Raigad marathi mahiti, Raigad Jilha Mahiti, Raigad Information In Marathi,Raigad District Information, Raigad pin code maharashtra
रायगड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Raigad Information in Marathi .
रायगड जिल्हा
रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी व धारापुरीजवळील बुचर आयलँड बेटावर अश्मयुगीन हत्यारे सापडलेली आहेत. या शोधामुळे रायगड जिल्ह्यात १५ ते ६० लाख वर्षांपूर्वी मानवी संस्कृती अस्तित्वात असावी, असा अंदाज आहे. इतिहासानुसार या भागावर मौर्य, सातवाहन, शिलाहार त्यानंतर आदिलशाही, मोगल, पोर्तुगीज, हब्शी यांची सत्ता होती. मराठेशाहीचा अंमलही रायगड जिल्ह्याने पाहिला. इ. स. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला ताब्यात घेतला व या ठिकाणास राजधानीचा दर्जा मिळाला. मराठ्यांचे आरमार प्रमुख असलेले कान्होजी आंग्रे यांचा सागरी किनाऱ्यावर दरारा होता. सन १८१८ मध्ये पेशवेशाहीचा अस्त झाल्यानंतर हा भाग ब्रिटिश सत्तेच्या ताब्यात गेला. हा जिल्हा पूर्वी कुलाबा या नावाने ओळखला जात असे. या जिल्ह्याचे नामकरण १ जानेवारी, १९८१ रोजी रायगड जिल्हा असे करण्यात आले.
रायगड जिल्हा संक्षिप्त=माहिती
१.भौगोलिक माहिती : रायगड जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागातील जिल्हा असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस ठाणे जिल्हा व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा असून, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगेला लागून पुणे जिल्हा आहे. आग्नेयास सातारा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्याला एकूण २४० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
२. प्रमुख पिके : भात किंवा तांदूळ हे या जिल्ह्यातील मुख्य पीक असून, भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा आहे. तांदूळ या पिकाबरोबर नाचणी व वरई ही पिके घेतली जातात. अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे नारळाच्या बागा आहेत. श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड येथे पोफळी व सुपारींची आगरे अधिक प्रमाणात आढळतात. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे. तसेच येथील डोंगर उतारावरील तांबड्या मातीत आंब्याची लागवड केली जाते. या पिकांबरोबरच वाल, तूर, काजू, कलिंगड यांचेही उत्पादन या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. समृद्ध सागरी किनारा, खाड्या, खाजणे यांच्या अस्तित्वामुळे येथे मत्स्यशेती व कोळंबीची शेती केली जाते.
३. नद्या व धरणे : रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात उल्हास, पाताळगंगा आणि अंबा, मध्य भागात कुंडलिका व दक्षिण भागामध्ये सावित्री, घोड आणि काळ या नद्या आहेत. या नद्या कमी लांबीच्या व वेगाने वाहणाऱ्या असून, या सर्व नद्या अरबी समुद्राला मिळतात. उल्हास ही नदी रायगड जिल्ह्यामध्ये २१ किमी वाहून पुढे ठाणे जिल्ह्यात शिरते. या सर्व नद्या तीव्र वेगाने सह्याद्रीच्या उतारावरून वाहतात. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी या नद्यांच्या पात्रामध्ये शिरल्यामुळे खाड्या तयार झालेल्या आहेत.
४. खनिज संपत्ती : जिल्ह्यात उरणजवळ समुद्रात खनिज तेलाचे साठे आहेत. पेण, पनवेल, उरण या तालुक्यांमध्ये किनारी भागात मोठ्या प्रमाणावर मिठागरे आहेत. बॉक्साईटचे साठे मुख्यतः मुरूड, रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत आढळतात. या
लोहखनिजाचेही साठेसुद्धा अल्प प्रमाणात मिळाले आहेत.
५. उद्योग व व्यवसाय : महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे सुरू झाले. त्याचबरोबर भिरा व भिवपुरी हीदेखील दोन महत्त्वाची जलविद्युत केंद्रे येथे आहेत. उरण येथे गॅसवर आधारित विद्युतनिर्मिती केंद्र आहे. नागोठाणे येथे सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन पेट्रोकेमिकलचा मोठा प्रकल्प आहे. थळ-वायशेत येथे राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स हा सार्वजनिक क्षेत्रातील खत प्रकल्प कार्यरत आहे. पनवेल तालुक्यात रसायनी येथे हिंदुस्थान ऑरगॅनिक केमिकल्स हा प्राथमिक रसायने तयार करण्याचा प्रकल्प असून, येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविकांची (अँटिबायोटिक्स) निर्मिती केली जाते. तसेच कीटकनाशके बनविणारा आशियातील सर्वात मोठा हिंदुस्थान इन्सेक्टिसाईड्स हा कारखानाही पनवेल तालुक्यात रसायनी येथे आहे. याच तालुक्यात आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणारा धूतपापेश्वर हा मोठा कारखाना आहे. रायगड जिल्ह्यास समुद्रकिनारा लाभल्यामुळे या ठिकाणी असलेल्या खाड्यांमुळे मासेमारी व प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. पापलेट, हाईद, सुरमई, बांगडा इत्यादी जातींचे मासे येथे पकडले जातात.
(८)दळणवळण : या जिल्ह्यातून मुंबई-पुणे हा द्रुतगती महामार्ग, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्र. ४, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. १७ व राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ ब आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ क या जिल्ह्यातून गेलेले आहेत. मध्य रेल्वेचा दक्षिण भारताला जोडणारा मुंबईहपुणेह्रबंगळुरू रेल्वेमार्ग व गोव्याला जोडणारा कोकण रेल्वे लोहमार्ग याच जिल्ह्यातून गेला आहे. या जिल्ह्यातील न्हावाशेवा या ठिकाणी जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) या नावाने अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय बंदर उभारण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे.
- अलिबाग व भिरा येथे हवामान खात्याची वेधशाळा आहे.
- रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील घारापुरी येथील गुफांमध्ये प्राचीन लेण्या असून, या गुफा ‘एलिफेंटा केव्हज’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
- रायगड जिल्ह्यातील महाड येथे अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक गणेशाचे मंदिर प्रसिद्ध आहे.
- कर्जत तालुक्यातील माथेरान हे सह्याद्री पर्वतावरील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
- या जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शिवथर घळ येथे समर्थ रामदासांनी ‘दासबोध’ हा ग्रंथ लिहिला. पनवेलपासून १० किमी अंतरावर पक्ष्यांसाठी राखीव असलेले कर्नाळा अभयारण्य आहे.
- पाली येथे अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर
- असून उन्हेर येथे गरम पाण्याचे झरे प्रसिध्द आहे .
- रायगड या दुर्गम व अभेद्य किल्ल्याचे वास्तुरचनाकार हिरोजी इंदलकर हे आहेत.
- आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव रायगर जिल्ह्यातील शिरढोण हे आहे.
- समुद्रात खडकांवर बांधलेला मुरुड जंजिरा हा किल्ला रायगड
- जिल्ह्यात मोडतो.
- रायगड जिल्ह्यातील महाड हे ठिकाण ‘चवदार तळ्याच्या सत्याग्रहाबद्दल’ इतिहासात प्रसिद्ध आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक समारंभ ६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. सांख्यिकीक रायगड
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ= ७,१४८ चौ. किमी
२. जंगलाचे प्रमाण=२४.१३%
३. अभयारण्ये = ०२ कर्नाळा पक्षी अभयारण्य व फणसाड अभयारण्य
४. वनोद्याने= घारापुरी व माथेरान
आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय=कोकण विभाग नवी मुंबई
२. जिल्ह्याचे मुख्यालय =अलिबाग
३.उपविभाग=०८ (माणगांव, अलिबाग पनवेल, पेण, कर्जत, रोहा, श्रीवर्धन व महाड)
४. तालुके= १५ (कर्जत, पनवेल, उरण, मुरूड, पेण, रोहा, खालापूर, महाड, सुधागड, अलिबाग, म्हसाळा, माणगाव, श्रीवर्धन, पोलादपूर, तळा.
५. पंचायत समित्या= १५
६. ग्रामपंचायत= ८२५
७महानगरपालिका=०१ पनवेल
८. नगरपालीका=१०
९. पोलीस मुख्यालय=०१ जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या= २२
(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या =२६,३४,२००
२. साक्षरता= ८३.१%
३. लिंग गुणोत्तर= ९५५
४. लोकसंख्येची घनता =३७०
हे पण वाचा>>>>>>>>>>
तुम्हाला रायगड जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला रायगड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Raigad District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.