Beed marathi mahiti, Beed Jilha Mahiti, Beed Information In Marathi, Beed District Information, Beed pin code maharashtra
बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Beed Information in Marathi
बीड जिल्हा
प्राचीन काळात गोदावरीच्या दक्षिण तीरावरील प्रदेशास अश्मक असे म्हटले जात असे. या अश्मकात बीड जिल्ह्याचा काही भाग मोडत असावा, असे दिसते. चालुक्य घराण्याची या प्रदेशावर सत्ता असताना चालुक्य राजा विक्रमादित्याची बहीण चंपावतीने बीड शहराचे नामकरण चंपावतीनगर असे केल्याचा उल्लेख इतिहासात आहे. महंमद तुघलकांच्या काळात या भागाचे नाव ‘बीड’ असे पडले.पेशव्यांच्या कालखंडात निजाम व मराठे यांच्यामध्ये राक्षस भुवन व खर्डा येथे झालेल्या लढाया इतिहासात प्रसिद्ध आहेत
बीड जिल्हा संक्षिप्त माहिती
१. भौगोलिक स्थान : या जिल्ह्याच्या उत्तरेस जालना व औरंगाबाद हे दोन जिल्हे असून, पूर्वेस लातूर जिल्हा, दक्षिणेस उस्मानाबाद जिल्हा, पश्चिमेस अहमदनगर जिल्हा, ईशान्येस परभणी जिल्हा आणि आग्नेयास कर्नाटक राज्यातील बिदर जिल्हा आहे.
२. प्रमुख पिकेः ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून, येथे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात ज्वारीचे पीक घेतले जाते. बीड जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी वाढल्यामुळे उसाचे पीक घेतले जाते. याशिवाय सूर्यफूल, द्राक्ष, आंबा व कलिंगडाचे पीक जिल्ह्यात घेतले जाते. या जिल्ह्यातील नेकनूर भागातील काला पहाड व अंबेजोगाईमधील पेवंदी आंबे प्रसिद्ध आहेत.
३. नद्या व धरणे : बीड जिल्ह्यात गोदावरी, मांजरा व सिना या बीड जिल्ह्याच्या तीन मुख्य नद्या असून, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण, लिंब, भामटी, वाघी, चौसाळा, येळंब, चंदन, केज, होळ, रेना व लिंबा या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. सिंदफणा नदीवर माजलगाव प्रकल्प, मांजरा नदीवर केज तालुक्यात मांजरा प्रकल्प, बीड तालुक्यात पाली येथे बिंदुसरा नदीवर प्रकल्प आणि अंबेजोगाई तालुक्यात वाण नदीवर प्रकल्प आहेत.
४. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात केवळ बीडमध्येच औद्योगिक वसाहत आहे. परळी येथे १९७० मध्ये औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण सात सहकारी साखर कारखाने आहेत. बीड व वडवणी या ठिकाणी हातमाग आहे. परळी, बीड व अंबेजोगाई या भागामध्ये तेलगिरण्या, तर बीड येथे बनविले जाणारे छागल नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहेत आणि पाटोदा तालुक्यातील अमळनेर हे गाव तांबे-पितळ्याच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.
७)दळणवळण : बीड जिल्ह्यातून धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग
क्र. २११ जातो. तसेच बीड जिल्ह्यातून परळी बैजनाथ, उद्गीर, पंढरपूर, मिरज आणि परभणी, पूर्णा, हिंगोली ते वाशीमवरून अकोल्याकडे जाणारा लोहमार्ग गेला आहे.
बीड जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- बीड शहराचे जुने नाव चंपावतीनगर होते. या शहराजवळ ‘खजाना बावडी’ नावाची प्रसिद्ध विहीर असून, ही विहीर हिजरी ९९१ मध्ये निजामशहाच्या सलाबत खान नावाच्या सरदाराने बांधली.
- बीड तालुक्यातील मांजरसुभा या गावी ‘कपिलधार’ नावाचा धबधबा या ठिकाणी आहे.
- अंबेजोगाईची योगेश्वरी हे एकमेव शक्तिपीठ असलेल्या तीर्थक्षेत्राला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, आद्यकवी मुकुंदराज व दासोपंथ यांची समाधी येथे आहे.
- परळी येथे प्रसिद्ध वैजनाथ ज्योतिर्लिंग आहे.
- बीड जिल्ह्यातील बालाघाटच्या डोंगरात लभाण आदिवासी
जमात आहे. - प्राचीन भारतातील प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्य हे बीडच्याच परिसरातील होते, असे म्हटले जाते.
- स्वामी रामानंद तीर्थ यांनी निजामशाहीविरुद्ध स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात आंबेजोगाई येथूनच केली होती.
सांख्यिकीक बीड माहिती मराठी
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ१०,६९३ चौ.किमी.
२. जंगलाचे प्रमाण१.६४%
३. अभयारण्य नायगाव मयूर अभयारण्य
४. वनोद्याने हिमायतबाग
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय औरंगाबादविभाग
२. जिल्ह्याचे मुख्यालय बीड
३. उपविभाग= ०५ (बीड, माजलगाव, पाटोदा,परळी व अंबेजोगाई)
४. तालुके =११
५. पंचायत समित्या= ११
६. ग्रामपंचायत =१०२०
७. नगरपालिका =०६
८. नगरपंचायत =०५ (केज, वडवणी, पटोदा,शिरूर, आष्टी)
९. पोलीस मुख्यालय= ०१ बीड जिल्हा पोलीस अधीक्षक
१०. पोलीस स्टेशनची संख्या= २२
(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या =२५,८५,०४९
२. साक्षरता =७६.९९%
३. लिंग गुणोत्तर =९३६
४. लोकसंख्येची घनता= २४२
हे पण वाचा >>
तुम्हाला बीड जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला बीड जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Beed District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.