……..Gk questions in marathi…….
1. मानवाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीच्या काळाला काय म्हणतात ? =प्रागैतिहासिक काळ
2. मानवाला लेखनकला अवगत झाल्यानंतरच्या काळाला काय म्हणतात ?=ऐतिहासिक काळ
3. ऐतिहासिक काळात भारतावर पहिले आक्रमण कोणी केले ?
=राजा दारियसने
4. 20 व्या शतकात भारतात कोणत्या संस्कृतीचा शोध लागला ?
=सिंधू संस्कृतीचा
5. प्राचीन जगातील विविध महत्वपूर्ण झालेल्या संस्कृतीपैकी भारतात कोणती संस्कृती होऊन गेली आहे?=सिंधू संस्कृत
6.सिंधू संस्कृतीचा अस्तित्व कालखंड कोणता होता ?=
सुमारे इ. स. पूर्व 2500
7. सिंधू संस्कृती कोणत्या वंशाच्या लोकांची होती ?=द्रविड
8.सिंधू संस्कृतीचे क्षेत्र सध्या कोठे आहे ? =पाकिस्तानमध्ये
9. भारत देशाचा ‘इंडिया’ असा उल्लेख सर्व प्रथम कोणी केला ?
=युनानियांनी
10.शून्य ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या लोकांनी शोधून काढली ?=भारतीय
11. इ.स. पूर्व 7 व्या शतकापासून नावारूपाला आलेले प्राचिन भारतातील विद्यापीठ कोणते होते ? =नालंदा
12. जैन धर्माचे पहिले तीर्थकार कोण होते.?=ऋषभदेव
13. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला?=कुंदग्राम (नवीन नाव कुंडलपूर )
14. जैन साहित्याला काय म्हणतात.?=आगम
15. जैन धर्माचे महत्त्वाचे जुने धर्मग्रंथ कोणत्या भाषेत आहे ?
=अर्धमागधी
16. जैन धर्मातील सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चरित्र या त्रिरत्नांचा उपदेश देणाऱ्या वर्धमान महावीरांचा जन्म केव्हा झाला?=इ.स. पूर्व 599
17. गौतम बुद्धांचा जन्म कोठे व केव्हा झाला ? = लुम्बिनी येथे इ.स. पूर्व 563
18. गौतम बुद्धांनी सारनाथ येथे दिलेल्या पहिल्या प्रवचनाला काय म्हणतात ? =धर्म-चक्र परिवर्तन
19. गौतम बुद्धांनी दिलेल्या वचनांचा संग्रह कोणत्या ग्रंथात आहे?=धम्मपद
20. बौद्ध धर्माचे महत्वाचे धर्मग्रंथ कोणत्या भाषेत आहेत?
=पाली
21. गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या कथांना काय म्हणतात ?= जातक कथा
22. गौतम बुद्धाच्या मुलाचे नाव काय होते ?= राहूल
24. गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या 24 कथा कोणत्या ग्रंथात सांगितलेल्या आहे?=बुद्धवंश
25. दुःख निवारण करण्यासाठी गौतम बुद्धांनी किती मार्ग सांगितले आहे ?=अष्टांग मार्ग
26. श्रीलंकेतील मंदिरात गौतम बुद्धांचा दात कोणत्या ठिकाणी ठेवलेला आहे ?=कॅन्डी येथे
26 (अ) वर्धमान महावीरांचे महानिर्वाण केव्हा झाले ? =- इ.स. पूर्व 527
27. गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण कोणत्या वर्षी झाले ?= – इ.स. पूर्व. 487 –
28. भारताबाहेर बौद्ध धर्माच्या प्रसाराचे प्रयत्न कोणी केले ?= – सम्राट अशोक
29. प्राचीन भारताच्या इतिहास काळातील पहिला सम्राट कोण होता ?=चंद्रगुप्त मौर्य
30. कौटिल्य हा कुटनितीज्ञ कोणत्या राजाचा गुरु होता ? =चंद्रगुप्त मौर्या
31. विशाखादत्तने चंद्रगुप्त मौर्य व चाणक्याविषयी कोणते नाटक लिहिले आहे ? =- मुद्राराक्षस
32.अलेक्झांडर उर्फ सिकंदरने कोणत्या वर्षी भारतावर आक्रमण केले ?= इ.स. पूर्व 327
33. अलेक्झांडर दी – ग्रेटचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ? =इ.स. पूर्व 323
34. कोणत्या युध्दातील प्रचंड प्राणहानीमुळे सम्राट अशोकाचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारले ?=कलिंगचे युध्द
35. सम्राट अशोकाने भारताबाहेर बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठविले होते ? = नेपाळ व श्रीलंकेत
36. कोणत्या शतकापासून भारतात रुग्णालयांची सुरुवात झाली ?=इ.स. पूर्व – तिसऱ्या
37. वैष्णव पंथाची स्थापना कोणी केली ?= वासुदेव नामक ऋषीने
38. उंच मोठ्या दगडी स्तंभावर कोरलेल्या लेखाला काय म्हणतात ?= स्तंभालेख
39. तांब्याच्या जाड पत्र्यावर कोरुन तयार केलेल्या मजकूराला काय म्हणतात ?=ताम्रपट
40. ऋग्वेद या पवित्र ग्रंथामध्ये एकूण किती सुत्रे आहेत ?=1027 सुत्रे
41. मुख्य पुराणे एकूण किती आहेत ? =अठरा
42. वेदांचे एकूण किती प्रकार आहेत ?=चार
43. भारतीय संगीताचा उगम कोणत्या वैदिक वाङ्मयात आढळते ?= सामवेदात
44. प्राचीन काळामध्ये व्यक्तिच्या जीवनात किती संस्कार महत्वाचे मानले जात होते ? – सोळा संस्कार
45. व्यक्तिच्या जीवनातील सोळा संस्कारांपैकी पहिले संस्कार कोणते ? = गर्भाधान
46. व्यक्तिच्या जीवनातील आवश्यक संस्कारापैकी शेवटचे संस्कार कोणते ? =अंतिम संस्कार
47. प्राचीन हिन्दुस्थानचा नेपोलियन कोणाला म्हणतात ? = समुद्रगुप्तला
48. रोम या शहराची निर्मिती कोणी केली होती ?= रोम्युलस व रेमस या दोघा भावांनी
49. येशू ख्रिस्ताचा जन्म कोणत्या वर्षी झाला ? = इ.स. पूर्व 4 मध्ये
50. शक या राजाने आपली स्वतंत्र कालगणना केव्हापासून सुरू केली ? = इ.स. 78 पासून
51. ग्रिक प्रवाशी मेगॅस्थेनिसने प्राचीन भारताविषयी अत्यंत उल्लेखनीय केलेले प्रवासवर्णन कोणत्या पुस्तकात आहे ? = इंडिका
52. भारताचा भूगोल कोणत्या संशोधकाने लिहिलेला आहे ?= टॉलेमीने
53. विक्रम संवत् ही विक्रम राजाची कालगणना केव्हापासून सुरू झाली ?= इ.स. 58 पासून
54. सॉक्रेटिसचा शिष्य कोण होता ?= प्लेटो
55. भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक जर्मन पंडित कोण होते ?=मॅक्स मुलर
56. इ.स. 399 मध्ये कोणता चिनी प्रवाशी बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता ? =फाहियान
57. वेरूळचे कैलास लेणे कोणत्या राज घराण्याने घडविले आहे ? = राष्ट्रकूट
58. भारतात सर्वात जास्त लेण्या कोणत्या राज्यात आहे ? =महाराष्ट्र
59. जगात सर्वप्रथम कोणते दोन धातू शुध्द करण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले ? = सोने व लोह
60. प्राचीन भारताच्या इतिहासात किती प्रकारचे विवाह प्रचलीत होते ? – आठ
61. भारतीय मुद्रेचे नाव “रूपया” सर्वात पहिले कोणत्या शासकाने ठेवले ? = शेरशहा सुरी
62. कोणार्कच्या सूर्य मंदिराचे निर्माण कोणी करून घेतले ? =नरसिंह प्रथमने
63. हिंदुस्थानाला आपला देश माणनारा पहिला मोगल सम्राट कोण होता ?= सम्राट अकबर
64. ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार आहे ? = वर्णव्यवस्थेचे
65. ब्रम्हचर्माश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे प्राचीन भारतातील कोणत्या व्यवस्थेचे प्रकार होते ?= आश्रम व्यवस्था
66. ज्योतीषशास्त्रा संबंधी ‘पंचसिध्दांतिका’ हा प्रसिध्द ग्रंथ कोणी लिहिला ? = वराह मिहिराने
67. मराठी भाषेला राजभाषेचे स्थान प्रथमतः कोणत्या राजघराण्यात मिळाले ? = यादव घराण्यात
68. मराठी भाषेची पहिली वहिली घडण कोणत्या राजघराण्याच्या काळात झाली ?=राष्ट्रकूट
69. ‘रघुवंशम’ हे महाकाव्य कोणी लिहिले ? =महाकवी कालिदास
70. वर्धन घराण्याचा संस्थापक कोण होता ? = पुष्पभूती
71. वर्धन घराण्यातील सर्वात कुशल राजा कोण होता ? =हर्षवर्धन
72. वाकाटक घराण्याचा मूळ संस्थापक कोण होता ? =विंध्यशक्ती
73. वत्सगुल्म (वाशिम) या वाकाटकांच्या दुसऱ्या शाखेचा संस्थापक कोण होता? = राजा सर्वसेन
74. दक्षिण भारतातील पल्लव राजघराण्याचा काळ हा शिल्पकलेचा कोणता युग मानला जातो ? = सुवर्णयुग
75. चोल राज्याचा प्रतीक चिन्ह काय होता ? = वाघ
76. सातवाहन राजघराण्याचा (राज्याचा) संस्थापक कोण होता ? = शिमुक उर्फ शिमरू
77. कोणत्या राजवंशाला आंध्रप्रदेश वंश म्हटल्या जाते ?= सातवाहन वंश
78. इ.स. 8 व्या शतकात जगप्रसिध्द विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली ? = राजा धर्मपालने
79. पृथ्वीराज चौहाण माने संयोगिता हिला पळवून तिच्याशी विवाह केल्याची गोष्ट कोणत्या ग्रंथात आहे ? =पृथ्वीराज रासो
80. पारंपरिक भारतीय समाजात बलुतेदारांची संख्या किती होती ? = बारा
२. मध्ययुगीन इतिहासाची माहिती सामान्य ज्ञान
१.पृथ्वीराज चौहानचा पराभव करून त्याला देहांताची शिक्षा कोणी दिली ? = मुहम्मद घोरीने
2. दक्षिणेतील प्रचंड विजयनगर साम्राज्य कोणी स्थापन केले ?=
हरिहर व बुक्क या भावांनी
3. विजमनगर साम्राज्याचा सर्वश्रेष्ठ सम्राट कोण होता ? = कृष्णदेवराय
4. तेनाली रमण हा कोणाच्या दरबारात होता ?=कृष्णदेवराय(विजयनगर)
5.मुहम्मद गझनवी (गझनी) याने भारतावर किती स्वाऱ्या केल्या ?=सतरा
6.दिल्ली येथे मुसलमानी राजवटीची स्थपना कोणी केली ?=कुतुबुद्दीन ऐबकने
7. 13 व 14 व्या शतकात महाराष्ट्रातून कोणत्या प्रकारची मंदिरे बांधल्या गेली ? =हेमाडपंथी
8.इ.स. 1450 मध्ये जर्मनीत पहिला छापखाना कोणी सुरू केला ? =गटेनबर्गने
9.तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल केव्हा जिंकून घेतले ? =इ.स. 1453 मध्ये
10. मोनालिसा या जगप्रसिध्द कलाकृतीचे निर्माते कोण आहे ? = -लिओनार्डो – दा – व्हीन्सी
11.पॅराशुटची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली ?= लिओनार्डो-दा- व्हीन्सी
12 .वास्को-द-गामा 1498 मध्ये भारतातील कोणत्या बंदरावर येऊन पोहोचला?= कालिकत (केरळ)
13.वास्को-द-गामा हा कोणत्या देशाचा दर्यावर्दी खलाशी होता ? = पोर्तुगीज
14.महामुनी पराशर यांनी लिहिलेल्या कृषी कोषाचे नाव काय आहे ?= पराशर तंत्र
15.विश्व अणुपरमाणुंचे बनले आहे हा सिध्दांत कोणी मांडला ? = महर्षी कणादने
16.सागरमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघालेला पहिला व्यक्ती कोण ? =फर्डिनांड मॅगेलन
17.इतिहासात ‘प्रबुध्द राजा’ म्हणून ख्यातनाम झालेल्या राजाचे नाव काय आहे?= अकबर
18.पोर्तुगिजांचा पहिला गव्हर्नर कोण होता ? – डी. अल्मेडा
19. कोणत्या वर्षी पोर्तुगीजांनी गोवा जिंकून आपल्या साम्राज्यस जोडले?= सन 1510
20. कोणत्या उत्तम प्रशासक पोर्तुगिज गव्हर्नरने केरळमधील कोच्ची येथील किल्ला बांधला आहे ? =अल्बुबर्कने
21. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =इ.स. 1600 मध्ये
22. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना का करण्यात आली ?= भारताशी व्यापार करण्यासाठी
23. डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =इ.स. 1602 मध्ये
.
25. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली ? =सन 1664 मध्ये
26. ब्रिटीश कॅप्टन हॉकिन्स भारतात केव्हा आला होता ?= इ.स. 1609 मध्ये
27. कॅप्टन बेस्ट याने कोणाकडून सुरत येथे वसाहत स्थापण्याची परवानगी मिळविली? = गुजरातच्या सुभेदाराकडून
27. सर थॉमस रो यांनी भारतात कोणाकडून काही व्यापारी सवलती मिळविल्या ?=जहाँगिर राजा
28. -ईस्ट इंडिया कंपनीचा इंग्लंडमधील व्यवस्थापन कोण पाहत असे?=द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स
29. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे मुख्यालय भारतात कोणकोणत्या ठिकाणी होते ?=मुंबई, मद्रास व कलकत्ता (जुने नाव)
30. टिपू सुलतान हा कोणाचा मुलगा होता ? =हैदर अलीचा
31. टिपू सुलतान या म्हैसुरच्या राजाचा अंतिम पराभव कोणी घडवून आणला?=लॉर्ड वेलस्लीने
32. अमीर खुसरो याने भारतीय संगीताबद्दल कोणते पुस्तक लिहिले आहे ?=नूहसिपहर
33. नादिरशहाने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले ?
=सन 1738
34. कर्नाटकातील तिनही युध्दे कोण-कोणत्या देशांमध्ये झाले ?
=इंग्रज व फ्रेंच
35. कोलकताच्या अंधार कोठडीत किती इंग्रजांचा गुदमरून मृत्यु झाला होता ?=123 जणांचा
36. हिंदुस्थानात ब्रिटीश सत्तेचा पाया कोणत्या लढाईने घातला गेला ?=प्लासीच्या लढाईने
37. तैनाती फौजेची अंमलबजावणी कोणी केली ?=लॉर्ड वेलस्लीने
38. इंग्रजांनी फोर्ट सेंट विल्यम हा किल्ला भारतात कोठे बांधला ?=कोलकाता
39. भारतातील पहिली रेल्वे (मुंबई ते ठाणे) कोणी सुरू केली? =लॉर्ड डलहौसीने
40. कोणत्या ब्रिटीश राजकुमाराला पोर्तुगिजांनी मुंबई बंदर हुंड्याच्या स्वरूपात दिले होते ? = प्रिन्स चार्ल्स
41. बंगालमध्ये एशियाटीक सोसायटीची स्थापना कोणी केली ?
=सर विल्यम जोन्सने
42. प्राचीन व ऐतिहासिक इमारतींच्या रक्षणाचा कायदा कोणी केला= लॉर्ड कर्झनने
43. ब्रिटीश पार्लमेंटने रेग्युलेटिंग अॅक्ट कोणत्या वर्षी पास केला ?=इ.स. 1773
44. इ.स. 1773 च्या कायद्यानुसार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी सुप्रिम कोर्टाची स्थापना झाली ?=कोलकाता
45. सुप्रिम कोर्ट (कोलकाता) चे पहिले मुख्य न्यायाधीश म्हणून कोण बनले ? =सर एलिजा इम्पे
46. रेग्युलेटिंग ॲक्टमधील उणीवा दूर करण्यासाठी दुसरा कोणता सुधारित कायदा झाला ?=पिट्स इंडिया ॲक्ट
47. भारतातील मुलकी सेवेचा पाया कोणी घातला ?= लॉर्ड कॉर्नवॉलिसने
48. वॉरन हेस्टिंग्जने प्रचलित असलेल्या कायद्यांचे संकलन करून त्यांना कशामध्ये लिखित स्वरूप दिले ? =कॉर्नवालिस कोड
49. जमिनीच्या मालकिविषयी कायमधरा पध्दत कोणी सुरू केली ?=कॉर्नवॉलिसने
50. प्रत्येक जिल्ह्यात दिवाणी व फौजदारी न्यायालय कोणी सुरू केले ?=वॉरन हेस्टिंग्जने
51. पंजाब व आग्रा प्रांतासाठी महालवारी पध्दत कोणी सुरू केली ?=वॉरन हेस्टिंग्जने
52. भारतात रयतवारी पध्दत कोणी सुरू केली ? = सर थॉमस मनरोने
53. लॉर्ड डलहौसीने पोस्ट ऑफिस ॲक्ट केव्हा लागू केला ? = इ.स. 1854 मध्ये
54. लॉर्ड डलहौसींच्या विविध सुधारणांमूळे त्याला काय म्हटले जाते ?=आधुनिक भारताचा निर्माता
55. औद्योगिक क्रांती सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये घडून आली ? =इंग्लंडमध्ये
56. दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या आर्थिक शोषनावर प्रकाश टाकण्यासाठी कोणता सिध्दांत मांडला ?= संपत्तीचे निस: रण –
57. – पिट्स इंडिया अॅक्ट भारतात कोणत्या वर्षी आले ?
= इ.स. 1784
58. पहिली तार यंत्रणा कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ? =
कोलकाता ते आग्रा
59. 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा कोणी संमत केला ?=लॉर्ड विल्यम बेंटिकने
60. महत्वाच्या सामाजिक सुधारणा घडवून आणल्यामुळे विल्यम बेंटिकला काय म्हटले जाते ? =आधुनिक भारताचा उद्गाता
61. फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली?=इ.स. 1789
62. शेरशहा याने चौसाच्या लढाईनंतर आपले हे नाव धारन केले, त्याचे मुळ नाव काय होते ? = शेरखान
63. शेरखान (शेरशहा) हा कोणत्या वंशाचा होता ?= सूर वंशाचा
64. मध्ययुगात धर्मसुधारणा चळवळ कोणत्या खंडात सुरू झाली ? =युरोप खंड
65. बायबलचे इंग्रजी भाषांतर प्रथम कोणी केले ? =जॉन विक्लिफने
66. रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली ? = इ.स. 1717
३. मराठ्यांचा इतिहास
1. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला ?
=19 फेब्रुवारी 1630
2. शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?=शिवनेरी किल्ल्यावर
3. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी भोसले कोणाच्या दरबारात होते ?=आदिलशहा
4.शिवाजी महाराजांच्या माता जिजाऊ यांच्या आई व वडीलांचे नाव काय होते ?=माळसाबाई व लखुजी जाधव
5.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलीचे नाव काय होते ?=सखुबाई
6.शहाजहानने निजामशाही केव्हा नष्ट केली ?=ऑक्टोबर 1636
7.शिवाजी महाराजांनी सातारा जिल्हयातील जावळीवर केव्हा हल्ला केला ? =इ.स. 15 जानेवारी 1656
8. – प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केव्हा केला ? =1 10 नोव्हेंबर 1659
9.पुरंदरचा तह कोणामध्ये झाला ?=मिर्झाराजे जयसिंग व शिवाजी महाराज
10. औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला जाताना शिवाजी महाराजांनी आपल्यासोबत कोणाला घेतले होते ? =मुलगा बाल संभाजीला
11. शिवाजी महाराजांनी कोणत्या राज्याची स्थापना केली ? =हिंदवी स्वराज्याची
12. शिवाजी महाराजांची बांधलेल्या एका सागरी किल्ल्याचे नाव ? = सिंधुदुर्ग किल्ला
13. आपल्या स्वराज्याचा कारभार पाहण्यासाठी शिवाजी महाराजांनी कशाची निर्मिती केली ? =अष्टप्रधान मंडळ
14. राज्यव्यवहार कोषाची निर्मिती करण्याची संकल्पना मांडून तो सिध्द करण्यासाठी कोणी प्रयत्न केले ? = शिवाजी महाराजांनी
15. शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय ?= मालोजी राजे
16. संभाजी राजे हे मराठयांचे छत्रपती केव्हा बनले ? =10 जाने, 1681 मध्ये
17. शिवाजी महाराजांच्या सख्ख्या थोरल्या भावाचे नाव काय ?=व्यंकोजी राजे
18. संभाजी राजाच्या मृत्युनंतर मराठ्यांचे छत्रपती कोण बनले ? =राजाराम
19. छत्रपती राजारामने मराठ्यांची नवी राजधानी कोठे स्थापन केली ? = सातारा
20. राजाराम या पराक्रमी छत्रपतीचा वयाच्या तिसाव्या वर्षी मृत्यू कोठे झाला ?= सिंहगडावर
21. छत्रपती राजारामच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराबाईने कोणाला गादीवर बसविले?=दुसरा शिवाजीस
22. छत्रपती राजारामच्या गैरहजेरीत मराठा सरदारांना एकत्र आणण्याचे काम कोणी केले ? = महाराणी ताराबाईने
23. औरंगजेबाच्या मृत्युनंतर (1707) मराठ्यांचे सर्व किल्ले कोणी परत जिंकून घेतले ? =महाराणी ताराबाईने
24. मराठ्यांच्या स्वातंत्र्य युध्दाचे नेतृत्व कोणी केले ?
=महाराणी ताराबाईने
25. खेडची प्रसिध्द लढाई कोणामध्ये झाली ? – =महाराणी ताराबाई व छ. शाहू
26. महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्यामध्ये 23 वर्ष चाललेल्या संघर्षाला काय म्हणतात ?=यादवी युध्द
27. मराठ्यांचा पहिला पेशवा कोण होता ?=बाळाजी विश्वनाथ
28. बाळाजी विश्वनाथ यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणता मुलगा मराठ्यांचा पेशवा बनला ?= पहिला बाजीराव
29. 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने तैनाती फौज स्विकारली ?= दुसरा बाजीराव
30. इ.स. 1803 मध्ये अंजनगांव सुर्जी येथे कोणामध्ये तह झाला ?=इंग्रज व शिंदे
31. छत्रपती शाहूचा राज्यभिषेक कोठे झाला ?=सातारा येथे
32. मराठ्यांचा सर्वश्रेष्ठ सेनापती कोण होता ?=बाजीराव पेशवा
33. मराठ्यांचा शेवटचा पेशवा कोण होता ?=दुसरा बाजीराव
34.इंग्रज व मराठे यांच्यात एकूण किती युध्द झाले?=तीन
35मराठ्यांचा शेवटचा पराभव कोठे झाला होता ? = पंढरपूर जवळ आष्टी येथे
36 मराठ्यांचा अखेरचा पराभव कोणत्या गव्हर्नर जनरलने केला ?=लॉर्ड हॉर्डिंग्जने
37. मराठी सत्तेचा -हास कोणत्या वर्षी झाला ?=इ.स. 1818
38. कोणत्या तहाने मराठ्यांचे स्वातंत्र्य संपुष्टात आले ?
=वसईच्या तहाने
39. खालसा राज्याची स्थापना कोणी केली ?= महाराजा रणजितसिंगाने
40. पंजाबचा सिंह कोणास म्हणतात ? महाराजा रणजितसिंगाला
41. शीख राज्याची स्थापना कोणी केली ?= महाराजा रणजितसिंगाने
42. गुरू गोविंद सिंगाचा खून कोठे झाला ? =नांदेड येथे
43. अहमदशहा अब्दाली कोणत्या प्रदेशाचा सत्ताधीश होता ?= अफगाणीस्थान
44. शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते ? =भवानी तलवार
४. १८५७ चा उठाव व आधुनिक भारताचा इतिहास
1. भारतात पहिला राष्ट्रीय उठाव कोणत्या वर्षी झाला ?= इ.स 1857 मध्ये
2. पहिले अखिल भारतीय स्वातंत्र्य युध्द केव्हापासून सुरू झाले ?=1857 पासून
3. इ.स. 1857 च्या उठावाचा पहिला भडका कोणत्या लष्करी छावणीत उडाला ?= बराकपूर
4. 1857 च्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले ?= बहादूर शहा जफरने
5.इ.स. 1857 मध्ये झाशीचे स्वातंत्र्य कोणी घोषीत केले ?= राणी लक्ष्मीबाईने
6.कोणत्या पहिल्या क्रांतीकारकाला फाशीची शिक्षा देण्यात आली ?=मंगल पांडे
7. बराकपूर येथील लष्करी छावणीत सैनिक असलेला व इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडणारा क्रांतीकारक कोण होता ?= मंगल पांडे
8. ब्रिटीशकालीन भारतातील ‘आय सी एस’ या परीक्षेचे नाव बदलून ‘आय ए एस’ असे कोणी केले ?= सरदार पटेल
9. इ.स. 1857 च्या उठावामध्ये सैनिकांनी दिल्ली काबीज
केल्यानंतर भारताचा बादशहा म्हणून कोणाला गादीवर बसविले ?
=बहादूर शहा जफरला
10. मै मेरी झांशी नही दूंगी’ हे उद्गार कोणाचे आहे ?= राणी लक्ष्मीबाई
11. भारतातील आद्यक्रांतीकारक कोणाला म्हणतात ? = वासुदेव बळवंत फडकेला
12. पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?= महात्मा फुलेंनी
13. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत्या ?=सावित्रीबाई फुले
.
14. भारतातील क्रांतीकारी विचारांचा जनक कोणाला म्हटले जाते ? = बिपीन चंद्र पालला
15. कोणत्या स्त्री क्रांतीकारकाने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या ? =बिना दासने
16. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण ?=वॉरन हेस्टिंग्ज
17. भारताचा पहिला व्हॉईसरॉय कोण होता ?=लॉर्ड कॅनिंग
18. बंगाल प्रांताची फाळणी कोणत्या वर्षी व कोणी केली ?
=इ.स. 1905, लॉर्ड कर्झनने
19. पुण्यात इंग्रज अधिकारी रॅडची हत्या कोणी केली ?
= चाफेकर बंधूंनी
20. ऑल इंडिया मुस्लिम लिगची स्थापना कोठे झाली ?
= ढाका येथे
21. पहिले महायुध्द कोणत्या वर्षी सुरू झाले ? =सन 1914 मध्ये
22. कोणत्या कायद्याला काळा कायदा म्हटल्या जात होते ? – =रौलेट कायद्याला
23. रौलेट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला ?
= सन 1917 मध्ये
24. मुंबई येथे कोणत्या गिरणी कामगाराने परदेशी कापडाच्या
ट्रकखाली बलीदान दिले? = बाबू गेणुने
25. ‘वंदे मातरम्’ हे वृत्तपत्र कोणी काढले ?=अरविंद घोष
26. क्रांतीकारक खुदीराम बोस यांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या गाडीवर बाँब टाकला ? =लॉर्ड किंग्जफोर्डच्या
27. ब्रिटीश अधिकारी कर्झन वायलीची हत्या कोणी केली ?- =मदनलाल धिंग्राने
28. साँडर्स या इंग्रज अधिकाऱ्याचा वध कोणी केला ?= राजगुरू व भगतसिंगाने
29. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार केव्हा मिळाला ?= 1913
30. गदर पक्षाची स्थापना कोणी केली ?=लाला हरदयाळने
31. मद्रास प्रांतात होमरूल लिगची स्थापना कोणी केली ? =डॉ. ऍनी बेझंटने
32. लोकमान्य टिळकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी कोठे पाठविले होते ?=मंडालेच्या तुरूंगात
33.लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?=सन 1920 मध्ये
34.आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ?=रासबिहारी बोसने
35. आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले ?=सुभाषचंद्र बोसने
36. आझाद हिंद सेनेची घोषणा कोणती होती ?=चलो दिल्ली
37. आझाद हिंद सेनेतील स्त्रियांच्या सैनिकी पथकाचे नाव झाशीची राणी होते. ती फौज कोणी तयार केली होती ?=
लक्ष्मी स्वामीनाथन
38. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात कोणत्या वर्षी मृत्यू झाला?सन 1945
39. हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेचे प्रमुख कोण होते ? चंद्रशेखर आझाद
40. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली ?= स्वातंत्र्यवीर सावरकरांनी
41. स्वातंत्र्यपूर्व काळात 26 जानेवारी, 1930 रोजी भारतीय क्रांतीकारकांनी देशभर कोणता दिवस साजरा केला ? =स्वातंत्र्य दिन
42. जालीयनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ?= अमृतसर (पंजाब)
43. जालीयनवाला बाग येथे गोळी चालविण्याचे आदेश कोणी दिले होते ?=जनरल डायरने
44. ब्रिटीशांच्या राष्ट्रध्वजाचे नाव काय होते ? =युनियन जॅक
45. गांधीजींचा महात्मा असा उल्लेख सर्वप्रथम कोणी केला ?= रवीन्द्र टागोरांनी
46. सरहद्द गांधी यांचे मूळ नाव काय होते?=खान अब्दुल गफार खान
47. भूदान चळवळीची सुरूवात कोणी केली होती ?=
विनोबा भावेंनी
48. पहिली गोलमेज परिषद कोणत्या साली झाली ? = सन 1930
49. महात्मा गांधीजींनी दांडी यात्रा कोणत्या पूर्ण वर्षी केली ?=
सन 1930
50. सायमन कमिशन भारतात कोणत्या वर्षी आले ?= इ.स. 1927
51. महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला होता ? =- – पुणे करार (1931)
52 नताल इंडियन काँग्रेसची स्थापना कोणी केली ?= महात्मा गांधींनी
53. भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा केव्हा देण्यात आली ? =23 मार्च, 1931
54. दुसरे महायुध्द कोणत्या वर्षी सुरू झाले ?=इ.स. 1939 मध्ये
55. असहकार चळवळीची सुरूवात कोणी केली ?=महात्मा गांधीनी
56 बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी कोणत्या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली ?= इंग्लंड
57. बार्डोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? =सरदार वल्लभभाई पटेल
58. गुजरातमधील धारासना येथील मिठाच्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ? =सरोजीनी नायडूने
59. अवध येथील स्वातंत्र्य लढयाचे नेतृत्व कोणी केले ?=बेगम हजरत महलने
60. हैद्राबाद मुक्ती लढ्याचे नेतृत्व कोणी केले होते ? – डॉ. टी. बी. कुन्हाणे.
हे पण वाचा…….
सामान्य ज्ञान प्रश्न उत्तर मराठी
तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी माहिती नक्कीच आवडली आसेल आशी आम्हाला आशा आहे.
आश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolution .Net ला नंक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला general knowledge संपूर्ण माहिती – In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions.
ला भेट द्यायला विसरू नका.