Wardha marathi mahiti, Wardha Jilha Mahiti , Wardha Information In Marathi
वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – Wardha Information in Marathi
वर्धा जिल्हा
वर्धा जिल्ह्यामध्ये सापडलेल्या अवशेषांवरून या ठिकानी तामपाषाणयुगीन लोक वास्तव्यास होते. मौर्य, शुंग, सातवाहन, शक, गौतमीपुत्र सातकर्णी यांनी या प्रदेशावर राज्य केले. सातवाहनानंतर आलेल्या वाकाटक घराण्याचा राजा दुसरा प्रवरसेन याने प्रवरपूरची म्हणजेच आजच्या पवनारची स्थापना केल्याचा उल्लेख सापडतो. सन १९३४ मध्ये महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम येथे आश्रम स्थापन केला. त्यानंतर सेवाग्राम हे ठिकाण राष्ट्रीय आंदोलनाचे केद्रबिंदू झाले. सन १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा महत्वपूर्ण निर्णय येथेच घेण्यात आला होता,
वर्धा जिल्हा संक्षिप्त – माहिती
१. भौगोलिक स्थान : वर्धा नदीच्या नावावरून या जिल्ह्याला वर्धा हे नाव पडले. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येला (उत्तर व पूर्व) नागपूर जिल्हा; आग्नेयला चंद्रपूर; नैऋत्येला (दक्षिण व पश्चिम) यवतमाळ व वायव्येला (पश्चिम व उत्तर) अमरावती हे जिल्हे वसलेले आहेत.
२. नद्या व धरणे : वर्धा व वेणा या जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असून, बोर, धाम आणि आर्वी तालुक्यांत उगम पावलेली यशोदा नदी या इतर नद्या आहेत.
३. प्रमुख पिके : वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात. सोयाबीन, जिल्ह्यातील महत्त्वाचे पीके आहेत. या जिल्ह्यात काही ठिकाणी संत्री व केळी ही फळांची पिकेही घेतली जातात.
४. खनिज संपत्ती: या जिल्ह्यात कोळशाच्या खाणी आहेत.
५. उद्योग व व्यवसाय : वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, सिंदी, मांडगाव, हिंगणगाव, अळीपूर आदी ठिकाणी हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. वर्धा जिल्ह्यातील दुसरबीड व जामणी येथे सहकारी साखर कारखाने आहेत. या जिल्ह्यातील सेलू तालुक्यात महाराष्ट्र एक्सप्लोझिव्ह व नोबल एक्सप्लोकेम हे दोन स्फोटक द्रव्य तयार करणारे कारखाने आहेत. या जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय सैन्याचा संरक्षण सामग्री डेओ आहे. वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव येथे औद्योगिक वसाहती स्थापन करण्यात आल्या आहेत.
६. दळणवळण : या जिल्ह्यातून हाजिराह्नधुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६, वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ आणि नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ क्र गेला आहे. वर्धा शहर हे रेल्वेचे महत्त्वपूर्ण जंक्शन असून, या ठिकाणावरून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग आणि चेन्नई-दिल्ली (ग्रँड ट्रंक – दक्षिण-उत्तर लोहमार्ग) गेलेला आहे.
वर्धा जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- वर्धा येथे अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय असून, येथे ‘अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ, विश्वशांती स्तुप आणि आगळेवेगळे गीताई मंदिर आहे.
- पवनार हे गाव धाम नदीकाठी वसले असून, या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री व आचार्य विनोबांनी स्थापन केलेला ‘परमधाम’ आश्रम आहे.
- आर्वी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून, येथील काचेचे जैन मंदिर प्रसिद्ध आहे.
- या जिल्ह्यातील आष्टी हे गाव सन १९४२ च्या चले जाव आंदोलनात विशेष गाजले. या आंदोलनात १६ ऑगस्ट १९४२ रोजी येथे झालेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही मारले गेले होते.
- वर्धा जिल्ह्यात ६१.१० चौ. किमी. क्षेत्रावर पसरलेले बोर अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प आहे.
- राज्यात वर्धा या नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांबद्दल प्रसिद्ध आहे.
सांख्यिकीक वर्धा – सर्व माहिती
(अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ=६,३१० चौ. किमी.
२. जंगलाचे प्रमाण=१६.२%
३. अभयारण्ये =बोर अभयारण्य
४. व्याघ्र प्रकल्प = बोर व्याघ्र प्रकल्प
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय= नागपूर विभाग (नागपूर)
२. जिल्ह्याचे मुख्यालय =वर्धा
३. उपविभाग=०३ आर्वी, वर्धा, हिंगणघाट
४. तालुके=०८ आर्वी, वर्धा, देवळी,हिंगणघाट, सेलू, आष्टी,
समुद्रपूर, कारंजा
५. पंचायत समित्या=०८
६. ग्रामपंचायत=५१७
७. नगरपालिका=०६
८. पोलीस मुख्यालय=०१ वर्धा जिल्हा पोलीस
अधीक्षक
९. पोलीस स्टेशनची संख्या= १६
(इ) लोकसंख्या(सन २०११ च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या=१३,००,७७४
२. साक्षरता=८६.९९%
३. लिंग गुणोत्तर=९४६
४. लोकसंख्येची घनता=२१०
तुम्हाला वर्धा जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला वर्धा जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – Wardha District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.