upnagar mumbai marathi mahiti, upnagar mumbai Jilha Mahiti, upnagar mumbai Information In Marathi, upnagar mumbai District Information, upnagar mumbai pin code maharashtra
उपनगर मुंबई जिल्ह्याची संपूर्ण माहिती आणि इतिहास – upnagar mumbai Information in Marathi .
उपनगर मुंबई
सन १९९० पर्यंत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्याचाच होता. सन १९९० मध्ये मुंबई जिल्ह्याचे विभाजन करुन उपनगर मुंबई हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. आजचा उपनगर मुंबई जिल्हा हा साष्टी बेटाच्या दक्षिण भागात वसलेला आहे. उपनगर मुंबई जिल्ह्याच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर असून, या डोंगरात कान्हेरी व जोगेश्वरी लेण्या आहेत. या लेण्या इसवीसनाच्या दुसऱ्या शतकापासून खोदल्या गेल्या असाव्यात, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. या लेण्या सातवाहनकालीन असल्यामुळे या ठिकाणी प्राचीन काळी सातवाहन वंशाची सत्ता असावी, असा अंदाज आहे.
उपनगर मुंबई जिल्ह्याची वैशिष्ट्ये आणि माहिती
१. भौगोलिक माहिती : मुंबई उपनगराच्या उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाण्याची खाडी, दक्षिणेस मुंबई शहर, नैऋत्येस माहीमची खाडी व पश्चिमेस अरबी समुद्र आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यांत माहीम, मालाड, मनोरी या प्रमुख खाड्या आहेत. मुंबई उपनगराच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर असून, या डोंगरात कान्हेरी लेण्या आहेत.
२. नद्या व धरणे : कान्हेरी डोंगराच्या पायथ्याशी उगम पावलेल्या दहिसर, पोईसर, मिठी या नद्या मुंबई उपनगर जिल्ह्यात असून, मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार, पवई व तुळशी हे तलाव याच जिल्ह्यात आहेत.
३. उद्योग व व्यवसाय : उपनगर मुंबई जिल्ह्यात घाटकोपर, अंधेरी भागात अवजड यंत्रसामग्री तयार करणारे व विजेचे साहित्य, शेती अवजारे, लोखंडी साहित्य व यंत्रसामग्री तयार करणारे कारखाने आहेत. अंधेरी, चेंबूर, गोरेगाव या भागात चित्रपटनिर्मितीचे केंद्र आहे. चेंबूर या ठिकाणी भारत सरकारच्या मालकीच्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेलशुद्धीकरण कंपन्या आहेत. चेंबूर या ठिकाणी भारत सरकारच्या मालकीच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर हा खतनिर्मितीचा कारखाना आहे. मुंबईमध्ये तुर्भे येथे ही संस्था उभारण्यात आली असून, या संस्थेचे प्रमुख कार्य अणुविषयक संशोधनाचे आहे. या ठिकाणी अप्सरा, सायरस अणुभट्टी, झर्लिना अणुभट्टी, पूर्णिमा अणुभट्टी-१, पूर्णिमा अणुभट्टी-२ व ध्रुव अणुभट्टी अशा सहा अणुभट्ट्या आहेत.
उपनगर मुंबई जिल्ह्याची वैशिष्ट्ये
- कान्हेरी डोंगरातील गुफांमध्ये प्राचीन काळातील कोरीव लेणी आहेत. १ ले शतक ते १० व्या शतकापर्यंत या ठिकाणी लेणी खोदल्या गेल्या असाव्यात, असा अंदाज आहे.
- या जिल्ह्यातील बोरीवली येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे.
- जोगेश्वरी लेणी रेल्वेस्थानकाच्या पूर्वेस टेकडीवर आहे. पाचव्या शतकात त्रैकुटकांच्या काळात जोगेश्वरी येथील लेण्या खोदण्यात आल्या.
- दहिसर या नदीकाठी बोरिवली येथील ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ वसले आहे.
- मुंबईमध्ये गोरेगाव येथे ‘चित्रनगरी’ हे चित्रपटनिर्मितीचे केंद्र आहे. :
- जुहू भागातील किनारपट्टीच्या भागात ही चौपाटी असून देशी व विदेशी पर्यटकांचे हे एक आकर्षण केंद्र आहे.
- जुहू भागातील किनारपट्टीच्या भागात ही चौपाटी असून देशी व विदेशी पर्यटकांचे हे एक आकर्षण केंद्र आहे.
- ‘माऊंट मेरी’ हे ठिकाण वांद्र्याच्या पश्चिमेस एका टेकडीवर स्थित असून, या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये मोठी यात्रा भरते.
- इ.स. १५६८-७० यादरम्यान बांद्रा येथे बांधलेले माऊंट मेरीचे चर्च सर्व धर्मांतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
- जुहू येथील संगमरवरी इस्कॉन मंदिर लोकप्रिय आहे.
- चेम्बुर या ठिकाणी भारत सरकारच्या मालकीच्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेलशुद्धीकरण कंपन्या आहेत.
- चेम्बुर या ठिकाणी भारत सरकारच्या मालकीच्या राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर हा खत निर्मितीचा कारखाना आहे.
- सन १९९० पर्यत मुंबई उपनगर जिल्हा हा मुंबई जिल्ह्याचाच होता. सन १९९० मध्ये मुंबई जिल्ह्याचे विभाजन करून उपनगर मुंबई हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
- भारतातील एकूण रोजगारापैकी ११ % रोजगार व भारतातील एकूण औद्योगिक रोजगारांपैकी २०% रोजगार एकट्या मुंबईत उपलब्ध आहेत.
सांख्यिकीक उपनगर मुंबई
अ) भौगोलिक माहिती
१. क्षेत्रफळ=४४६ चौ.
२. जंगलाचे प्रमाण किमी=. ९.९६ %
३. राष्ट्रीय उद्याने =संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
(आ)प्रशासकीय माहिती
१. आयुक्तालय =कोकण विभाग नवी मुंबई
२. जिल्ह्याचे मुख्यालय =वांद्रे (पूर्व
३. उपविभाग =०३ वांद्रे, अंधेरी, कुर्ला
४. तालुके =०३ अंधेरी, कुर्ला व बोरीवली
५. महानगरपालीका= ०१बृहन्मुंबई महानगरपालिका
६. पोलीस मुख्यालय =०१ मुंबई शहर पोलीस आयुक्तालय
(इ) लोकसंख्या (सन २०११आयुक्तालय च्या जनगणनेनुसार)
१. लोकसंख्या=९३,५६,९६२
२. साक्षरता= ९०.०९%
३. लिंग गुणोत्तर= ८६०
४. लोकसंख्येची घनता=२०,९८०
हे पण वाचा>>>>>>>>>>
सातारा जिल्हा संपूर्ण माहिती
सांगली जिल्हा संपूर्ण माहिती
तुम्हाला उपनगर मुंबई जिल्ह्या संपूर्ण माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolutions.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला उपनगर मुंबई जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती – upnagar mumbai District Information In Marathi तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्की शेअर करा आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.
)