Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter जयपूर फुटचे जनक ( Jaipur Futche Janak )2024

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2.12 Solutions जयपूर फुटचे जनक ( Jaipur Futche Janak Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2.12 जयपूर फुटचे
जनक (भाग गद्य आकलन)
12th Marathi Guide Prashn uttar Chapter 2.12जयपूर फुटचे जनक Textbook Questions and Answers.

★ कृती – २. अभिव्यक्ती.

•’कृत्रिम पायाच्या मदतीने दिव्यांगत्वावर मात करता येते.’ हे सोदाहरण स्पष्ट करा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

उत्तर : उत्तर प्रदेशातील अरुणिमा सिन्हा फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन होती.

११ एप्रिल २०११ रोजी CISF च्या नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी लखनऊ ते दिल्ली असा प्रवास करतेवेळी ट्रेनमध्ये असलेल्या चोरांच्या टोळक्याने तिच्या गळ्यातील चेन खेचण्याचा प्रयत्न करून चालत्या ट्रेनमधून तिला बाहेर फेकून दिले. दोन धावपट्ट्यांच्यामध्ये ती पडली, पण तिचे पाय मात्र, गाडीच्या रूळांवर असल्यामुळे भरधाव येणाऱ्या एकापाठोपाठ ४९ गाड्या तिच्या पायावरून गेल्या. एका पायाचा पूर्ण चक्काचूर झाला तर दुसऱ्या पायाची दुरावस्था झाली होती.

AIIMS हॉस्पिटलमध्ये तिच्या एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी बाकी होती. तर दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला होता. असे असूनही ती खचली नाही. तिच्या कुटुंबाने विशेषतः तिच्या मेहुण्यांनी तिला खूप धीर दिला. हॉस्पिटलमध्ये असतानाच तिने निर्धार केला की, अपंग झाले तरी मी जिद्दीने एव्हरेस्ट सर करेन. गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी ती बचेंद्री पाल या एव्हरेस्ट शिखर सर करणाऱ्या पहिल्या महिलेला जाऊन भेटली. बचेंद्रींनी तिला धीर देऊन तिचे मनोधैर्य वाढविले. तिने

नेहरू गिरीभ्रमण केंद्रात दीड वर्ष खडतर प्रशिक्षण घेतले. शेरपाच्या मदतीने ५२ दिवसांच्या गिर्यारोहणाच्या सफरीमध्ये अरुणिमाने ही रोमांचकारी चढाई केली. ऑक्सिजनचा साठा कमी असताना शेरपाने चढाई थांबविण्याचा इशारा तिला दिला. परंतु जिद्दीने तिने पुढे जाण्याचा निर्णय घेऊन ती एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली. दोन्ही पायांनी अपंग असतानाही केवळ आत्मविश्वास जागवला की काय होते? हे तिने दाखवून दिले. नेतृत्व, गटबांधणी, पोलादी कणखरपणा, महत्त्वाकांक्षा हे गुण अरुणिमाकडे होते. त्यांच्या बळावर कृत्रिम पायाच्या मदतीने तिने दिव्यांगावर मात केली. माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली अपंग भारतीय असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सी. आय. एस. एफ.) मधील हेड कॉन्स्टेबल पदावर २०१२ पासून कार्यरत आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(२) कारण लिहा.

(अ) लिदार नदी फेसाने डवरलेली असते कारण……..
कारण : प्रवाह जोरात वाहणारा व शुद्ध पाषाणांच्या चढउतारांचे पात्र.

(आ) लिदारशी कोणी फारशी सलगी करायला जात नाही कारण …

कारण: हिमदुहिता लिदारचा गारवा.

पहेलगावच्या परिसरातील लिदार एक नदी ! हिच्या काठावर कुठे घाण नाही. पण ही नदीच आहे ! हिचे पाणी कुठे साचत नाही. शेवाळी रंगाची साय कुठे धरत नाही आणि गाई-गुरे हिच्यात डुंबत नाहीत. हिला घाट नाही. काठावर तीर्थ नाही की कुंड नाही! पण ही आपली एक ‘प्युअर’ नदी आहे. कोणा देवाच्या जटेतून, अंगठ्यातून, कानातून, कमंडलुतून, यज्ञातून ही निघालेली नाही. म्हणून ही फार फार पवित्र आहे ! हिचा प्रवाह हा नावाप्रमाणे जोरात वाढणारा तर आहेच; पण हिचे पात्र शुद्ध पाषाणांच्या चढउतारांचे असल्यामुळे ही नेहमीच फेसाने डवरलेली असते. अनेक निर्झरिणीची व हिची गाठ पडते, म्हणून हिला नदीपण प्राप्त होते. हिला प्रपात आणि उत्पात ठाऊकच नाहीत. शुभ्र कबुतरे रांगेने बसली आणि नाजूकनाजूक उड्या मारीत रांगेने पुढे सरकली तर जशी दिसतील तसा दिसतो हिचा प्रवाह ! ही हिमदुहिता पहेलगावसारखीच संभ्रमात आहे. लिदारच्या गारव्यामुळे तिच्याशी कोणी फारशी सलगी करायला जात नसावे.
परिणाम कमालीची स्वच्छता !

•अभिव्यक्ती / स्वमत :

(३) ‘नदीच्या पाण्याची स्वच्छता’ या विषयावर तुमची मते लिहा.

उत्तर : पुरेसे पाणी असणे याबरोबरच ते शुद्ध असणे हे महत्त्वाचे आहे. नद्यांचे पाणी अशुद्ध होण्याची कारणे मानव निर्मितच आहेत. आज अनेक गावातील सांडपाणी वाहत जाऊन नदीलाच मिळते व नदीचे पाणी अशुद्ध होते. गावातील सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे त्यासाठी आवश्यक आहे. मोठमोठ्या उदयोगधंदयातील सांडपाणी प्रक्रिया करूनच बाहेर सोडले पाहिजे. प्रक्रिया केलेले सांडपाणी नदीपात्रात न सोडता त्याचा पुनर्वापर करणे महत्त्वाचे आहे. कपडे धुणे, गाई-गुरांना धुणे या गोष्टी नदीपात्रात केल्या नाहीत तर आपले पाणी आपणच नक्की शुद्ध राखू शकतो. ‘आधि केलेचि पाहिजे’ची मानसिकता

महत्त्वाची आहे. सुरुवात स्वत:पासून केली तर बघणाराही नक्कीच प्रेरित होईल, शुद्ध पाण्यामुळे आपण अनेक आजार टाळू शकतो व आरोग्यसंपन्न असे जीवन जगू शकतो. पाण्याला दुसरे नाव ‘जीवन’ आहे. जीवन जगताना जलम्रोतांना शुद्ध राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जलप्रवाहांची स्वच्छता ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. ‘स्वच्छ पाणी, जीवनात चैतन्य आणी’ हा संस्कार महत्त्वाचा आहे.

(ii) एका वाक्यात उत्तर लिहा.

•जीवनगौरव म्हणजे काय ?

उत्तर : अगदी आनंदाने उत्साहाने, वृत्तीच्या प्रसन्नतेने जीवनात येणारे क्षण उजळून टाकणे म्हणजे जीवनगौरव.

(२) (i) चौकट पूर्ण करा.

महात्मा गांधी. पंडित नेहरू. महर्षी कर्वे यांनी याची तक्रार कधीच केली नाही.

उत्तर :महात्मा गांधी, पंडित नेहरू, महर्षी कर्वे यांनी याची तक्रार कधीच केली नाही. =वेळ मिळत नाही

(ii) एका शब्दात उत्तर लिहा.

मधल्या सुट्टीत अवघड गणिते सोडवणारा-••••••••••

उत्तर :मधल्या सुट्टीत अवघड गणिते सोडवणारा आईनस्टाइन
माणसे पैशांचा जमाखर्च ठेवतात. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करतात, मात्र वेळेच्या बाबतीत हा विवेक दाखवत नाहीत. पैसा हा खर्च होतो, तसाच तो मिळतही राहतो. पण वेळेच्या | बाबतीत अशी अनुकूलता अनुभवता येत नाही. हे विचारात घेऊन विदयार्थ्यांनी आणि युवकांनी आलेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केला पाहिजे. वेळ कारणी लावला पाहिजे. दिवसाचे तास असतात चोवीस त्यांतले झोप आणि विश्रांतीसाठी फार तर दहा तास विरंगुळा म्हणून एखादा तास इकडेतिकडे होईल, तरी उरतात तेरा तास, त्यांतून शाळेचे सात तास वजा केले आणि शाळेत येणे-जाणे विचारात घेऊन एखादा तास बाजूला केला, तरी पाच तास हाताशी राहतात. त्या काळात थोडा व्यायाम, नियमित वाचन आणि घरचा अभ्यास या गोष्टी बसू शकणार नाहीत का? लेखन, वाचन, चिंतन या मनोबल वाढवणाऱ्या गोष्टी सावकाशीने आणि सातत्याने करायच्या असतात. एखादया वेळी भावनेचे भरते येणे, उपरती होऊन दहा तास अभ्यास करणे ही आगळीक ठरेल. जीवनाची जडणघडण घरबांधणीप्रमाणे सावकाशीने व सावधपणे करायची असते. महात्मा गांधी, पंडित नेहरू, महर्षी कर्वे यांनी ‘वेळ मिळत नाही’ अशी तक्रार कधीच केली नाही. उमेदवारीच्या काळात नोकरी करणारा आइन्स्टाइन मधल्या सुट्टीत अवघड गणिते सोडवत असे. वेळेच्या बाबतीत जागरूक राहणे म्हणजे ओझ्याखाली स्वतःला जखडून घेणे किंवा भरडून टाकणे नाही. अगदी आनंदाने, उत्साहाने, वृत्तीच्या प्रसन्नतेने जीवनात येणारे क्षण उजळून टाकणे हाच खरा जीवनगौरव.

●अभिव्यक्ती / स्वमत :

(३) ‘वेळेचे महत्त्व ‘ तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर : वेळेचे महत्त्व जाणून कार्य करणे ही मानवाची सर्वात मोठी शक्ती आहे. मानवी जीवनात वेळेला फार महत्त्व आहे. दिवसातील प्रत्येक क्षणाचे महत्त्व जाणून मेहनत केली तर माणसाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या कर्तव्याच्या पूर्तीसाठी सदैव प्रयत्न करून वेळ कारणी लावला पाहिजे. कोणतेही काम करण्यासाठी वेळ नाही अशी सबब सांगणारा माणूस काहीही साध्य करू शकत नाही. कारण कोणत्याही यशप्राप्तीसाठी प्रयत्नांची, श्रमाची साथ असावी लागते आणि त्यासाठी प्रत्येक वेळेचा माणसाने उपयोग करायला पाहिजे. जो माणूस वेळेचे महत्त्व समजून ध्येय प्राप्त करण्यासाठी कष्ट करतो तोच भावी आयुष्यात यशस्वी होतो, प्रगती करतो.

सिमेंट काँक्रिटच्या जंगलातली सुखवस्तू जीवनशैली, बड्या पगाराची नोकरी यात न अडकता निसर्गाच्या जवळ नेणारं काम जयवंतला करायचं होतं, यामुळेच शेतीसारखा सुंदर पर्याय जयवंतने निवडला. आयटीतल्या या तरुणाने शेतीचं स्वप्न नुसतच उराशी बाळगलं नाही तर ते प्रत्यक्षात उतरवून यशस्वीही केलं. पुण्यात एका नामांकित आयटी कंपनीत बिझनेस मॅनेजर असलेल्या जयवंत पाटील या तरुणाने आपली सगळी कमाई पणाला लावून नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या वाडेगव्हाण गावात तीन एकर शेती घेतली. इथे विषमुक्त शेतीचा प्रयोग जयवंतने यशस्वी करून मुळा, टोमॅटो, मेथी, कोथिंबीर त्याचबरोबर ब्रोकोलीसारख्या एक्झोटीक भाज्यांचं उत्पादन घेतलं. विशेष म्हणजे जयवंतचा हा मळा फुलला आहे तो डोंगराळ जमिनीवर.

सळसळत्या चैतन्याचं प्रतीक असलेल्या आणि सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या तरुणाईकडे तुलनेने पेशन्स कमीच असतात. परंतु निसर्गाच्या जवळ जात, निसर्गाची किमया, नवनिर्मितीचा आनंद जयवंत पाटील या उच्चशिक्षित तरुणाने अनुभवला तो शेतीकडे वळून शेती हे सुद्धा आव्हानात्मक करिअर असू शकतं आणि हे आव्हान पार केल्यानंतर मिळणारा अनुभव आणि आनंद अद्वितीय असतो, हे जयवंतने अनेकांना दाखवून दिलं आहे. विशेषत: खेड्यांतून शहराकडे नोकरीच्या शोधात येणाऱ्या अनेकांसाठी जयवंतचं उदाहरण आदर्शवत आहे. पिकांना आपल्या हातांनी पाणी देणं, खतं देणं, त्याची निगा राखणं, जिवापाड मेहनत करणं आणि वाऱ्यावर डोलणारी पिकं पाहून भरून पावणं हा नवनिमितीचा प्रत्येक क्षण आणि क्षण जयवंत केवळ अनुभवत नाही तर तो प्रत्यक्ष जगत आहे.

•अभिव्यक्ती / स्वमत :

(३) शहरातील सुखवस्तू जीवनशैली व खेड्यातील
जीवनशैलीतील तुम्हांस समजलेला फरक लिहा.

उत्तर: ‘आयटीतज्ज्ञ शेतकरी’ या पाठात लेखिका स्वप्नाली अभंग यांनी जयवंत पाटील या आधुनिक युगातील शेतकऱ्याचा परिचय करून दिला आहे. एका उच्चशिक्षित, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग नंतर एम. बी. ए. केलेल्या तरुणाची ही यशोगाथा खेड्यातून शहराकडे जाणाऱ्या, नोकरीच्या मागे लागणाऱ्या तरुणांसाठी प्रेरक अशी आहे. गावाकडील व शहरातील जीवनात निश्चितच फरक आहे. झाडाझुडपांची गर्दी आजही गावाकडे आहे. शहरामध्ये मात्र राहण्यासाठी जागा हवी यातून सिमेंट काँक्रिटची जंगले उभी राहिली आहेत. सिमेंट काँक्रिटच्या जंगलात राहणारा, सुखवस्तू जीवनशैली असणारा माणूस घड्याळाच्या काट्याप्रमाणे धावतो आहे. बंद दाराच्या फ्लॅट संस्कृतीत फक्त स्वतःच्या व बड्या पगाराच्या नोकरीत मग्न आहे. पुण्यात राहणाऱ्या जयवंतचे शेती करण्याचे स्वप्न आहे. आपली सगळी कमाई पणाला लावून नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण गावात त्याने तीन एकर शेती घेतली. विषमुक्त शेतीचा प्रयोग करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. जिवापाड मेहनत करून डोंगराळ जमिनीवर शेती करत नवनिर्मितीचा आनंद घेतला. एका शेतकऱ्याच्या जीवनशैलीचा स्वीकार एका आधुनिक उच्चशिक्षित तरुणाने केला. पिकांना पाणी, खत देणं, निगा राखणं ही कामेही आनंदाने केली.

उतारा-४: (सप्टें., २०२१)

•खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा.
(१) विधाने पूर्ण करा.

(अ) शाश्वत सत्य म्हणजे………..

उत्तर : आपल्या भाषेतील म्हणी

(आ) म्हणींचे पहिले वैशिष्ट्य………..

उत्तर : त्या काळच्या समाजाचे समग्र आणि निर्दोष दर्शन

समाजाने जिवाभावाने जतन केलेले, रोजच्या जीवनाला पथदर्शक म्हणून पदोपदी उपयोगी पडणारे, समाजमन आणि समाजव्यवस्था अभिरुची यांच्या चाळणीतून गळून खाली उरलेले शाश्वत सत्य म्हणजे आपल्या भाषेतील म्हणी होत. ते लोकधन आहे. ते लोकजीवनाचे दर्पण आहे. लोकजीवनाचा शाश्वत सारांश आहे. लोकसाहित्याला श्रीमंत करण्यात या म्हणींचे योगदान लक्षणीय आहे. अनुभवदर्शन, विचारदर्शन, स्वभावदर्शन व जीवनदर्शन घडविणाऱ्या या म्हणींचे पहिले वैशिष्ट्य असे, की या म्हणींतून त्या काळच्या समाजाचे समग्र आणि निर्दोष दर्शन घडते. गुण-अवगुण, व्यंग- विकृती, कंजूष खर्चिक, कामांध नि धनांध, भूक-भोग, दिमाखदिवाळं, विवेक-अविवेक, खादाड नि खुनशी अशा नाना वैशिष्ट्यांनी ओतप्रोत भरलेल्या म्हणींचा मोठा खच व्यवहारात झालेला असतो आणि स्वभावाबरोबरच समाजाचे जवळ जवळ परिपूर्ण दर्शन या म्हणींतून घडते. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे यात कल्पिताचा आधार घेतलेला नसतो.
-डॉ. द. ता. भोसले

(२) कारणे लिहा.

(अ) म्हणींचे योगदान लक्षणीय आहे, कारण ••••

कारण:लोकसाहित्याला म्हणींनी श्रीमंत केले आहे.

(आ) समाजाचे, परिपूर्ण दर्शन म्हणींतून घडते, कारण••••

कारण: म्हणींमध्ये कल्पिताचा आधार घेतलेला नसतो.

उतारा -५:. (मार्च, २०२२)

•खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. चौकटी पूर्ण करा.

(१) चौकटी पूर्ण करा.

(अ) अर्थयुक्त असणारे …………..

उत्तर : शब्द

(आ) अनेक शब्दांच्या अर्थामधून साहित्यकृतीचा

उलगडतो तो……………..

उत्तर : आशय

साहित्यकृती शब्दांनी बनलेली असते. शब्द अर्थयुक्त असतात. तो अर्थ एकपदरी अथवा अनेकपदरी असतो. प्रतिमा, प्रतीक हेही शब्दच असतात. त्यात एकाहून अधिक अर्थ असतात. भाषेतील रूपकप्रक्रियेने अर्थाचे विश्व व्यापक केलेले असते. शब्दांच्या साहाय्यानेच साहित्यकृतीत पात्रे, प्रसंग, वातावरण निर्माण केलेले असते. शब्दार्थजनित कल्पित विश्वाची निर्मिती साहित्यकृतीत होत असते. त्या विश्वाचे बाह्य जगाशी साधर्म्य किवा वैधर्म्य असते. अनेक शब्दांच्या अर्थांमधून साहित्यकृतीचा आशय उलगडतो. मिथक, आदिबंध यांनी त्या आशयाला एक परिणाम दिलेले असते; तर शब्दांच्या अर्थातून व्यक्त होणाऱ्या विचारप्रणालीने, जीवनविषयक भूमिकेने दुसरे परिणाम दिलेले असते. साहित्यकृतीत विविध व्यक्ती, समाजगट, व्यक्तींची मने, व्यक्ती आणि समाजगट यांच्यातील संबंध शब्दार्थांतून व्यक्त झालेले असतात. व्यक्तिंना, व्यक्तिसमूहांना सामाजिक संदर्भ असतो. त्या समाजगटाची, समाजाची विशिष्ट संस्कृती असते. माणसांच्या सर्वसाधारण व्यवहारात ‘बोलणे’ हा एक महत्त्वाचा व्यवहार असतो. ते बोलणे अगदी साधे, निर्देशात्मक, भावनात्मक, विचारप्रदर्शनात्मक, प्रतिक्रियात्मक, अंतर असे असू शकते.
-वसंत आबाजी डहाके

(२) खालील कृती करा.

(अ) माणसाची व्यवहारात बोलण्याची वैशिष्ट्ये लिहा.

(i)••••••••••••••••••••

उत्तर : (i) निर्देशात्मक

(ii)••••••••••••••••••••

उत्तर : (ii) प्रतिक्रियात्मक

                                ★      ★      ★

Leave a Comment