Maharashtra Board class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही (Aatmvishwasasarkhi Shakti Nahi)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1. Solutions आत्मविश्वासासारखी शक्ती नाही ( Aatmvishwasasarkhi Shakti Nahi Notes) Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

12th Marathi Guide Prashn uttar Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही
Textbook Questions and Answers

★ कृती २. अभिव्यक्ती.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.

उत्तर : स्वतःविषयी वाटणारा दृढविश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास ही मानसिक शक्ती आहे. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. विचारांमधील दृष्टिकोनच आपला आत्मविश्वास वाढवत असतो. आत्मविश्वास मिळवण्यासाठी प्रथम ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता असते. ध्येय पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो. आत्मविश्वासामध्ये
स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. काही वेळा जीवनामध्ये आपले ध्येय गाठणे तर तुम्हाला अपयश येते म्हणजेच आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.
असे अनेक प्रसंग येतात ज्यामुळे आपल्याला कठीण वाटू लागते. एखादे काम पूर्ण होईल की नाही याबद्दल मनात शंका येऊ लागतात. मग त्याविषयी अनिश्चितता निर्माण होते. त्यावर उपाय म्हणजे आत्मविश्वास आणि तो कोणत्याही परिस्थितीत आपण गमावता कामा नये. तुम्ही संकल्प केलात की आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला विश्वास नसेल तर काम करण्याचा उत्साह राहणार नाही आणि जर विश्वास असेल तर तुम्हाला योग्य वाटणारी, तुम्ही ठरवलेली गोष्ट तुम्ही करता. त्यासाठी स्वतःवर विश्वास असणे फार आवश्यक आहे. कारण आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगही जिंकू शकता. तुमच्याकडे बुद्धिमत्ता, गुणवत्ता व क्षमता असेल पण आत्मविश्वास आपले ध्येय गाठणे तर तुम्हाला अपयश येते म्हणजेच आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे.

सृष्टीचे हे महान गान तुम्हाला एकदम ऐकू येणार नाही. सृष्टीशी परिचय वाढवा. तुम्हाला तिची अनंत भाषा, अनंत छंद – मग सारे कळू लागेल. जरा पहाटे उठत जा. बाहेर पडा. वारा अंगाला लागू दे. तृणपर्णे पाहा. तांबडे कसे काय फुटते? प्रकाश कसा येतो, पाहा, जीवनास मंगल असे प्रातः स्नान होईल. अमेरिकन ग्रंथकार थोरो म्हणतो, “दोन तास शेतात काम करा. तुमची सारी पोटदुखी जाईल. तुमच्या लिहिण्यात तेज, तजेला, नवजीवन येईल.” आज सृष्टीपासून आपली फारकत झाली आहे. तुम्ही अजून नवीन आहात. ही चूक करू नका. जिज्ञासा, कौतुक वृत्ती यात साहित्याचा आत्मा आहे. प्रत्येक वस्तूजवळ जाणे, तिला बघणे, तिच्याजवळ बोलणे यातील गंमत तर पाहा, तुम्ही झपाट्याने वाढत जाल.
अशा रीतीने अनेक अनुभव घ्यावे. जीवन अनुभवाने समृद्ध करावे. सृष्टीच्या सान्निध्यातील अनुभव, मानवी जीवनातील अनुभव शेतकरी व्हा, कामगार व्हा. ते जीवन बघा, आणि वादळात फिरायला जा. उंच डोंगर चढा. दऱ्यांत उतरा. सागरात डुंबा. एका चिनी चित्रकाराची गोष्ट आहे. वादळात, मुसळधार पावसात समुद्र कसा दिसतो ते त्याला पहायचे होते. तो समुद्रात कित्येक तास उभा होता. सभोवतीचे वारे, लाटांचे तुषार नि फेस यांची अंगावर वृष्टी होत होती. वरून मुसळधार पाऊस! आणि तो चित्रकार लाटांत सारखा उभा होता. सर्वांगाचे डोळे नि कान करून पाहात होता, ऐकत होता. उत्कटतेशिवाय काही नाही. साहस, मोठमोठ्या गोष्टी, विशाल ध्येये, अपार अभ्यास, भरपूर अनुभव, असे करून जीवन सर्व बाजूंनी समृद्ध नि उदात्त करा. तेजस्वी, निर्भय आणि सहानुभूतीचे असे बना.

अभिव्यक्ती / स्वमत :

Telegram group मध्ये जॉईन व्हा

(३) ‘जीवन अनुभवाने समृद्ध करावे’ याबाबत तुमचे स्वमत मांडा.

उत्तर: जिज्ञासा वा कुतूहल ही एक मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे, जी गोष्ट आपण आजवर प्रत्यक्ष पाहिली नाही, ज्या गोष्टीचा आपणास अनुभव नाही, जे आपण आजवर कधीच समजून घेतले नाही ते समजून घेण्याची जिज्ञासा मनात सदैव जागी हवी. जीवन वाटचालीत नानाविध अनुभव घेतल्याशिवाय आपले जीवन अनुभवसमृद्ध होत नाही. सृष्टीच्या सान्निध्यातील नानाविध अनुभव घेतल्याशिवाय तिची अनंत भाषा, अनंत छंद खऱ्या अर्थाने समजणार नाही. सृष्टीशी परिचय वाढवल्याशिवाय तिचे महान गान आपल्याला ऐकू येणार नाही. जीवन वाटचालीत नानाविध अनुभव घेतल्याशिवाय जीवनही खऱ्या अर्थाने समजणार नाही. शेतकरी, कामगार झाल्याशिवाय त्यांचे दुःख, वेदना आपणास कळणार नाही. वादळवायत, मुसळधार पावसात बाहेर पडल्याशिवाय, डोंगर-दऱ्यांमध्ये हिंडल्याशिवाय त्याची भव्यता व सौंदर्य यांचा साक्षात्कार होणार नाही. सृष्टीच्या सान्निध्यात गेल्याशिवाय, निसर्गाच्या उत्कटतेत स्वतःला झोकून दिल्याशिवाय निसर्ग खऱ्या अर्थाने कळणार नाही. पहाटे लवकर उठल्याशिवाय तांबडे कसे फुटते हे समजणार नाही. थोडक्यात, जीवन अनुभवाने समृद्ध केले पाहिजे. जीवन समजून घेतले पाहिजे.

Leave a Comment