नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. डीआरडीओ मध्ये नोकर भरती सुरू आहे. तरी या लेखातून तुम्ही सर्व माहिती मिळवून अर्ज करा. मित्र मैत्रिणींनो कन्सल्टंट(सल्लागार)या पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. याची सर्वांनी दक्षता घ्यावी.या भरतीसाठी ची वयोमर्यादा तसेच नोकरीचे ठिकाण कोणते असणार पगार आणि अर्ज फी अर्जाची लिंक तसेच जाहिरात सर्व काही या लेखांमध्ये सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा लेख संपूर्ण वाचा व मगच अर्ज करा.
DRDOडिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) भरती म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मे 2023 आहे. आणि ही तारीख चुकविल्यास कुणाचेही अर्ज स्वीकारण्यात येत नाही त्यामुळे 2 मे 2023 च्या आत अर्ज करणे गरजेचे आहे.डीआरडीओ भरती 2023 अधिसूचनानुसार या पदासाठी केवळ एक जागा रिक्त झालेली आहे. तरी तुम्हाला हे पद भूषवायचे असेल तर नक्कीच अर्ज करा. आणि तुमची नियुक्ती झाल्यास तुम्हाला एक वर्ष हे पद भूषवायला मिळणार आहे. म्हणजेच एक वर्षाच्या कालावधीसाठी तुमची नियुक्ती करण्यात येणार आहे.
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच(DRDO) अधिसूचनेनुसार या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 63 वर्षापेक्षा कमी असायला हवे.
आणि निवड झालेल्या उमेदवाराला स्पेस केल 14 प्रमाणे मासिक पगार मिळणार आहे. ते २ लाख ६० पर्यंत मासिक पगार मिळेल.
पदाचे नाव – कन्सल्टंट (सल्लागार)
रिक्त जागा – १
शैक्षणिक पात्रता तसेच अनुभव–
उमेदवार हा अधिकारी जो केंद्र किंवा राज्य सरकार, PSUs, स्वायत्त संस्था, विद्यापीठं, सरकारच्या R&D ऑर्गनायझेशनमधून सेवानिवृत्त झालेला असणे गरजेचे आहे. ज्या पदासाठी उमेदवार अर्ज करत आहे, त्यातील प्रॅक्टिकल नॉलेज व अनुभव असावा. DRDO मध्ये काम करण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात येते. उमेदवाराचे लेखी व तोंडी कम्युनिकेशन स्कील चांगलं असणे गरजेचे आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
डायरेक्टर, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट लेबोरेटरी, (DRDL), गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, संरक्षण मंत्रालय, DRDO, डॉ. एपीजे अब्दुल कलाम मिसाईल कॉम्प्लेक्स, कांचनबाग पीओ, हैदराबाद, तेलंगणा – ५०० ०५८, फोन क्रमांक ०४०-२४५८३०१७
🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा