गडचिरोली जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके | gadchiroli Information In Marathi

gadchiroli marathi mahiti, gadchiroli Jilha Mahiti , gadchiroli Information In Marathi

गडचिरोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – gadchiroli Information in Marathi

गडचिरोली जिल्हा

gadchiroli Information In Marathi
gadchiroli Information In Marathi

गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांत अश्मयुगीन व प्राचीन काळात नागवंशीय, गोंड, माणवंशीय यांच्यासह राष्ट्रकूट, यादव व चालुक्य राजांचीही सत्ता होती. १८५४ मध्ये चंद्रपूर, गडचिरोली हा भाग बेरार प्रांतात असताना हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला. महाराष्ट्र शासनाने २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केली.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

गडचिरोली जिल्हा संक्षिप्त – माहिती

१. भौगोलिक स्थान : गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा असून, या जिल्ह्याच्या उत्तरेस गोंदिया जिल्हा असून, पूर्वेस छत्तीसगड राज्याची सीमा लागलेली आहे. पश्चिमेस चंद्रपूर व आदिलाबाद (तेलंगणा राज्य) जिल्हे आहेत.

२. वनक्षेत्र : गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तीन चतुर्थांशापेक्षा अधिक प्रदेश घनदाट अशा जंगलांनी व्यापलेला आहे. या जिल्ह्याच्या एकूण जमिनींपैकी ७५.९६ % क्षेत्र वनांखाली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण आणि वनाखाली असलेले एकूण क्षेत्र, या दोन्ही दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा राज्याचा प्रथम क्रमांक लागतो.

३. नद्या व धरणे : या जिल्ह्यात इंद्रावती, वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी या प्रमुख नद्या असून आढवी, खोब्रागडी, काठाणी, सिवनी, पोर व दार्शनी या अन्य नद्या जिल्ह्यातून वाहतात. वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास ‘प्राणहिता’ असे म्हणतात. प्राणहिता नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. या जिल्ह्यात दिना नदीवरचे दीना धरण, पोटफोडी नदीवरचे कारवाफा व खोब्रागडी नदीचे तुलतुली धरण ही मुख्य धरणे आहेत.

४. प्रमुख पिके : गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक भात असून,गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, कुरखेडा व धानोरा हे तालके
भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर या जिल्ह्यात ऊस, तंबाखू व शिंगाड्याचे उत्पादनही घेतले जाते.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

५. खनिजे संपत्ती : गडचिरोली जिल्हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने अतिशय संपन्न जिल्हा आहे. या जिल्ह्यात लोह, चुनखडी, दगडी कोळसा व तांबे ही खनिजे प्रामुख्याने सापडतात. सुरजागड, भामरागड, दमकोट, गडचिरोली, देऊळगाव परिसर लोहखनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. चामोर्शीजवळ मारोडा, रेगडी, शिरकाटोला येथे तांब्याचे साठे आढळतात. तसेच सिरोंचा तालुक्यात चुनखडीचे साठे आहेत. गडचिरोली तालुक्यात कठाणी नदीपरिसरात दगडी उद्योगविरहित : कोळशाचे साठे आहेत.

६. उद्योग व व्यवसाय : शासनाने हा जिल्हा घोषित केल्याने जिल्ह्यात उद्योगांची संख्या अतिशय कमी आहे.
या जिल्ह्यातील वडसा व देसाईगंज येथे औद्योगिक वसाहती आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे हातमाग उद्योग असून, आरमोरीमधील कोशा कापड (रेशीम) प्रसिद्ध आहे. देसाईगंज व आष्टी येथे कागदगिरण्या आहेत.

७. दळणवळणः गडचिरोली जिल्ह्यामधून, सिरोंचा येथून निझामाबाद-जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १६ गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकही रेल्वे स्थानक नाही.

गडचिरोली जिल्ह्याची वैशिष्ट्ये

  • गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे डॉ. विकास आमटे यांनी स्थापन केलेले आदिवासी रुग्णांवर उपचार करणारे फार मोठे केंद्र उभारण्यात आले आहे. आमटे यांच्या या आदर्श सेवाकार्याची जागतिक पातळीवर आवर्जून नोंद घेतली गेली असून, त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • मार्कंडा हे वैनगंगेच्या तीरावरील तीर्थस्थान असून, येथे खजुराहो मंदिर शैलीच्या धर्तीवरील मंदिरे आहेत.
  • सोमनूर येथे गोदावरी व इंद्रावती या नद्यांचा संगम झालेला असून, येथे महाराष्ट्र, छत्तीसगड व तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत.
  • चपराळा हे ठिकाण प्राणहिता नदीकाठावर असून, येथील चपराळा अभयारण्य प्रसिद्ध आहे.
  • वैरागड येथील प्रसिद्ध किल्ला खोब्रागडी
    व सातनाला नद्यांच्या संगमावर असून, हे ठिकाण विराट राजाची राजधानी होती. वैरागड हे ठिकाण हिऱ्यांसाठीही प्रसिद्ध आहे.
  • देसाईगंज (वडसा) येथे सुधारित गाई पैदास केंद्र आहे.
  • एटापल्ली येथे सर्वात दाट जंगल असून, येथील वृक्ष २०० * वर्षांपेक्षाही प्राचीन आहेत.
  • महाराष्ट्रात होणाऱ्या बालमृत्यूंचा सखोल अभ्यास करणारे व त्या संदर्भात अनेक उपाययोजना राबविणारे महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग व त्यांची पत्नी डॉ. राणी बंग यांची कर्मभूमी गडचिरोली जिल्हाच होय. त्यांचा शोधग्राम हा प्रकल्प याच ठिकाणी आहे.
  • गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तीनचतुर्थांशपेक्षा अधिक प्रदेश घनदाट अशा जंगलांनी व्यापलेला आहे. या जिल्ह्याच्या एकूण जमिनीपैकी ७५.९६% क्षेत्र वनांखाली आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राशी असलेले वनक्षेत्राचे प्रमाण आणि वनांखाली असलेले एकूण क्षेत्र ह्या दोन्ही दृष्टिकोनातून या जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक लागतो.
  • धानोरा व कुरखेडा या तालुक्यांतील वने तुलनेने अधिक दाट आहेत. जिल्ह्यातील चपराळा अभयारण्य चामोर्शी तालुक्यात विस्तारलेली आहेत. इथल्या जंगलांमध्ये १०० वर्षांपेक्षा जास्त जुने व ३५ ते ४० मीटर उंचीचे सागाचे वृक्ष आहेत.
  • या जिल्ह्यातून बल्लारपूर कागद कारखान्यास बांबू पुरविला जातो.
  • गडचिरोली-देऊळगाव परिसर लोह खनिजासाठी विशेष प्रसिद्ध आहे. चामोर्शीजवळ मारोडा, रेगडी, शिरकाटोला येथे तांब्याचे
    साठे आढळतात.
  • गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे हातमाग उद्योग असून आरमोरीमधील कोशा कापड (रेशीम) प्रसिद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव, कोटगल, इंदाळा इत्यादी ठिकाणी घोंगड्या बनविण्याचा उद्योग चालतो.
  • देसाईगंज व आष्टी येथे कागद गिरण्या आहेत.

सांख्यिकीक गडचिरोली – सर्व माहिती

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=१४,४१२ चौ किमी
२. जंगलाचे प्रमाण=७८%
३. अभयारण्ये=चपराळ व भामरागड
४. राष्ट्रीय उद्याने =नाही
५. व्याघ्र प्रकल्प =नाही
६. वनोद्याने नाही

(आ) प्रशासकीय माहिती

१. आयुक्तालय =नागपूर विभाग ( नागपूर)
२. जिल्ह्याचे मुख्यालय =गडचिरोली
३. उपविभाग=०६ गडचिरोली, कुरखेडा ,देसाईगंज एटापल्ली
अहेरी व चामोर्शी
४. तालुके= १२ कुरखेडा, अहेरी,धानोरा, सिरोंचा,कोरची, आरमोरी,चामोर्शी, एटापल्ली,गडचिरोली, भामरागड,मुलचेरा, देसाईगंज
५. पंचायत समित्या= १२
६. ग्रामपचायत= ४६७
७. नगरपालिका=०२ (वडसा, गडचिरोली)
८. पोलीस मुख्यालय =०१ गडचिरोली पोलीस अधीक्षक नक्षलवादी
९. पोलीस स्टेशनची संख्या =१९

(इ) लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणनेनुसार)

१. लोकसंख्या =१०,७१,७४१
२. साक्षरता= ६२.९७%
३. लिंग गुणोत्तर= ९७६
जिल्हा
४.लोकसंख्येची घनता= ६७

तुम्हाला गडचिरोली जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.

Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – gadchiroli District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.

Leave a Comment