60 general knowledge questions with answers in marathi
(१) ऑक्टोबर २००६ मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने (IAU) कोणत्या ग्रहाचे ग्रहपद काढून त्याचा समावेश छोट्या ग्रहांच्या समूहात केला ?
=प्लुटो
(२) सर्वप्रथम आकाशगंगेबाबत भाकित करणारा खगोलशास्त्रज्ञ कोण ?
=हर्षल
(३) सूर्याचे प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती मिनिटे लागतात?
=८ मिनिटे १६ सेकंद
(४) चंद्रावरून प्रकाशकिरण पृथ्वीवर पोहोचायला किती वेळ लागतो ?
=१.३ सेकंद
(५) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
=बुध
(६) पृथ्वीपासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?
=शुक्र
(७) ग्रहांमध्ये सर्वाधिक घनता पृथ्वीची आहे, तर सर्वांत कमी घनत्व असलेला ग्रह कोणता ?
=शनी
(८) कोणत्या ग्रहाची परिवलन व परिभ्रमण या दोन्ही गती जवळपास सारख्याच आहेत ?
=शुक्र
(९) सर्वांत कमी परिवलन गती कोणत्या ग्रहाची आहे?
=शुक्र
(१०) सूर्यकुळातील सर्वांत मोठा ग्रह गुरू आहे, तर सर्वांत लहान ग्रह कोणता आहे?
=बुध
(११) कोणत्या दोन ग्रहांचा आकार जवळपास सारखाच असल्यामुळे त्यांना जुळे ग्रह असे संबोधतात.?
=पृथ्वी व शुक्र
(१२) सूर्यकुळातील तारा असे कोणत्या ग्रहाला संबोधतात.?
=शुक्र
(१३) मंगळ या ग्रहाला ….असेही संबोधतात.?
=लाल ग्रह
(१४) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला तारा कोणता ?
=प्रॉक्झिमा सेंटॉरी
(१५) सूर्याचा व्यास पृथ्वीच्या व्यासापेक्षा किती पटींनी मोठा आहे ?
=१०९ पटींनी
(१६) सूर्याच्या आकारामध्ये किती पृथ्वी बसू शकतात ?
=जवळपास तेरा लक्ष
(१७) सूर्यापासून मिळणारा प्रकाश कशामुळे मिळतो?
=हायड्रोजनच्या एकत्रीकरणाने
(१८) पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते?
=पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
(१९) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के भाग दिसतो ?
=५९ ट्टक्के
(२०) सूर्यकुळात सर्वाधिक गुरुत्वाकर्षण शक्ती असलेला ग्रह कोणता ?
=गुरू
(२१) कोणत्या ग्रहावर ‘शुमेकर लेव्ही’ हा धुमकेतू आदळला होता ?
=गुरू
(२२) सूर्याला स्वतःभोवती फिरण्याला (परिवलनाला) किती कालावधी लागतो ?
=२५ दिवस
(२३) चंद्र दररोज noकिती मिनिटे उशिरा उगवतो ?
=५० मिनिटे
(२४) सूर्यसिद्धांत कुणी मांडला ?
=पेरी लाप्लासे
(२५) सूर्यमालेतील निळ्या रंगाचा ग्रह कोणता ?
=पृथ्वी
(२६) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?
= ७६ वर्षांनी
(२७) पृथ्वी गोल असल्याची कल्पना सर्वप्रथम कुणी मांडली ?
=ग्रीकांनी
(२८) चंद्रावर सर्वप्रथम मानवाने पाऊल केव्हा ठेवले ?
=२१ जुलै, १९६९
(२९) सूर्यापासून मिळणाच्या एकूण प्रकाशाच्या किती टक्के भाग चंद्रावरून परावर्तीत होतो ?
=७ टक्के
(३०) सूर्यकुळातील सर्वांत मोठा उपग्रह कोणता ?
=गनिमेड
(३१.) सर्वांत गजबजलेले बंदर?=रोटरडॅम (नेदरलँड)
(३२.) सर्वांत मोठे लोहमार्गाचे जाळे?=अमेरिका
(३३.) जगातील सर्वात उंचीवरील लांब बोगदा?=अटल टनल (भारत) लांबी : ८.८ कि.मी.
(३४. )सर्वांत लांब मानवनिर्मित कालवा?=सुऐझ कालवा (इजिप्त)
(३५.) सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन.? =बोलिव्हियामधील कंडोर स्टेशन
(३६.) सर्वांत लांब रेल्वे प्लॅटफॉर्म?=गोरखपूर (उत्तरप्रदेश) १३६६ मी.
(३७) दिवसासुद्धा दिसू शकणारा सूर्यमालेतील सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता?
=शुक्र
(३८) वातावरणातील कोणता वायू अल्ट्राव्हॉयलेट किरणे शोषून घेतो?
=ओझोन
(३९) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?
=तपांबर
(४०) पृथ्वीच्या पृष्ठभागास म्हणजे सर्वांत वरच्या थरास काय म्हणतात ?
=सियाल
(४१) ‘सियाल’ या थरात कोणती मूलद्रव्ये आढळतात?
=सीलिकेट व अल्युमिनियम
(४२) ‘सियाल’ला लागून असलेल्या खालच्या थरास काय म्हणतात ?
=सायमा
(४३) सायमा या थरात कोणती मूलद्रव्ये आढळतात?
=सिlलिका व मॅग्नेशियमल
(४४) पृथ्वीच्या सर्वांत आतील थरास काय म्हणतात ?
=गाभा
(४५) पृथ्वीच्या गाभ्यात Ni व Fe मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे त्याला कोणत्या नावाने संबोधतात?
=निफे
(४६) उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने त्या गोलार्धास असेही म्हणतात. ?
=भुगोलार्ध
(४७) आंतरराष्ट्रीय संकेतानुसार, इंग्लंडमधील या शहराजवळून जाणाऱ्या रेखावृत्तास मूळ रेखावृत्त मानले जाते ?
=ग्रीनविच
(४८) हिमालय व अँडीज हे घडीचे पर्वत कोणत्या महासागराचा तळ उंचावल्यामुळे निर्माण झाले?
=टेथिस महासागर
(४९) भूकंपाची तीव्रता कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने मोजली जाते ?
=सिस्मोग्राफी
(५०) भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र यांना जोडणारा कालवा कोणता ? …
=सुएझ
(५१) जगातील सर्वांत मोठा कालवा (लांबी १६२ किमी. व रुंदी १०० मी.) सुएझ कालवा बांधण्याचे श्रेय कुणाला जाते ?
=फर्डिनांड डी. लेप्सेस –
(५२) अटलांटिक आणि पॅसिफिक हे दोन महासागर जोडणारा कालवा कोणता ?
=पनामा
(५३) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दिवसांना काय म्हणतात. ?
=विशुवदिन
(५४)समुद्राची खोली मोजण्याच्या परिमाणास काय म्हणतात ?
=फॅदम
(५५) वाळवंटामधील हिरवळीच्या प्रदेशास काय म्हणतात ?
=ओअॅसिस
(५६) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात ?
=परिभ्रमण
(५७) ग्रिनीच प्रमाणवेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ किती तासांनी पुढे आहे ?
=५ 1-2 तास
(५८) उन्हाळ्यात ख्रिसमस साजरा करणारे शहर कोणते ?
=सिडणे
( ५९) अरबी समुद्र व बंगालचा उपसागर कोणत्या महासागराचे भाग आहेत ?
=हिंदी महासागर
(६०) कोणत्या ग्रहाची परिवलन गती सर्वांत जास्त आहे ?
=गुरू
हे पण वाचा..>>>>>>>>>