बुलढाणा जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | buldhana Information In Marathi

buldhana marathi mahiti, buldhana Jilha Mahiti , buldhana Information In Marathi

बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – buldhana Information in Marathi

बुलढाणा जिल्हा

buldhana Information In Marathi
buldhana Information In Marathi

अजिंठ्याच्या डोंगरावर वसलेले भिल्लांचे वसतिस्थान म्हणजे ‘भिल्लठाणा.’ या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलडाणा हे नाव पडले असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. या जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात अश्मयुगीन अश्मास्त्रे व जोर्वे या ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीची मृदभांड्यांचे अवशेष व बृहदाश्मयुगीन अवशेष सापडल्याने या भागात इतिहासपूर्व काळापासून मनुष्याचा वावर असल्याचे स्पष्ट होते. महाभारत काळात बुलडाना जिल्हा ‘कुंतल’ देशात समाविष्ट होता. त्यानंतर य प्रदेशावर सातवाहन, यादव व त्यानंतर बहामनी मराठ्यांचे राज्य होते.

बुलढाणा जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : बुलडाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्यप्रदेश राज्याची सीमा लागलेली असून, दक्षिणेस परभणी, जालना व हिंगोली हे मराठवाठ्यातील तीन जिल्हे लागून आहेत. पूर्वेस अकोला व अमरावती जिल्हे लागून आहेत. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमध्ये सातपुडा पर्वताच्या रांगा पूर्व-पश्चिम पसरलेल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवर अजिंठ्याचे डोंगर असून, या डोंगरात पैनगंगा नदीचा उगम होतो. बुलडाणा जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग हा पूर्णा नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

२. प्रमुख पिके : कापूस व करडई हे बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाचे पीक असून, कापसाबरोबर येथील शेतकरी तूर, मूग, भुईमूग इत्यादी खरिपाची पिके आणि गहू व हरभरा ही रब्बीची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. जलसिंचनाच्या सोयीमुळे या जिल्ह्यात संत्री, ऊस, मिरची यांसारखी नगदी पिकेसुद्धा घेतली जातात.

३. नद्या व धरणे : पूर्णा व पैनगंगा या बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्या असून, विश्वगंगा, नळगंगा, बाणगंगा, निपाणी, ज्ञानगंगा, बोर्डी या पूर्णेच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. बुलडाणा जिल्ह्यात शेलापूरचा नळगंगा नदीवरील नळगंगा प्रकल्प, गेरू माटरगावजवळचा ज्ञानगंगा प्रकल्प, कोराडीनाला व मन प्रकल्प हे बुलडाणा जिल्ह्यातील उल्लेखनीय प्रकल्प आहेत. जिल्ह्यात अनेक मध्यम व छोटे सिंचन प्रकल्प आहेत, तर आणखी काही प्रकल्प नांदुरा, संग्रामपूर व मेहकर तालुक्यात (खडकपूर्णा, मन, पैनगंगा, पूर्णा या नद्यांवर) होणार आहेत.
मोताळा तालुक्यातील नळगंगा व संग्रामपूर तालुक्यातील वाण प्रकल्प इत्यादी धरणे आहेत.

४. उद्योगधंदे व व्यवसाय: बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगाव राजा, मलकापूर आणि बुलडाण्यात औद्योगिक वसाहती आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या जिल्ह्यात हातमाग व यंत्रमाग उद्योग आहेत. खामगाव येथे हिंदुस्थान लिव्हर कंपनीचा साबणनिर्मिती करणारा कारखाना आहे. बुलडाणा जिल्ह्यात तेलगिरण्या मोठ्या प्रमाणात असून, येथील करडईचे तेल प्रसिद्ध आहे.

५. दळणवळण : बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ गेला असून, मुंबई-कोलकाता हा प्रमुख लोहमार्ग या जिल्ह्यातून जातो. या लोहमार्गावर बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, खुमगाव बूर्ती, जलंब जंक्शन, शेगाव अशी प्रमुख रेल्वेस्थानके –
आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

बुलढाणा जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे उल्कापातामुळे निर्माण झालेले जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. तसेच या सरोवराजवळ जागतिक भौगोलिक अभ्यासाचे केंद्र आहे.
  • बुलढाणा शहरातील हवामान आरोग्यदायी असल्यामुळे येथे क्षयरोग निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. खामगाव येथे कुष्ठरोग निवारण केंद्र आहे.
  • शेगाव येथे श्री गजानन महाराजांची समाधी आहे. या ठिकाणी आनंदसागर हे पर्यटनस्थळ निर्माण करण्यात आले आहे. या ठिकाणाला भेट देण्याकरिता दुरून लोक येतात.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे सिंदखेडराजा हे जन्मस्थळ असून, येथे त्यांचे वडील लखुजी राजे जाधव या जिजाबाईच्या वडिलांची समाधी आहे.
  • विदर्भाचे प्रवेशद्वार म्हणून बुलडाणा जिल्ह्यास ओळखले जाते.
  • बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबरवरवा, ज्ञानगंगा व लोणार ही अभयारण्ये आहेत.
  • बुलढाणा जिल्ह्यातील करडईचे तेल प्रसिद्ध आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे सर्वांत उंच हनुमानाची मूर्ती आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे पौराणिक काळात ‘बैरजतीर्थ’ म्हणून ओळखले जात असे.
  • सिंदखेडराजा तालुक्यातील बाणखेडा, कोठली, सातगाव या गावातून अश्मयुगीन अश्मास्त्रे सापडलेली आहेत.
  • बुलढाणा हे शहर अजिंठ्याच्या डोंगररांगांत वसलेले असून या भागात हे शहर थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाची व एकमेव औद्योगिक वसाहत खामगाव येथे आहे.
  • खामगाव येथे हिंदुस्थान लिव्हर कंपनीचा साबणनिर्मिती करणारा कारखाना आहे.
  • देऊळगाव येथे असलेले प्रसिद्ध बालाजी मंदिर हे येथील विदर्भातील सर्वात संपन्न देवस्थान म्हणून ओळखले जाते.
  • जामोद हे गाव येथील प्राचीन जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. आहे. जामोद हे ठिकाण विड्यांच्या पानांच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध
    आहे.
  • सातगाव भुसारी येथे जोर्वे या ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीची मृदभांड्यांचे अवशेष व बृहदाश्मयुगीन अवशेष सापडल्याने या भागात इतिहासपूर्व काळापासून मनुष्याचा वावर असल्याचे स्पष्ट होते.
  • बुलढाणा जिल्ह्यातील जामोद हे गाव येथील प्राचीन जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

सांख्यिकीक बुलढाणा

(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ =९,६६१चौ.किमी
२. जंगलाचे प्रमाण= ६.११%
३. अभयारण्ये= अंबाबरवा, लोणार व ज्ञानगंगा
४. राष्ट्रीय उद्याने =नाही
५. व्याघ्र प्रकल्प =नाही
६. वनोद्याने =राणीबाग लोणार व बुलढाणा

(आ)प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय=अमरावती विभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय= बुलढाणा
३. उपविभाग=६ (बुलढाणा, मेहकर, खामगाव, सिंदखेड राजा, मलकापूर,जळगाव जामोद)
४. तालुके=१३ (जळगाव (जामोद), मलकापूर, बुलढाणा, खामगाव, नांदुरा, चिखली, मेहकर, देऊळगावराजा, शेगाव, सिंदखेडराजा, संग्रामपूर, लोणार, मोताळा)
५. पंचायत समित्या= १३
६. ग्रामपंचायत =८६७
७. महानगरपालिका =नाही
८. नगरपालिका =११
९. पोलीस अधीक्षक =०१बुलढाणा पोलीस अधिक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या =२७

(इ) लोकसंख्याविषयी माहिती
१. लोकसंख्या= २५,३२,४८०
२. साक्षरता= ८२.०९%
३. लिंग गुणोत्तर= ९२८ ४.
४.लोकसंख्येची घनता =२६८

तुम्हाला बुलढाणा जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – buldhana District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment