सोलापूर जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | Solapur Information In Marathi

Solapur marathi mahiti, Solapur Jilha Mahiti, Solapur Information In Marathi, Solapur Distric Information, Solapur pin code maharashtra

सोलापूर जिल्ह्याची संपुर्ण माहिती आणी इतिहास – solapur information in Marathi|

सोलापूर जिल्हा

इ.स. पूर्व २००० वर्षांपासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, अहमदनगरची निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या. यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते. मुघल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते. ब्रिटिश काळात सोलापूर हे नात रूढ झाले असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीयसामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूरमध्ये उमटत असे. पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला होता. १९३० व्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूर शहर विशेष गाजले. या आंदोलनादरम्यान दि.९, १०, ११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर शहर ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होते. मे-जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस सोलापूर शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला होता.

सोलापूर जिल्हा संक्षिप्त माहिती

१. भौगोलिक स्थान : महाराष्ट्र राज्याच्या आग्नेयास सोलापूर जिल्हा वसलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस सातारा जिल्हा, पूर्वेस उस्मानाबाद जिल्हा, उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून, वायव्येस पुणे जिल्हा आहे. सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्चिम व नैऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हटले जाते. या जिल्ह्यात रब्बी ज्वारीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या जिल्ह्यातील ज्वारीची मालदांडी ३५-१ ही जात प्रसिद्ध आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात तांदूळ, बाजरी, भुईमूग, तूर, सूर्यफूल, रब्बी हंगामात गहू, हरभरा, करडई आणि ज्वारी, ऊस, सूर्यफूल ही पिके दोन्ही हंगामांत घेतली जातात. जलसिंचनाच्या सोयीमुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात फळबाग क्षेत्रात क्रांती झाली. डाळिंब, बोर या कोरडवाहू फळांसोबत आंबा, सीताफळ, आवळा, जांभूळ यांच्या फळबागा वाढत आहेत. सांगोला व पंढरपूर तालुक्यांमध्ये डाळिंबाची लागवड मोठ्या  प्रमाणावर केली जाते.

३. प्रमुख नद्या व धरणे : भीमा व नीरा या सोलापूर जिल्ह्यातील मुख्य नद्या असून, सिना, हरणी, बोटी, माण, भोगवती या भीमेच्या उपनद्यादेखील या जिल्ह्यातून वाहतात. या जिल्ह्यात माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर उजनी धरण आहे.
भीमा-सिना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाम होतो. भीमा-सिना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा जलबोगदा आहे.

४.उद्योग व व्यवसाय : सोलापूर जिल्ह्यात सोलापूर (अक्कलकोट रोड, होटगी रोड), चिंचोली, बार्शी, कुडूवाडी येथे औद्योगिक वसाहती आहेत. सोलापूर जिल्हा पूर्वीपासून हातमाग कापड उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे. येथील यंत्रमाग कापड उद्योगही प्रसिद्ध आहे. येथील चादरी व टर्किश टॉवेल्स भारतभर प्रसिद्ध आहेत. केम येथील हळदीपासून बनविले जाणारे कुंकू प्रसिद्ध असून, पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तालुक्यांतील विणलेल्या घोंगड्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

५.दळणवळण : सोलापूर जिल्ह्यातून पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ९, सोलापूर-विजापूर-मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ जातो. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून सुरू होतो आणि पुढे कर्नाटक राज्यात प्रवेश करतो. धुळेह्रसोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ आणि रत्नागिरी जिल्ह्यातून नागपूरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ गेला आहे. सोलापूर जिल्हा रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र असून, सोलापूरला दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणतात.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

सोलापूर जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • शहर सुती कापड उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र असून, या शहरात यंत्रमाग, हातमाग व अनेक कापडगिरण्या आहेत. येथील चादरी ‘सोलापुरी चादर’ या नावाने विशेष प्रसिद्ध आहे.
  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे विठ्ठल व रुक्मिणीचे मंदिर आहे. भीमा नदीने येथे चंद्रकोरीसारखा आकार धारण केल्याने तिला ‘चंद्रभागा’ नदी म्हणूनदेखील ओळखले जाते.
  • सोलापूरपासून २० किमी अंतरावर वसलेले नान्नज अभयारण्य हे ठिकाण हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा ‘माळढोक’ या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे.
  • महाराष्ट्रामध्ये सोलापूर हा जिल्हा चादरीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
  • चोखामेळा, दामाजीपंत व कान्होपात्रा या संतांच्या वास्तव्याने पूनित झालेले मंगळवेढे हे ठिकाण सोलापूरमध्ये आहे.
  • चीनमधील युद्धकाळात १९३८ ते १९४२ यादरम्यान तेथे जाऊन गोरगरिबांची सेवा करणारे डॉ. द्वारकानाथ कोटणीस हे आंतरराष्ट्रीय आदर्श व्यक्ती सोलापूरचेच होय.
  • सोलापूर जिल्ह्यातील सांगोले हे तालुक्याचे ठिकाण जनावरांच्या बाजारासाठी व डाळिंबाकरिता प्रसिद्ध आहे.
  • सोलापूरला स्वातंत्र्यपूर्व काळात ६ एप्रिल १९३० या दिवशी पुण्याचे ज्येष्ठ स्वा.सै.देशभक्त अण्णासाहेब भोयरकर यांनी सोलापूर नगरपालिकेवर झेंडा फडकविला.
  • मराठी भाषेतील लावणीकार, शाहीर राम जोशी हे सोलापूर जिल्ह्यातलेच आहेत.
  • सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे.
  • श्री स्वामी समर्थ या जिल्ह्यातील अक्कलकोट येथे २१ वर्षे राहिले होते. येथेच त्यांची समाधी आहे. आज अक्कलकोट महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थान बनलेले आहे.
  • वेळापूर हे ठिकाण माळशिरस तालुक्यात येत असून येथे नटेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे.

सांख्यिकीक सोलापूर

(अ) भौगोलिक माहिती

१.क्षेत्रफळ=१४,८४५ चौ.किमी.

२. जंगलाचे प्रमाण=०.३२%

३. अभयारण्ये =माळढोक अभयारण्य (सोलापूर व अहमदनगर)

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =पुणे विभाग (पुणे)

२. जिल्ह्याचे मुख्यालय= सोलापूर

३. उपविभाग =०६ माळशिरस(अकलूज),पंढरपूर, सोलापूर १, सोलापूर २, मंगळवेढा,माढा (कुडूवाडी)

४. तालुके= ११ करमाळे, बार्शी,माढा,माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट. दक्षिण सोलापूर, सांगोला,
मंगळवेढा.

५.पंचायत समित्या =११

६. ग्रामपंचायत =१०२७

७. महानगरपालिका =०१ सोलापूर महानगरपालिका

८. नगरपालिका =१२

९. पोलीस मुख्यालय=०२ सोलापूर शहर पोलीसआयुक्तालय व सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक

१०. पोलीस स्टेशनची संख्या =सोलापूर आयुक्तालय (५) व
सोलापूर ग्रामीण पोलीस (२१)

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार

१.लोकसंख्या=४३,१७,७५६

२. साक्षरता= ७७.०२%

३. लिंग गुणोत्तर= ९३५

४. लोकसंख्येची घनता =२९०

हे पण वाचा>>>>>>>>>

सातारा जिल्हा माहिती

सांगली जिल्हा माहिती

पुणे जिल्हा माहिती

कोल्हापूर जिल्हा माहिती

तुम्हाला सोलापूर जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला सोलापूर जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Solapur District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment