Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7. Solutions विंचू चावला ( vinchu chawla Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 7 विंचू चावला Textbook Questions and Answers
Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 7. Solutions विंचू चावला ( vinchu chawla Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.
Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 7 विंचू चावला
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 7 विंचू चावला Textbook Questions and Answers
कृती
कृती- १. (अ) योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा.
(१) तम घाम अंगासी आला, म्हणजे
(अ) संपूर्ण शरीराला घाम आला.
(आ) घामाने असहयता आली.
(इ) घामामुळे मन अस्थिर झाले.
(ई) शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.
उत्तरः शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली.
(२) मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे
(अ) माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते.
(आ) मनुष्याला इंगळी चावणे वाईट.
(इ) इंगळी मनुष्याचा दारुण पराभव करते.
(ई) मनुष्याला इंगळी नांगा मारते.
उत्तर: माणसातील विकाररूपी इंगळी अतिशय भयंकर असते.
(आ) खालील शब्दांचे अर्थ लिहा.
उत्तरे:(१) वृश्चिक…. =विंचू
(२) दाह …… =आग
(३) क्रोध …… = राग
(४) दारुण….. = अतिभयंकर
कृती- २. खालील ओळींचा अर्थ लिहा.
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागें सारा ।
सत्त्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे झरझरां । ।
उत्तरःश्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ, कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय.
माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज, हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत कारण त्यांच्या साहित्य संपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचे काम आजही निरंतर सुरू आहे.
‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’ यांसारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘भारुडे’, ‘आरत्या’, ‘कथाकाव्य’ इत्यादी वाङ्मय प्रकार विपुल प्रमाणात लिहिले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात त्यांचे मोलाचे काम आहे.
भारूडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांच्या जागृत काळात समाजात बुवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या नादी लागला होता. धर्माच्या नावावर ढोंगी संत व साधु पुरुषांनी समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी भाबडी जनता या सगळ्यात अगदी त्रासून गेली होती. अशा समाजाला स्वत:मधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूडाच्या माध्यमातून जनजागृती केली. अंधश्रद्धेवर प्रहार केला. विंचू हे भारूड विविध प्रतिमांनी नटलेले आहे. या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून नाथांनी सत्याचा मार्ग दाखवला.
नाथ म्हणतात विकाराने युक्त मनुष्य स्वतः चा घात तर करतोच, पण तो समाजासाठी घातक ठरतो. त्याच्याकडून दुष्कृत्य घडली जातात. तो पापी असतो. तो आपल्या वर्तनाने दुसऱ्यांना त्रास देतो. अशा व्यक्तींमुळे समाजाची हानी होते.
म्हणून नाथ म्हणतात सगळे विकार विशेषतः तमोगुणाचे विसर्जन करा. त्याला मागे सारा. तमोगुणांत क्रोध हा गुण अस्थायी रूपात असतोच. जर माणसाने या विकारांचा नाश केला, त्यांना दूर सारले तर मनुष्याचे संत मनुष्यात रूपांतर होते. त्याच्यातील सात्विक प्रवृत्ती वाढीस लागतात. मनातील पाप नष्ट होते. मन शुद्ध आणि पवित्र होते. सत्त्वगुणाचे आचरण केल्यास सर्व विकारांवर मात करता येते. सद्गुण म्हणजे सत्याचा गुण, चांगल्याच्या बाजूने उभे राहण्याचा गुण, न्यायाचा गुण, मानवतेचा गुण. तो जेव्हा अंगी बाणला जातो तेव्हा विकाररूपी इंगळीचे विष झरझर उतरते आणि मनुष्य अंतर्बाह्य बदलतो. त्याचे अंतरंग उजळून निघते. परमेश्वराच्या खऱ्या रूपाचे त्याला दर्शन होते. कर्मकांडातून तो मुक्त होतो. सर्व चराचरांत, प्राणिमात्रांत, निसर्गात त्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो.
- कृती – ३. काव्यसौंदर्य सत्त्व उतारा देऊन ।
अवघा सारिला तमोगुण
किंचित् राहिली फुणफुण ।
शांत केली जनार्दनें ।। ४ ।।
वरील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.(
सप्टें.,२०२१)
- उत्तरः श्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ, कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ महाराजयांच्यव्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय.माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत कारण त्यांच्या साहित्य संपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचेकामआजहीनिरंतरसुरू आहे.‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’ यांसारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘भारूडे’, ‘आरत्या’, ‘कथाकाव्य’ इत्यादीवाङ्मय प्रकारांचे विपुल प्रमाणात लेखन केले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणिप्रसारात त्यांचे काम मोलाचे आहे.
त्यांनी समाजाला भारूडाच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांच्या काळात समाजात बुवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेला होता. धर्माच्या नावावर ढोंगी संत व साधू पुरुषांनी समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी भाबडी जनता या सगळ्यामुळे अगदी त्रस्त झाली होती. अशा समाजाला स्वत:मधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी, भारूडाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराजांनी जनजागृती केली. विंचू हे विविध प्रतिमांनी नटलेले भारूड असून या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून नाथांनी सत्याचा मार्ग दाखवला.
अशा प्रकारे सत्त्व गुणांचा अंगीकार करून तमोगुणावर तर मात केली. पण कधी कधी सर्व दुर्गुण-अवगुणांचा नाश होत नाही. माणसाची छाती गर्वाने फुगून जाते. थोडी फुणफुण बाकी राहते. म्हणजे विंचवाचे विष उतरले तरी अहंकार नष्ट होत नाही. ‘मी’ पणा संपत नाही. मीच सर्वात श्रेष्ठ, मीच सगळ्यात सद्गुणी हा वृथा भाव मनुष्यप्रवृत्तीत निर्माण होतो. असा माणूसही खऱ्या भक्तीपासून दूर राहतो. त्याला परमेश्वर प्राप्त होत नाही. हे असे अज्ञान वाईट पण नाथ म्हणतात यावर उतारा म्हणजे गुरुच्या चरणी लीन होणे. मनाला शांत करण्याचे काम तो जर्नादनरूपी गुरुच करू शकतो. गुरुवीण उद्धार नाही. जो गुरुला शरण जातो, गुरुच्या छत्रछायेत राहतो त्याची सर्व विकारांपासून मुक्तता होते. अशा प्रकारे संत एकनाथ महाराज विंचू, इंगळी, त्याचे विष या प्रतिमांमधून जीवनाचे सार भक्तांना स्पष्ट करतात. ते भारूडातून सद्धर्माचे दान मागतात. देहाविषयीचा अहंकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या आसक्तीरूपी विकारांनी होणाऱ्या नाशाची जाणीव करून देतात. थोडक्यात काम-क्रोध इ. तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची आणि मनाची आग आग झाली आहे. तिला शांत करण्यासाठी वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरली पाहिजे. त्यातूनच खरी मनःशांती लाभेल असे संत एकनाथ महाराज स्पष्ट करतात.
★ कृती – ४. रसग्रहण.
खालील ओळींचे रसग्रहण करा.
(अ) विंचू चावला वृश्चिक चावला ।
काममक्रोध विंचू वाचला ।
तम घाम अंगासी आला ||धृ.||
उत्तरः श्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ, कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय. माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत कारण आजही त्यांच्या साहित्य संपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचे काम निरंतर सुरू आहे. ‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’ यांसारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘भारूडे’, ‘आरत्या’, ‘कथाकाव्य’ इत्यादी वाङ्मय प्रकार विपुल प्रमाणात लिहिले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
भारूडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांच्या काळात समाजात बुवाबाजीचे प्रमाण खूप वाढले होते व बहुजन समाज अंधश्रद्धेच्या नादी लागला होता. धर्माच्या नावावर ढोंगी संत व साधू पुरुषांनी समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी भाबडी जनता या सगळ्यात अगदी त्रासून गेली होती. अशा समाजाला स्वत:मधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर नेण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूडाच्या माध्यमातून जनजागृती केली. लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. विंचू हे भारूड विविध प्रतिमांनी नटलेले आहे. संत एकनाथ महाराजांनी या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून सत्याचा मार्ग दाखवला. अभंगातील मी म्हणजे माणसाचे मन, या
या मनाला विंचवाचा दंश झाला आहे. हा विंचू म्हणजे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक होय. प्रत्येक माणूस हा तीन गुणांनी बनलेला असून हे तीन गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तम यातील जो गुण अधिक प्रमाणात ज्या माणसांत असतो तसा त्या मनुष्याचा स्वभाव बनतो. तमोगुण जास्त असलेला माणूस दुर्गुणांच्या आहारी |
जातो. मनुष्यास दुर्गुणांचा विंचू चावल्यामुळे मनुष्याच्या अंगास घाम येऊन त्याच्या मनातील विकारी प्रवृत्ती बाहेर आल्या आहेत.
(आ) पंचप्राण व्याकुळ झाला ।
त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ।। १ ।।
उत्तर: श्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ, कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय.
माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत कारण त्यांच्या साहित्य संपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचे काम आजही निरंतर सुरू आहे.
‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’ यांसारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘भारूडे’, ‘आरत्या’, ‘कथाकाव्य’ इत्यादी वाङ्मय प्रकार विपुल प्रमाणात लिहिले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात त्यांनी बहुमोल कार्य केले आहे.
भारूडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. संत एकनाथ महाराजांच्या काळात समाजात बुवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या नादी लागला होता. ढोंगी संत व साधू पुरुषांनी धर्माच्या नावावर समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी भाबडी जनता या सगळ्यात अगदी त्रासून गेली होती. अशा समाजाला स्वत:मधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी भारूडाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम केले. विंचू हे भारूड विविध प्रतिमांनी नटलेले आहे. या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून नाथांनी लोकांना सत्याचा मार्ग दाखवला.
यातील ‘माझे प्राण’ म्हणजे ‘मी’ चे अस्तित्व. हा ‘मी’ म्हणजे माणसाचे मन. ह्या मनाला वाईट विचारांचा विंचू चावला आहे. त्यामुळे त्याचे पंचप्राण कंठाशी आले आहेत. म्हणजेच तो मनुष्य बरबाद झाला आहे. वाया गेला आहे. त्या माणसाचं मन आपली व्यथा सर्वांना सांगत आहे. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे मन विकाराने भरलेले नसते. लहान बाळ निष्पाप असते. आनंदात असते. कारण त्याचे मन विकारमुक्त असते. जसा जसा बालक मोठा होतो तसे तसे विकार म्हणजे वाईट गुण त्याच्या मनात घर करायला लागतात. जो या विकारांच्या आहारी जातो तो नष्ट होतो. विंचू चावल्यावर जशी शरीराला आग लागल्यासारखी वेदना होते. शरीराचा दाह होतो. तसेच वाईट गुण अंगीकारल्याने शरीर अशुद्ध होते. काम आणि क्रोध हे शत्रू मनाला सर्वात जास्त त्रास देतात. या विंचवाने दंश केल्यास मन वाईट विचारांनी भरून जाते.
(इ) ।मनुष्य इंगळी अति दारुण
मज नांगा मारिला तिनें ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ।। २ ।।
उत्तरः श्रेष्ठ भक्त, अध्यात्म विषयाचे भाष्यकार, रसाळ, कीर्तनकार, खरे समाज सुधारक संत एकनाथ महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय.
संत एकनाथ महाराज यांनी भारूड हा काव्यप्रकार विशेष लोकप्रिय केला. ‘भावार्थ रामायण’, ‘चतुःश्लोकी भागवत’ यांसारखे ग्रंथ लिहिणाऱ्या संत एकनाथ महाराजांनी ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘भारूडे’, ‘आरत्या’, ‘कथाकाव्य’ इत्यादी वाङ्मय प्रकार विपुल प्रमाणात लिहिले. वारकरी संप्रदायाच्या प्रचारात आणि प्रसारात त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
भारूडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अतिशय सुगम आणि आकर्षित करून घेतील अशी भारूडे रचली. त्यांनी त्यांच्या भारूडातून सर्वसामान्यांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली. संत एकनाथ महाराजांच्या काळात समाजात बुवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या नादी लागला होता. धर्माच्या नावावर ढोंगी संत व साधू पुरुषांनी समाजात धुमाकूळ घातला होता. भोळी भाबडी जनता या सगळ्यामुळे अगदी त्रासून गेली होती. संत एकनाथ महाराजांनी अशा समाजाला स्वतःमधील दोष दाखवून त्यांना खऱ्या अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी
भारूडाच्या माध्यमातून जनजागृतीचे मोठे कार्य केले. विंचू हे भारूड विविध प्रतिमांनी नटलेले आहे. नाथांनी या विंचवाच्या प्रतिमेचा वापर करून त्रस्त जनतेला सत्याचा मार्ग दाखवला.
संत एकनाथ महाराज मनुष्याचा ‘इंगळी’ असा उल्लेख करतात. ‘इंगळी’ म्हणजे आकाराने सर्वात मोठा विंचू. याच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. कधी कधी माणसाचे विकार या मोठ्या इंगळीसारखे अती प्रबळ होऊन मनाला जास्त वेदना होतात. ‘दारुण’ म्हणजे अतिभयंकर असा हा मनुष्य ज्यात विकार प्रबळ झाले आहेत. तो अतिभयंकर माणूस असतो. सारासार विचार करण्याची स्वतःची शक्ती तो गमावून बसतो. चांगले-वाईट, योग्यअयोग्य, आपला – परका हे भेदही त्याला ओळखता येत नाहीत. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. तो बेताल वागू लागतो. मनुष्याच्या रूपात जणू अतिभयंकर दानव या पृथ्वीतलावर वावरत असतो.
★ कृती – ५. अभिव्यक्ती.
(अ) तुमच्यातील दुर्गुणांचा शोध घ्या. हे दुर्गुण कमी करून सद्गुण अंगी बाणवण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा.
उत्तर: आम्ही विद्यार्थिदशेतील मुलं म्हणजे अगदी सगळ्या बाजूने बांधलेले आहोत. बारावीचा ताण, शिक्षकांच्या अपेक्षा, पालकांच्या अपेक्षा या सगळ्याचा दबाव सतत असतो. मग कधी कधी या सगळ्याचा कंटाळा येतो. मन विचलित होण्यासाठी अनेक प्रलोभने जोडीला असतातच. मग आम्ही हळूहळू खोटं बोलायला लागतो. अभ्यासासाठी जागे आहोत असे सांगून रात्रभर ऑनलाईन चॅटींग करत बसतो. लेक्चरला कंटाळा आला की वर्गात दांडी मारून पार्टी, हॉटेलिंग करतो. माझे बरेचसे मित्र हेच करताना मी पाहात होतो. मी ही शेवटी या सगळ्याकडे ओढला गेलो. आमच्या ग्रुपमधील काही जण तर नशा करायला लागले होते. काहीजण उगाचच चमकोगिरी करण्यासाठी महागडे, ब्रँडेड कपडे घालून सिगारेटचा झुरका घेण्यात धन्यता मानत होते. मीही कळत नकळत याकडे ओढला जाणार होतो. पण माझं सुदैव, घसरणारा पाय वेळीच सावरला. मराठीच्या तासाला संतसाहित्य शिकत असताना मला माझ्यातले दुर्गुण जाणवले. शिक्षकांनी शिकवताना राणी बंग, अभय बंग यांसारख्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून दिली. बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे यांचे महान कार्य समजावून सांगितले. सैनिकांविषयीच्या कविता शिकताना तर अवघा वर्ग भारून गेला होता. मी जरी विज्ञानाचा विदयार्थी होतो तरी भाषा शिकताना मात्र माझ्यावर खूप चांगले संस्कार झाले. मी मग प्रयत्नपूर्वक सगळ्या वाईट संगतीतून बाहेर आलो. मोबाईल, इंटरनेट, टिव्ही यांचा वापर कधी व किती वेळ करायचा हे बंधन स्वत:वर घालून घेतले. माझ्या विचारांच्या विदयार्थ्यांना एकत्र केले. सगळ्या वर्गातील मुलांचा गट बनवला व आठवड्यातून एकदा विविध विषयांवर आम्ही चर्चा करायचे ठरवले. यातून हळूहळू सगळ्या विषयांच्या अभ्यासाची तयारी व्हायला लागली. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला. माझ्यातील या सकारात्मक बदलामुळे आई-वडील आणि शिक्षक सगळेच खुश झाले.
(आ) ‘दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे’, स्पष्ट करा.
उत्तर : दहावी संपून जेव्हा आम्ही विदयार्थी महाविदयालयाच्या प्रांगणात जातो तेव्हा वेगळ्याच भावना मनात दाटून येतात. मनात थोडीशी भीती असते. थोडी धाकधूक असते. थोडी अनिश्चितता असते. आपल्याला महाविदयालयीन अभ्यास झेपेल की नाही? चांगले मित्र मिळतील की नाही? शिक्षक कसे असतील? वगैरे प्रश्न अक्षरश: घेरून उभे असतात.
हे वय आडनीडं वय असते. असं म्हणतात एकदा दहावी-बारावीची वर्षे व्यवस्थित पार पाडली की मग सहसा मुलं वाममार्गाकडे जात नाहीत.
या पातळीवर जर मित्रांची निवड चुकली तर आयुष्याचं जहाज समुद्रात भरकटत जायची भीती असते.
दुर्जन माणसांच्या सहवासात आल्यावर नकळतपणे वाईट गोष्टीच चांगल्या वाटू लागतात. व्यसनांच्या आहारी गेलेली कितीतरी मुलं आपण नेहमीच आजूबाजूला बघतो. अशा मुलांच्या संगतीत चांगली मुलंही बिघडतात. पण चांगल्या संस्कारी मुलांशी मैत्री केली तर मात्र नकळत सत्त्वगुण, चांगले गुण अंगात भिनत जातात. ज्या माणसांपासून आपल्याला प्रेरणा मिळते अशांच्या सहवासात राहिले तर जीवनात सुगंधित गुलाबाची बाग फुलते हे किती खरंय ! वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाल्याचं उदाहरण आपल्या संस्कृतीत आपण अभ्यासलेलं आहे.
आताच्या काळात तर तरुणांनी आदर्श कुठे शोधावेत असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. बरेच जण राजकारणी लोकांच्या नादाला लागून भरकटलेलं जीवन जगत आहेत. यातला एखादा नेता होतो. बाकी मग दहीहंडी, दसरा, दिवाळीला राजकीय पार्टीचं शक्ती प्रदर्शन असतं तेव्हा टाळ्या वाजवणाऱ्या समूहात असतात.
त्यामुळे खरंच आहे. इंगळीचा दंश जसा दाहक असतो. त्याने सर्वांगाची आग होते. तसाच मनुष्य जन्म वाईट संगतीत जीवन वाया जाते तर सुसंगतीत आपले जीवन ज्ञानाने, आत्मप्रतिभेने उजळून निघते. त्याचा सर्व समाजाला फायदा होतो. तर वाईट संगतीत मात्र मनुष्याची अवस्था ‘खायला काळ भुईला भार’ अशी
होते.
(२) मनुष्याला सर्वांगी वेदना जाणवत आहेत, कारण
उत्तर :मनुष्याला सर्वांगी वेदना जाणवत आहेत, कारण अतिभयंकर इंगळीने त्याला दंश केला आहे.
| कविता / भारूड – विंचू चावला वृश्चिक
. शांत केली जनार्दनें ॥ ४ ॥
(पाठ्यपुस्तक पृ. क्र. ३२, ३३)
प्र. २. स्वमत / अभिव्यक्ती.
● संत एकनाथांनी पंधराव्या शतकात मांडलेले विचार आज एकविसाव्या शतकातही तितकेच महत्त्वपूर्ण ठरतात या मताची पुष्टी करा.
उत्तर: वारकरी संप्रदायाची धुरा संत ज्ञानेश्वरांनंतर अत्यंत समर्थपणे, आपल्या खांदयावर सांभाळणारे संत एकनाथ महाराज यांनी, त्या काळातील समाजाच्या धर्मांधतेवर, ढोंगीपणावर कोरडे ओढले. हजारो लोकांना भजन, कीर्तन यांसारख्या माध्यमातून जागृत केले. त्यांचे अभंग व त्यातील विचार हे आजही कालबाह्य झालेले नाहीत याची साक्ष ‘विंचू चावला’ या भारूडात पुरेपूर मिळते. आजच्या पिढीसाठी हे विचार म्हणजे मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. अत्यंत आलंकारिक भाषेत त्यांनी खरी भक्ती कशी असावी, विकृत कर्मकांडापासून कसे दूर रहावे याचे उत्तम विवेचन केले आहे. आजच्या आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात काळाचा वेग, झपाटा इतका जबरदस्त आहे की आजचा तरुण हा संभ्रमित झाला आहे. युवाशक्तीचे दिशाहीन होणे, ध्येयापासून भरकटणे, व्यसनाधीनतेत बुडून जाणे हे एकविसाव्या शतकातील भारताला परवडणारे नाही. संत एकनाथांनी जनार्दन म्हणजे गुरुला शरण जावे असा मार्ग सुचवला आहे. हे गुरु म्हणजे चांगले कार्य करणारे लोक, चांगल्या विचारांचे लोक. यांच्याशी जवळीक करून आपल्या जीवनात प्रकाशाची ज्योत पेटती ठेवली पाहिजे असा त्याचा व्यापक अर्थ आहे. अशा लोकांच्या कार्याचा, त्यांच्या विचारांचा स्वीकार करायला हवा. देवळात जाऊन अनावश्यक कर्मकांड करणे, ढोंगी बुवाबाजीमागे लागणे यापेक्षा मदर टेरेसा, बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे – मंदाकिनी आमटे, राणी- अभय बंग, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. रवींद्र कोल्हे यांसारख्या लोकांचे कार्य, त्यांनी स्वीकारलेला समाजसेवेचा आदर्श हे आपल्यापुढे मार्गदर्शक
दीपस्तंभ असावेत. नवीन भारत घडवताना नवीन विचारांचा युवक घडवायचा आहे. त्यासाठी संत एकनाथ महाराजांसारख्या संतांचे विचार हे आजही उपयुक्त ठरणार आहेत.
(२) सत्त्व उतारा देऊन, म्हणजे ………
(अ) जीवनसत्त्व देऊन.
(आ) सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन.
(इ) सात्त्विक आहार देऊन.
(ई) सत्त्वाचे महत्त्व सांगून.
उत्तरः सत्त्वगुणांचा आश्रय घेऊन.
(३) ‘विंचू चावला वृश्चिक चावला’, शब्दांच्या या द्विरुक्तीमुळे म्हणजे………..
(अ) भारूड उत्तम गाता येते.
(आ) वेदनांचा असह्यपणा तीव्रतेने जाणवतो.
(इ) भारूडाला अर्थ प्राप्त होतो.
(ई) भारूड अधिक रंजक बनते.
उत्तर: वेदनांचा असहयपणा तीव्रतेने जाणवतो.
कविता / भारूड – विंचू चावला वृश्चिक ……. ……शांत केली जनार्दनें ॥४॥
(पाठ्यपुस्तक पृ. क्र. ३२, ३३)
कवी / संत परिचय
श्री संत एकनाथ महाराज यांचे मोठेपण अनेकांगी आहे. श्रेष्ठ भक्त, थोर धर्मप्रसारक, रसाळ कीर्तनकार, अध्यात्मविषयाचे प्रसन्न भाष्यकार, भक्त कवी, खरे समाजसुधारक असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आढळतात. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे त्यांचे संतत्व होय. माणसांचे जीवन अंतर्बाह्य सुगंधित करणारे संत एकनाथ महाराज हे खऱ्या अर्थाने वंदनीय आहेत कारण त्यांच्या साहित्यसंपदेच्या माध्यमातून समाज सुधारणेचं काम आजही निरंतर सुरू आहे. ‘भावार्थ रामायण’, ‘रुक्मिणी स्वयंवर’ हे त्यांचे कथात्म ग्रंथ ! याच बरोबर ‘चतुःश्लोकी भागवत’, ‘हस्तामलक’, ‘स्वात्मसुख’, ‘चिरंजीवपद’, ‘शुकाष्टक’, ‘आनंदलहरी’ इत्यादी, तत्त्वज्ञानावर आधारित ‘स्फूट’ ग्रंथही त्यांनी लिहिले. याशिवाय ‘अभंग’, ‘गौळणी’, ‘संत चरित्रे’, ‘महात्मे’, ‘भारूडे’, कथाकाव्ये, ‘आरसा’ इ. वाङ्मयप्रकार त्यांनी विपुल प्रमाणात लिहिले.
वारकरी संप्रदायात संत एकनाथ महाराजांच्या लेखनाचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. ‘जनार्दनी एकनाथ’, ‘स्तंभ दिला भागवत’ या शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारात त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
भारूडात नाथांच्या रुपकात्मक लेखनाचा मुख्य आविष्कार त्यांच्या भारूडातून दिसून येतो. आजवर त्यांची सुमारे तीनशेपेक्षा अधिक भारूडे उपलब्ध आहेत. त्यांच्या नाट्यात्मकता आहे. नाथांनी भारूडासाठी निवडलेले विषय हे नित्य परिचयातले आहेत. विषयांत विविधता आहे. त्यांच्या भारूडात संवादात्मकता आहे. त्यामुळे या संवादातून नाट्य उभे राहते. विविध प्रतिमांचा वापर त्यांच्या भारूडात केलेला आहे. समाजाला कळणारी भाषा व सर्वसामान्यांना पेलणारे तत्त्वज्ञान त्यांच्या भारूडात आढळते. साऱ्या जीवनाचे अवलोकन व तत्त्वज्ञान त्यात प्रकट होते. त्यात अध्यात्म आहे, मनोरंजन दोष आणि दुर्गुणांचे भंजन आहे.
भारूड’ हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर यांनी प्रथम वापरला. प्रबोधनासाठी हा उपयुक्त काव्यप्रकार असल्याने अनेक संप्रदायातील संतांनी नंतर त्याचा वापर केला. भारूडाचे भजनी भारूड, सोंगी भारूड आणि कूट भारूड असे तीन प्रकार मानले जातात. त्यापैकी भजनी भारूड हे कीर्तनाच्या रूपात सादर केले जाते. लोकशिक्षणासाठी संतांनी भारूडांची रचना केली. भारूड हे नुसते गायन करून दाखवायचे नसते तर भारूड सांगणारी व्यक्ती उत्तम नट असावी लागते. संतांनी या दोन्हीची सांगड घालत मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन केले.
कवितेचा / भारूडाचा भावार्थ
नाथांचे ‘विंचू’ हे भारूड नानाविध प्रतिमांनी नटलेले आहे. विंचू चावल्यानंतर येणाऱ्या अनुभवाचे चित्र दृष्टीसमोर साकार होते. संत एकनाथ महाराजांनी आपल्या या रुपक काव्यातील अनुभवविश्व साकार करताना विविध प्रतिमांचा अत्यंत समर्थपणे उपयोग केला आहे.
संत एकनाथांच्या काळात समाजात बुवाबाजी बोकाळली होती. बहुजन समाज अंधश्रद्धेच्या मागे लागला होता. समाजातील ढोंगी साधू भोळ्या भाविकांना आपल्या नादी लावून अघोरी प्रकार करायला लावत होते. लोकांना धर्माच्या नावावर लुबाडले जात होते. या अज्ञ समाजाकडे पाहून संत एकनाथ महाराजांचे अंतःकरण हेलावून जात होते. जनतेला फसवून पोटासाठी कीर्तन करणाऱ्यांची समाजात गर्दी झाली होती. शारीरिक व्यथा निर्माण झाल्यास देवऋषींकडे धावणे, लिंब, नारळ, उद घेऊन मेंढरे- कोंबडे मारणे, वेताळाचे पूजन करणे अशा सगळ्या अंधश्रद्धेत समाज गुरफटला होता. अशा समाजाला त्यांच्या अवनतीचे दर्शन घडवून त्यांचे प्रबोधन करण्याच्या हेतूने संत एकनाथांनी भारूडांची रचना केली. या चराचर सृष्टीतील अनेक प्राणी, प्रतिमा, मानवी व्यक्तिमत्त्वे या सगळ्यांना त्यांनी भारूडात सजीव केले. त्यावेळच्या समाजातील राजकीय, धार्मिक, आर्थिक स्थितीचे ठळक प्रतिबिंब त्यांच्या भारूडात आढळते.
विंचू चावला ……….
तम घाम………… ॥धृ.॥
या अभंगातील मी म्हणजे माणसाचे मन, या मनाला विंचू | चावला आहे. हा विंचू म्हणजे काम आणि क्रोधरूपी विंचू होय. | प्रत्येक माणूस हा तीन गुणांनी बनलेला असतो. हे तीन गुण | म्हणजे सत्त्व, रज आणि तम. यातील जो गुण जास्त प्रमाणात |ज्या माणसांत असतो तसा त्याचा मनुष्यस्वभाव बनतो. तमोगुण | जास्त असलेला माणूस दुर्गुणांच्या आहारी जातो. मनुष्यास | दुर्गुणांचा विंचू चावला आहे त्यामुळे मनुष्याच्या अंगास घाम | |आला आहे म्हणजे त्याच्या मनातील विकारी प्रवृत्ती बाहेर आल्या आहेत.
पंचप्राण व्याकुळ…….
सर्वांगाचा दाह ………..।।१।। |
यातील ‘माझे प्राण’ म्हणजे ‘मी’ चे अस्तित्व. हा ‘मी’ म्हणजे माणसाचे मन. ह्या मनाला वाईट विचारांचा विंचू चावला आहे. त्यामुळे त्याचे पंचप्राण कंठाशी आले आहेत. म्हणजेच | तो मनुष्य बरबाद झाला आहे. वाया गेला आहे. त्या माणसाचं | मन आपली व्यथा सर्वांना सांगत आहे. माणूस जन्माला येतो | तेव्हा त्याचे मन विकाराने भरलेले नसते. लहान बाळ निष्पाप | असते. आनंदात असते. कारण त्याचे मन विकारमुक्त असते. | जसा जसा बालक मोठा होतो तसे तसे विकार म्हणजे वाईट | | गुण त्याच्या मनात घर करायला लागतात. जो या विकारांच्या आहारी जातो तो नष्ट होतो. विंचू चावल्यावर जशी शरीराला | आग लागल्यासारखी वेदना होते. शरीराचा दाह होतो. तसेच वाईट गुण अंगीकारल्याने शरीर अशुद्ध होते. काम आणि क्रोध | हे शत्रू मनाला सर्वात जास्त त्रास देतात. या विंचवाने दंश केल्यास | मन वाईट विचारांनी भरून जाते.
मनुष्य इंगळी…….
त्या इंगळीची…….।।२।।
संत एकनाथ महाराज मनुष्याचा ‘इंगळी’ असा उल्लेख करतात. ‘इंगळी’ म्हणजे आकाराने सर्वात मोठा विंचू. कधी | कधी माणसाचे विकार या मोठ्या इंगळीसारखे अती प्रबळ | होतात. त्याने मनाला जास्त वेदना होतात.
‘दारुण’ म्हणजे अतिभयंकर असा हा मनुष्य ज्यात विकार प्रबळ झाले आहेत. अतिभयंकर माणूस असतो तो स्वतःची | सारासार विचारशक्ती तो हरवून बसतो. चांगले-वाईट, योग्यअयोग्य, आपला – परका हे भेदही त्याला ओळखू येत नाहीत. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. मनुष्याच्या रूपात जणू अतिभयंकर | दानव या पृथ्वीतलावर वावरत असतो.
ह्या विंचवाला………….
