.

(२) आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं, ना दृष्टीचं,कारण
उत्तर :जे जे आनंद देणारं आहे, ते आपण गृहीतच धरून चालतो.

प्र. ३.स्वमत

(अ) ‘निसर्गात आनंद भरून राहिलेला आहे’, याविषयी तुमचे विचार लिहा.

उत्तर: निसर्ग हा माणसाच्या जीवनाचा स्रोत आहे. निसर्ग आपल्याला ‘देता किती घेशील दो कराने’ अशा प्रकारे सतत मदत करत असतो. हिवाळ्यातल्या कोवळ्या उन्हाचा आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद. झाडांचे नुसते आकार पाहात हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहात राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं, तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही, त्यांनी आयुष्यातील आनंदालाच सोडून दिल्यासारखे आहे. निसर्गातील प्रत्येक ऋतू, दिवसरात्र बघण्यात आनंद आहे. झाडांवर उमललेली फुले बघण्यात आनंद आहे. पक्ष्यांचे आवाज, विविध फुलपाखरे, पक्षी, नदी, झरे, समुद्र, धुके, एक नाही अनेक गोष्टी. प्रत्येक एक क्षण निसर्गातला अनुभवला तर तुमचे जीवन आनंदीच होईल.

(आ) ‘एखादया कलेशी दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येते’, याविषयी तुमचे विचार लिहा.

उत्तर : माणसाने आयुष्यात कलेची साधना करावी असे आपण नेहमी म्हणतो. कला ही माणसाला आनंद देते. विरंगुळा देते. आता संगीताचे उदाहरण घेतले तर संगीताच्या सात सुरांमध्ये सात जन्म पुरेल एवढा आनंद आहे. शास्त्रीय संगीत तर आनंदाची इस्टेटच आहे. थोर गायकांची गाणी ऐकणे म्हणजे केवळ भाग्यच म्हणायला हवं, आत्मिक आनंद जो असतो तो कलेतून मिळतो. कलाकार मंडळी आपल्याच कलेच्या मस्तीत जगत असतात. आपण कलेशी दोस्ती करू शकलो तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद घेता येण्यास नशीब लागते. आपली आवडती कला शिकणं, जोपासणे व प्रत्येक वेळी कलेतून नवनिर्मिती करणे हे जिवंत असल्याचे लक्षण आहे. असे मला वाटते. जिवंतपणी जगण्याचा आनंद अनुभवण्यासाठी कलेशी दोस्ती करता आली पाहिजे.

कृतिपत्रिका – २

खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती सोडवा.
प्र. १. कारणे लिहा.

(१) खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ, कारण …
उत्तर : खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ, कारण माणसाचा भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो.

(२) नेहमी ‘शहाणंसुरतं’ राहून जमत नाही, कारण … उत्तर : नेहमी ‘शहाणंसुरतं ‘ राहून जमत नाही, कारण कसलं तरी वेड डोक्यात घेणं हे आनंदाचं, उत्साहाचं रहस्य असतं.

(४) लहान मुलं आनंद घेण्यात तरबेज असतात,

कारण उत्तर : लहान मुलं आनंद घेण्यात तरबेज असतात, कारण निरागस, व आनंदी वृत्तीची असतात.

प्र. ३. स्वमत

(अ)माणसाने वर्तमानकाळ भरभरून जगला पाहिजे’ याविषयी तुमचे मत लिहा.

उत्तर: आनंदासाठी मोकळेपणाने जगता आले पाहिजे. मनात भूतकाळाची स्मृती ठेवून आनंदासाठी मनाची कवार्ड बंद करून घेतली तर आजचा आनंद मिळणार नाही. तसेच भविष्यकाळाची चिंता, भीती मनात ठेवली तरी आजचा आनंद अनुभवता येणार नाही. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे. भूतकाळ संपलेला असतो व भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. भूतकाळाला पूर्ण विराम देता आला पाहिजे व जो भविष्यकाळ आपण पाहिलाच नाही त्याची चिंता तरी कशाला करायची. आज तुमच्या हातात आहे. उदया नाही हे विसरू नये. वर्तमानात जगण्यासाठी जगण्याविषयी प्रेम व हौस हवी. माणूस आज जगत असतो. उदया त्याने पाहिलेला नाही. आजचा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे. उदया येईल न येईल कोणी पाहिले आहे. त्यासाठी माणसाने आपला आज, वर्तमानकाळ वाया घालवता कामा नाही.

(आ) ‘प्रयत्नाचा आनंद घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही.’, यातून तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

उत्तर : खरा आनंद हा कुठेही विकत मिळत नाही, मागून मिळत नाही. तो माणसाने अनुभवायचा असतो. माणूस आयुष्यात यश, वैभव मिळविण्याचा प्रयत्न करत असतो. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटून जगत असतो. हे माणसाचे जगणे आहे. पण हे करताना माणसाने स्वतःचे अस्तित्व विसरू नये. उलट हे मिळविण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात, आपल्या रोजच्या कामात आपण आनंद शोधायला शिकलं पाहिजे. माणसाने यासाठी एकतर स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे किंवा तसे शक्य न झाल्यास ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत ते काम करतानाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगावा. आपण ऑफिसमध्ये काम करताना इतरांबरोबर आपला दिवस जर मजेत जात असेल तर तुम्हांला वेगळा आनंद शोधण्याची गरज नाही. तुम्ही विद्यार्थी ज्ञानार्जन करतानासुद्धा ज्ञान मिळविण्यात आनंद अनुभवत असाल, रोजच्या दिवसात जर कार्यपूर्तीचा आनंद तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात. तुम्हांला प्रयत्नाचा आंनद घेता येतो आहे, असे असेल तर आनंद कसा मिळवावा हे आयुष्याचे गमक तुम्हांला समजले आहे. मग आनंदासाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरजच नाही.

प्र. २. वाक्यांचे रूपांतर करा.

(१) माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. (संयुक्त वाक्य करा.)
उत्तर : माणसं अस्वस्थ व उदास असताना परमेश्वराचा धावा करतात.

(२) प्रत्येकाने ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे ? (विधानार्थी करा.)
उत्तर : प्रत्येकाने ताजमहाल बांधण्याची गरज नाही.

(३) पुस्तकांची सोबत तुम्हांला कधीच दगा देत नाही. (प्रश्नार्थी करा.)
उत्तर : पुस्तकांची सोबत तुम्हांला कधी दगा देते का ?

उपक्रम
प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

उत्तर: (१) टेन्शन– tension ताण
(२) इस्टेट – estate मालमत्ता
(३) लॅन्डस्केप्स्– landscapes – चित्रे रेखाटण्याची कला

तोंडी परीक्षा
(अ) खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
(१) आभाळाकडे डोळे लावणे – पावसाची आतुरतेने वाट पाहणे.
वाक्य : मृग कोरडाच गेल्याने सर्व शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

(२) विसर्ग देणे- सोडून देणे. (मार्च, २०२२ )
वाक्य: जीवन वाटचालीत अपयश, निराशेच्या क्षणांना विसर्ग दिल्याशिवाय प्रयत्नांना प्रारंभ होत नाही.

(आ) ‘माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण’, या विषयावर पाच मिनिटांचे भाषण सादर करा.
उत्तर: माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण
सन्माननीय परीक्षक व माझ्या विदयार्थी बंधूभगिनींनो. माझ्या जीवनातील त्या आनंदमय क्षणाच्या अविस्मरणीय स्मृती तुमच्यासमोर मांडण्याची संधी या उपक्रम निमित्ताने परीक्षकांनी मला दिली, त्याबद्दल प्रथमतः मी त्यांचे विशेष असे आभार मानतो. त्यांना मनापासून धन्यवादही देतो.

जीवनप्रवासात ‘आनंद’ हा प्रत्येकालाच हवा असतो. पण आपला आनंद नेमका कशात आहे हेच अनेकांना कळत नसतं. जीवनावर, आपल्या जगण्यावर प्रेम केल्याशिवाय हा ‘आनंदाचा गाव’ अनेकांना सापडत मात्र नाही. दैनंदिन जीवनातल्या छोट्या-छोट्या गोष्टीतही आनंदाचा सूर सापडणे महत्त्वाचे आहे. हा सूर शोधा. आनंदात जगा. मग सर्वत्रच ‘आनंदी आनंद गडे, इकडेतिकडे चोहीकडे’चा अनुभव नक्कीच तुम्हांला येईल. आपल्या जीवनात आनंदाचे क्षण वारंवार येत राहावे असे प्रत्येकाला मनोमन वाटत असते. जीवनगाणे आनंदाने गात राहावे असे प्रत्येकालाच वाटत असते. अनेकदा जीवनात अपेक्षित गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. मग आपण आनंदी रहाणं सोडून दयायचं का? माझ्या मित्रमैत्रिणींनो याचे उत्तर नाही असेच आहे. आनंदी राहाणं सोडून दिलं तर आपलं जीवन निरस आणि कडवट होऊन जाईल. जगण्याच्या धडपडीतली सगळी मज्जाच निघून जाईल. आपल्या आयुष्याला आनंदी क्षणांनी अक्षरशः भरून काढणं आपल्याच हातात आहे.

काहीजण कोठेही बँड वाजताना दिसला की, लगेच त्या ठिकाणी जाऊन इतरांसोबत नाचायला लागतात. लग्न कोणाचं आहे? लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार न करता मनमुराद नाचण्याचा आनंद ते शोधतात व मिळवतातसुद्धा. ज्या ठिकाणी आनंद मिळेल त्या ठिकाणी जाऊन, इतरांशी समरस होऊन आनंदाचे क्षण आपण अनुभवले पाहिजेत हेच खरे!

दुसऱ्याच्या आनंदात सहभागी झाल्याने आपल्याला आनंद नक्कीच मिळतो. आपले मित्र, नातेवाईक, शेजारी, परिचितांकडे आनंदाच्या क्षणी जाऊन आपण त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आनंदी व्हावं हेआपल्याच हातात आहे. इतरांचा प्रत्येक आनंद हा आपलाच आनंद आहे असे समजा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होऊन आनंदी राहायला शिकले तर आपले जीवन आनंदी नक्कीच होईल. इतरांच्या आनंदात आपण
आपला आनंद शोधला तर इतरांनाही आनंद नक्कीच होईल. ‘आनंदची अंग आनंदाचे’ हेच सत्य आहे. वाढदिवसाच्या दिवशी प्रेमळ शुभेच्छांच्या वर्षावात एक अनोखा आनंद नक्कीच मिळतो. शुभेच्छा, शुभ आशीर्वादाने जगण्याला एक वेगळा ऊर्जा नक्कीच मिळते. आवर्जून आठवणीने दिलेल्या शुभेच्छा, साधलेला संवाद खूप महत्त्वाचा. पावसात भिजल्याशिवाय भिजण्यातला आनंद मिळत नाही. नवनवीन गोष्टी शिकण्यातला आनंद कधीतरी घेऊन पहा. अरे ! हे तर आपल्याला छान जमते ही गोष्ट, हा विचार तुमच्या मनाला विलक्षण समाधान देऊन जातो. निसर्गाशी एकरूप झाल्यावरच एका विलक्षण सौंदर्याचा साक्षात्कार होतो. कधीतरी लहान मुलांत लहान बनून खेळा. बालपणाच्या स्मृती जागवा व एक अनोखा आनंद अनुभवा.

आनंद घेण्याची वृत्ती महत्त्वाची आवड असेल तर सवड नक्कीच मिळते. भविष्याची भीती न बाळगता वर्तमानात आनंद अनुभवता येणे, यासाठी भरभरून जगणे महत्त्वाचे. निस्वार्थ भावनेने मदतीला धावून जा. संकटसमयी एखादयाचा आधार बनून पाठीशी उभे राहून पहा. आनंदाचं भान जागृत ठेवून जगणं महत्त्वाचं, आनंदाचा अनमोल ठेवा आपल्या मनातच असतो, पण कस्तुरीमृगासारखे त्याला शोधण्यासाठी आपण धावत असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा तुमचा जीवनप्रवास आनंदमयी असावा अशा मनःपूर्वक शुभेच्छा! शेवटी एकच सांगतो,

माझ्या जीवनातील ‘ते’ आनंदाचे क्षण

मोजकेच परंतु तरीही महत्त्वाचे

अविस्मरणीय स्मृतिरूपात चिरकाल राहणारे

एक नवी ऊर्जा देणारे!

लेखक परिचय

लेखक शिवराज गोर्ले स्वतःची ओळख करून देताना म्हणतात, ” मी बरेच विनोदी लेखन केले. ‘नग आणि नमुने’ हे पुस्तक लिहून ‘पुलं नंतरही मराठीतला आणि मराठी माणसातला विनोद संपलेला नाही, हे सिद्ध केले.” त्यांनी फक्त विनोदी लिखाण केले नाही तर उद्योजकाला नायक बनवणारी उद्योगजगतावर कादंबरी लिहिली, आनंदाचा अधिकार अधोरेखित करणाऱ्या ‘मजेत जगावं कसं? या त्यांच्या पुस्तकाने तर इतिहास रचला आहे. असे नाटक, चित्रपट, दूरदर्शन, मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय स्तंभ असे बहुपैलू लेखन करणारे शिवराज गोर्ले यांनी ‘मजेत जगावं कसं ?’ या पुस्तकातून घेतलेला उतारा ‘आयुष्य… आनंदाचा उत्सव’ हा पाठ आहे. या पाठात त्यांनी आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा, आनंद नेमका कशात असतो तो कसा अनुभवायचा असतो हे सांगितले आहे.

पाठ परिचय

आनंद प्रत्येकालाच हवा असतो… पण नेमका आनंद कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. लेखकांच्या मते ‘आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे!’ हे शाश्वत सत्य आहे. आनंदाची गंमत अशी आहे की त्यासाठी जितका आटापिटा कराल, तितका तो हुलकावण्या देतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. कारण आनंद आपल्या मनातच असतो. खरं तर आनंद सर्वत्र असतो. पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं फक्त आनंदाशी जुळते. आनंद हा निखळ असेल, तरच तो आनंद असतो. ‘खरा’ असेल तरच तो अनुभवता येतो. लोकांना पेढे ‘वाटणं’ वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. तुमच्या मनात ईर्ष्या, असूया, राग, द्वेष असता कामा नयेत तर खरा आनंद अनुभवता येतो. काहींना एखादे बक्षीस मिळाले तर त्याला माझ्यापेक्षा जास्त बक्षीसे मिळाली किंवा त्याला एकही बक्षीस मिळालं नाही म्हणून मनात विचार असतील तर स्वत:ला मिळालेल्या बक्षीसाचा आनंद ते उपभोगूच शकणार नाहीत. म्हणूनच ज्याचं चित्त शुद्ध असतं त्यालाच आनंद उपभोगता येतो.

अनेकदा आयुष्यात असं काहीतरी घडतं की ज्यामुळे आपण आपल्या मनाची कवाडे बंद करून घेतो. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. आनंद कणाकणातून टिपायचा असतो.

निसर्गात तर आनंद भरून राहिलेला असतो, ‘देता किती घेशील दो कराने’, अशीच परिस्थिती असते. निसर्गातला प्रत्येक एक बदल, प्रत्येक एक छटा जरी बघत राहिलं तरी वेडे व्हायला होतं. संगीताचेही तसेच आहे. त्याच्या सात सुरांमध्ये सात जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. मोठमोठ्या गायकांचे शास्त्रीय संगीत ऐकायला मिळणं म्हणजे भाग्यच आहे. एखादया कलेशी दोस्ती करू शकलो, तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर | न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच. केवळ परीक्षा देण्यासाठी नाही तर स्वतः ची हौस म्हणून काही शिकून पाहा असेही लेखक म्हणतात. खेळाचा आणि छंदाचा उद्देश केवळ आनंद असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद. छंद कुठलाही असू शकतो. या छंदाचे वेड डोक्यात घेणे हे उत्साहाचे रहस्य असते. आनंद हवा असेल, तर थोडं वेडं व्हावंच लागतं. नेहमी ‘शहाणं सुरतं’ राहून जमत नाही. शहाणं सुरतं रहायचं असेल, तर वाचनाचा छंद तरी लागतोच.

निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल, तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की भूतकाळ संपलेला असतो. भविष्यकाळ अनिश्चित असतो. खरा असतो तो फक्त वर्तमानकाळ. तोच भरभरून जगायचा असतो. वर्तमानात चांगले जीवन जगण्यासाठी जगण्याविषयी प्रेम हवं.

आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला जातो. त्यात पूर्ण रंगून जातो का ? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही, याची चिंता करत बसलो, तर गाण्याचा आनंद कसा घेणार ? याचाच अर्थ या क्षणी उत्कटतेने जे करावंसं वाटतय आणि जे शक्य आहे, ते करा. पावसात भिजावंसं वाटतय ना, मग भिजा. लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका. खरा आनंद हा अंतरंगातून येतो. सर्व वैभव, सुख असूनही जर तुम्ही आनंदी नसाल तर अशा वेळी बाहेर नाही मनात डोकवायला हवं.

आपल्याला नक्की काय हवंय याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा . माणूस नेहमी अधिक मिळविण्यासाठी झगडत असतो. पैसा मिळाल्यानं आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. जो पैशाशिवायही आनंदी राहू शकतो तोच पैशानं अधिक आनंद घेऊ शकतो. यश, वैभव, कीर्ती मिळाल्यावर अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर ? पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच.

आनंदी आयुष्यासाठी एक सोपं तत्त्व आहे ज्यात तुम्हांला खरा आनंद होतो, तेच क्षेत्र निवडा. स्वत:च्या आवडीचं काम निवडा. प्रत्येक वेळी हे शक्य होतच असं नाही. अशा वेळी जे काम करायचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. शांत चित्ताने, आनंदी वृत्तीनं काम केलं, तर यश मिळत जातं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो, त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहते. त्यामुळे आयुष्य हा संघर्ष राहत नाही… ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो.

कठीण शब्द

शाश्वत- स्थिर, न बदलणारे (pemanent) हुलकावणी- निसटणे (bullying), काख- बगल ( under arms), प्रसवणे – जन्म देणे (to deliver), जागृत – जिवंत, सावध ( awake), गुपित-रहस्य (mystery), पातळी – मर्यादा (level), अस्तित्व – असण्याची स्थिती (existence), दुर्मिळ – दुर्लभ (rare), अपवाद – नियमात न बसणारी (exception), गृहीत – कल्पनेने स्वतःचे मत तयार करणे (assumed), मुकणे – हातातून निसटणे (to drop, to loss), निखळ – शुद्ध (pure), वैषम्य – दुःख, खेद (unevenness, sorrow), नाइलाज -निरुपाय, लाचारी (helpless condition ), वृत्ती – प्रवृत्ती, स्वभाव (nature), पारखे- दुरावणे (to be removed far), साक्षात- प्रत्यक्ष, स्वभाव ( in reality ), रसिक – चाहता (fan), शहाणंसुरतं – समजूतदार, अक्कलवंत (wise), –

साक्षात्कार- चमत्कार, अनुभव येणे (miracles), उत्कट- अतिव (passionate), गैर -वाईट (bad, improper), निमित्त- कारण (reason), चक्रवाढ -व्याज आकारणीचा प्रकार (compound interest), साक्ष- पुरावा
( testimony), सेतू – पूल, बांध (bridge), कमाल – उच्च मर्यादा, पराकाष्ठा (maximum), अद्भुत आश्चर्यकारक –
(amazing), सापेक्ष – अपेक्षेसहित (with expectation), –
युग – काळाचा मोठा भाग (era), खडतर – कठीण (tough), तपश्चर्या तप (penance), सबळ – ठोस ( strong), अभिव्यक्ती – विचार प्रकट करणे ( expression), –
सर्वोत्कृष्ट – सर्वोत्तम (the best), रुखरुख – काळजी, टोचणी, दुःख (misery, painful regret), दडपण – भार, ओझे (suppression, pressure), दाटीवाटी – गर्दी (crowd), कृत्रिम अनैसर्गिक (artificial), न्याहाळणे – लक्षपूर्वक पहाणे (looking), भाग्य – दैव, नशीब (luck), हौस – आवड (great desire), रहस्य – गुपित (mystery), अक्षर आनंद – शब्द स्वरांचा आनंद (happiness from word), आविष्कार- निष्कर्ष, शोध लावणे (invention, manifestation), गल्लत- गफलत (negligence), स्वकर्तृत्व -स्वतःच्या कष्टाचे (self made), -पूर्तता- पूर्णत्व (settlement, completion).

वाक्प्रचार :
थक्क होणे =आश्चर्यचकित होणे,
भान हरपणे=गुंग होणे
बहाल करणे=प्रदान करणे
पारखा होणे =पोरका होणे
झपाटून जाणे = एखादया गोष्टीचा ध्यास घेणे.
हुलकावण्या देणे = चकवणे

समानार्थी शब्द:

• दगा=धोका
• स्मृती =आठवण
•कवाड=दरवाजा
•चित्त=मन
• रसिक=चाहता
•दुर्मिळ – दुर्लभ
• बक्षीस – पारितोषिक मळालं

विरुद्धार्थी शब्द:

•कृत्रिमx नैसर्गिक
•निखळ x मलिन
•तोटा x नफा

Leave a Comment