विंचू इंगळी………….॥३॥
विकाराने युक्त मनुष्य समाजासाठीसुद्धा घातक असतो. त्याच्याकडून दृष्कृत्य घडली जातात. तो पापी असतो. तो आपल्या वर्तनाने दुसऱ्यांना त्रास देतो. विकारांमुळे अशा व्यक्तीची आणि समाजाची हानी होते.
म्हणून नाथ म्हणतात सगळ्या विकारांचे विशेषतः तमोगुणाचे विसर्जन करा. त्याला मागे सारा. तमोगुणात ‘क्रोध’ हा भाव अस्थायी रूपात असतोच. जर माणसाने ह्या विकारांचा नाश | केला, त्यांना दूर सारले तर सामान्य मनुष्याचे संत मनुष्यात रूपांतर होते. त्याच्यातील साऊित्त्वक वृत्ती वाढू लागतात. |मनातील पाप नष्ट होते. मन शुद्ध आणि पवित्र होते. सत्त्वगुणाचे आचरण केल्यास सर्व विकारांवर मात करता येते. सत्त्वगुण म्हणजे सत्याचा गुण, चांगल्याच्या बाजूने उभे राहण्याचा गुण, न्यायाचा गुण, मानवतेचा गुण. तो जेव्हा अंगी बाणला जातो तेव्हा विकाररूपी इंगळीचे विष झरझर उतरते आणि मनुष्य अंतर्बाह्य बदलतो. त्याचे अंतरंग उजळून निघते. |परमेश्वराच्या खऱ्या रूपाचे त्याला दर्शन होते. कर्मकांडातून तो मुक्त होतो आणि प्राणिमात्रांत त्याला ईश्वराचा साक्षात्कार होतो.
सत्त्व उतारा…………
शांत केली……….।।४।
अशा प्रकारे सत्त्व गुणांचा अंगिकार करून तमोगुणावर तर मात केली. पण कधी कधी सर्व दुर्गुण-अवगुण नष्ट होत नाहीत. माणसाची छाती गर्वाने फुगून जाते. थोडी फुणफुण बाकी राहते. म्हणजे विंचवाचे विष उतरले तरी अहंकार संपत नाही. ‘मी’ पणा संपत नाही. मीच सर्वात श्रेष्ठ, मीच सगळ्यात | सद्गुणी हा वृथा भाव मनुष्यप्रवृत्तीत निर्माण होतो. असा माणूसही खऱ्या भक्तीपासून दूर राहतो.
त्याला परमेश्वर सापडत नाही. हे असे अज्ञान वाईट. पण नाथ म्हणतात यावर उतारा आहे. तो म्हणजे गुरुच्या चरणी लीन होणे. मनाला शांत करण्याचे काम तो जर्नादनरूपी गुरुच करू शकतो. गुरुवीण उद्धार नाही. जो गुरुला शरण जातो, गुरुच्या छत्रछायेत राहतो तो सर्व विकारांपासून मुक्त होतो.
अशा प्रकारे संत एकनाथ महाराज विंचू, इंगळी, त्याचे विष या प्रतिमांमधून जीवनाचे सार भक्तांसमोर स्पष्ट करतात. ते भारूडातून सद्धर्माचे दान मागतात. देहाविषयीचा अहंकार आणि त्यातून उद्भवणाऱ्या आसक्तीरूपी विकारांनी होणाऱ्या नाशाची जाणीव करून देतात. थोडक्यात काम-क्रोध इ.
तमोगुणांचा विंचू चावल्यामुळे शरीराची आणि मनाची आग आग झाली आहे. तिला शांत करायचे असेल तर वाईट गुण सोडून सद्गुणांची कास धरावी. त्यातूनच खरी मन:शांती लाभेल असे संत एकनाथ महाराज स्पष्ट करतात.
शब्दार्थ :
वृश्चिक विंचू (scorpion), कामक्रोध क्रोध, इ. वाईट गुण, दाह वासना, आग होणे (burning sensation), इंगळी मोठा विंचू ( a large black fierce scorpion ), दारुण महाभयंकर (dreadful, terrible), उतारा उपाय ( an antidote), तमोगुण तापटपणा, अहंकार (irascible, irate), नांगा – विंचवाच्या शरीराचा अवयव, यात विष असते (the tail of scorpion), पंचप्राण – शरीरातील पंचेद्रियांमध्ये असलेले प्राण (the five vital airs, the life), सत्त्वगुण चांगुलपणा (virtue), मनाची पवित्रता, अंगारा परमेश्वरासमोर लावलेल्या ज्योतीची राख – – – – –
(sacred ashes of incense), फुणफुण – आग, चुरचुर (tingling sensation)